विरूपिका (२) : भविष्य
विरूपिका - २ : भविष्य
छत्रीप्रमाणे अवकाशाची
उघडझाप
करणार्या तुझ्या हातावर
हे परमेश्वरा!
आकाशगंगेची दिगंत धनरेषा,
शुक्राचा उंचवटा,
सर्व ठीक.
पण तुला परदेशगमनाचा योग नाही.
-विंदा करंदीकर
वाचने
4327
वाचनखूण
प्रतिक्रिया
1
सुरेख !