Skip to main content

संस्कृती

महिषासूर आणि दूर्गा (विनोदी ऍनिमेशन)

लेखक विकास यांनी गुरुवार, 18/10/2007 06:00 या दिवशी प्रकाशित केले.
आपण जर खालील फ्लॅश अजून पर्यंत पाहीला नसला तर अवश्य पहा. मुलांनापण पहायला आवडतो. (मला फायरफॉक्स मधे बघता आले नव्हते) http://www.dadazi.net/usa/mahis.swf विकास

नवरात्रीच्या शुभेच्छा

लेखक धोंडोपंत यांनी शुक्रवार, 12/10/2007 17:14 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिसळपाव वाल्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आई जगदंबेच्या कृपेने, शेअरबाजार तुफान कोसळून मार्केटची काशी होवो, अशी प्रार्थना. आपला, (तेजी-पीडित) धोंडोपंत आज तरी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आई जगदंबेने आमचं गार्‍हाणं ऐकलं म्हणायचं. सोमवार पासूनही अशीच पडझड कायम राहो..... आई जगदंबे...... या धोंड्याला पाव गं पाव !!!!!

प्रथमस्थानात शुक्राचे फलादेश

लेखक धोंडोपंत यांनी शुक्रवार, 12/10/2007 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो !! शुक्रासारखा सौंदर्याचा आणि जगतातील तमाम भौतिक सौख्याचा कारक ग्रह जर कुंडलीत प्रथमस्थानात असेल काय फलादेश मिळतील यासंबंधी हा लेख आहे. प्रथमातील शुक्र व्यक्तिला उत्तम सौंदर्य देतो. हे लोक दिसायला फार सुंदर असतात. चेहर्‍यावर आकर्षक असे तेज असते. नेहमी आनंदी, हौशी, हसतमुख, खेळकर अशा प्रकारचे यांचे व्यक्तिमत्व असते. कपड्यांची, दागिन्यांची, फॅशनची आवड असते. ललितकला, गायन, वादन, नृत्य, सिनेमा, नाटके, करमणुकीचे कार्यक्रम ह्या गोष्टी त्यांना फार आवडतात. मुख्य म्हणजे हे लोक या गोष्टींचा उत्तम रसास्वाद घेऊ शकतात. त्यांचे बोलणे गोड आणि लाघवी असते.

सुगम रूप सुहावे...

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 07/10/2007 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, गाणं शिकणार्‍या काही हौशी मंडळींकरता, तर काही विद्यार्थ्यांकरता एक छोटेखानी शिबिर नुकतेच ठाण्यामध्ये आयोजित केले गेले होते. त्या शिबिरात आयोजकांनी अस्मादिकांनाही दोन शब्द बोलायला आमंत्रित केले होते. कार्यक्रम तसा घरगुती स्वरुपाचाच होता. म्हटलं तर शिबीर, म्हटलं तर घरगुती स्वरुपाच्या गप्पाटप्पा आणि गाण्याची मैफल! अस्मादिकांनी त्यात नेहमीप्रमाणेच खूप भाव वगैरे खाऊन घेतला. 'तात्या अभ्यंकर' म्हणजे काय विचारता महाराजा? एकदम संगीततज्ञ की हो!!' अशी आमची प्रतिमा कायम राखण्यात आम्ही कालही यशस्वी झालो!

चांदोबा

लेखक आजानुकर्ण यांनी शनिवार, 29/09/2007 19:52 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी हे कोडे लिहिल्यावर "का रे अजून चांदोबा वाचतोस का?" असं कुणीतरी मला विचारलं होतं. त्यावेळी उगाचच चांदोबाची आठवण येऊन पिसं उधळल्याप्रमाणं झालं. खरंच लहानपणी एका वेगळ्याच दुनियेत नेणार्‍या या अद्भुत पुस्तकाबद्दल अजून कोणी कसं बरं लिहिलं नाही?

गीतम् (संस्कृत रचना)

लेखक अशोक गोडबोले यांनी शुक्रवार, 28/09/2007 00:51 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, अलिकडेच संस्कृतमध्ये एक रचना सुचली ती येथे लिहीत आहे.
नमामि मोदमंगलम् - विनायकं विनोदकम् II धृ II सुदर्शनेन केवलम् दुरितदलविलोपनम् व्याकुलोऽपि नि:स्वनं - मनो न मे ऽ स्तु कातरम् II १ II विषयबलविमोहिता अविद्ययाऽपि वंचिता धियं सधाय धीमता - पाहि तव पदाश्रितम् II २ II कृतं मया न सुकृतम् हितं कदा न चिन्तितम् अतीव विकलमानसम् - शरणचरणपंकजम् II ३ II न जातु मोक्षहेतवे भजनपूजने कृते तृषाहतं भवालयं - व्रतं ममाऽपि दुस्तरम् II ४ II देहि देहि गणपते आशिनं निरंतरम् सुनीतिपंथगामिनम् - पुनातु मंगलार्चनम् II ५ II
--अशोक गोडबोले, पनवेल.
Taxonomy upgrade extras

पुणे गणेश दर्शन

लेखक जुना अभिजित यांनी बुधवार, 26/09/2007 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
आजानुरावांनी तुम्हाला चिंचवड गणेश दर्शन घडवून आणले आहेच. चला आता पुण्याचा फेरफटका मारू. http://picasaweb.google.com/abhijit.yadav/PuneGaneshDarshan मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला बालवाडीतला अभिजित

चिंचवड गणपती दर्शन

लेखक आजानुकर्ण यांनी शुक्रवार, 21/09/2007 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
चिंचवड परिसरातील गणपतींचे आम्ही काढलेले फोटो खास हॉटेलात आलेल्या सदस्यांसाठी.
दत्तनगर
सोसायटी