मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

समाज

मास्कमधून

चांदणे संदीप ·
काव्यरस
नाहीत तुला पाय तरी देशोदेशी जाशील गावागावा-वस्त्यांमधून द्वाडासारखा फिरशील तुझी असंख्य भावंडे माजवतील हाहाकार पण घे लक्षात, आमच्यात आहे शिल्लक प्रतिकार जितका झपाट्याने तू पोखरत जाशील आत तितकीच उसळून उठेल अशी माणसाची जात माणूस मारणं कदाचित असेल सोपं काम रे पण दाखव जिंकून त्याला म्हणशील मनात 'राम रे!' माहिती नसेलच तुला जगणं-जगवणं कोरोना बघ बापाला, मास्कमधून पापी पोराला देताना संदीप भानुदास चांदणे (२२/०३/२०२०)

स्फुटः आठवणी!

राघव ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
काही दिवसांपुर्वीची गोष्ट. नुकताच लग्न झालेला एक कलीग. जाम वैतागून, तावातावानं, "आयुष्यात काय काडीचा रस राहिलेला नाही.." असं वगैरे म्हणत, आम्हा सगळ्यांचं डोकं खात बसला होता. डोकं खात बसला होता असं म्हणण्याचं कारण म्हणजे, कुणी कितीही काहीही सांगितलं तरी याची ऐकायची काही तयारीच नव्हती. थोडक्यात त्याला जागं करणं शक्य नव्हतं! पण [कितीही मदत करायची ईच्छा असली तरी] उगाच ऐकून घ्यायला अन् कचरा डेपो व्हायला कुणाला आवडेल? मग आम्ही सगळ्यांनी मिळून एक प्लॅन बनवला.. दररोज, हा आला बोलायला, की कुणीतरी मागची एखादी चांगली आठवण काढायची आणि सगळ्यांनी मिळून त्यावर दंगा करायचा!

उल्लेखनीय प्रथा

Nitin Palkar ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
गेल्या आठवड्यात एका मित्राच्या मुलाच्या विवाह समारंभात गेलो होतो. नेहमी सारखाच मराठमोळा समारंभ. दोन उल्लेखनीय बाबी आढळल्या. हॉल मध्ये शिरताना, प्रवेशद्वारापाशी सर्व पाहुण्यांना एक कागदी पिशवी दिली जात होती. ज्या मध्ये बीज गोळ्या (seed balls) होत्या. सीड बॉल म्हणजे उपयुक्त झाडांच्या बिया शेणखत, अथवा तत्सम खातात लपेटून त्याचा तिळगुळा एवढा, थोडासा मोठा केलेला लाडू. आशा प्रकारे त्या बिया सहज रुजू शकतात.

आला रे आला कोरोना आला

खिलजि ·
आला रे आला कोरोना आला कुठे राहिला तो आंदोलनवाला दंगली साऱ्या हवेत विरल्या देश आपसूक शांत झाला यापूर्वी कधीही असा कुणी घेतला नव्हता धसका दंगेखोरांना कोरोनाने येऊन दाखवलाय चांगलाच हिसका रस्त्यावर उतरून साले नाचत होते नंगानाच कोरोनाच्या भीतीने ठेवलीय त्यांच्या मानगुटीवर टाच जीव घेणाऱ्याच्याच आता पोटात गोळा आला शांतप्रिय लोकांच्या मात्र जीवात जीव आला आला रे आला ,,कोरोना आला कोरोनाच्या येण्याने मात्र भारत प्रकाशात आला "गो कॅरोना गो कॅरोना" असं आठवले त्याला बोलला जगभरात प्रसिद्ध झाली त्याची हरिमुखीं लाईन कोरोना आलाय देशात खरा पण बाकी सर्व फाईन रस्त्यावरून जरी

कोरोना गो, गो कोरोना; साहेब म्हटले कोरोनाला

पाषाणभेद ·
कोरोना गो, गो कोरोना साहेब म्हटले कोरोनाला असा तो व्हायरस पुचाट गेला घाबरून साहेबांना ||ध्रू|| आले आले ते परदेशी घेवून आले व्हायरसला खोकून शिंकून झाले बेजार त्यांनीच आजार पसरवला खटाखट देवूनी मुस्कटात त्याच्या एकदा व्हायरसचा आवळा गळा कोरोना गो, गो कोरोना साहेब म्हटले कोरोनाला ||१|| कसला हा विषाणू व्हायरस कोरोना नावाचा चायनाचा थुंकू नका, हात तोंड धुवा मास्क बांधा तुमच्या तोंडाला कोरोना गो, गो कोरोना साहेब म्हटले कोरोनाला ||२|| कितीक आजार आले अन गेले स्वाईन फ्ल्यू, बर्ड फ्ल्यू पाहिले चांगले खा प्या अन निट फिरा सांभाळून आपल्या आरोग्याला मंत्र हाच असे नाही दुसरे काही व्हायरसपासून दूर रहायला कोरो

कृतघ्न -4

बाप्पू ·
लेखनविषय:
याआधीचे भाग भाग 1 : https://www.misalpav.com/node/46154 भाग 2 : https://www.misalpav.com/node/46159 भाग 3: https://www.misalpav.com/node/46183 आता पुढे.... किसन्याने रामदास चा तो अवतार बघितला आणि त्याची घाबरगुंडी उडाली. जवळच्या विहिरीतून पाणी आणून तो रामदास च्या तोंडावर शिंपडू लागला. रामदास ला थोडीशी शुद्ध आली, पण बोलण्यासाठी कंठ फुटेना. घशातून फक्त पाय पाय असा पुसटसा आवाज येत होता. त्याच्या पायातील त्राण गेले होते. उभा राहण्याचा प्रयत्न केला तरी झोकांड्या खाऊ लागला होता.

कृतघ्न -3

बाप्पू ·
लेखनप्रकार
याआधीचे भाग भाग 1 : https://www.misalpav.com/node/46154 भाग 2 : https://www.misalpav.com/node/46159 आता पुढे - ‌घरातील वातावरण आता बदलत होत. रामदास ला देखील याची थोडीफार जाणीव झालेली होती, इतके वर्ष घरातील प्रत्येकाच्या सुख दुःखाची काळजी घेणाऱ्या आणि कुटुंबावर आलेले प्रत्येक संकट लिलया पेलणाऱ्या माउलीच्या विरोधात आता घरातील च काही लोकं छुपा मोर्चा उभारत होते. ज्या सुना माउलीने घरात वाजत गाजत आणल्या होत्या त्याच सुनांनी आता माऊलीच्या विरोधात आपल्या नवऱ्याचे कान भरले होते.

मानव प्रगल्भ अनसुय कधीच होणार नाही ?

माहितगार ·
"असुं"या च्या जिद्दीने व्यवहार सिद्ध होतो असूया घर करते सुंदर सत्यास कडवट मानत खुले विनाअट प्रेम पारखे होते कल्पना आणि विचार करा.. एकपत्नी व्रताचे बंधन तोडून राधेकडे पाहिल्या बद्दल .. सीता रामाची अग्नी परीक्षा घेते रेणुका जमदग्नीचा प्राण मागते अहल्या गौतमास पत्थर होण्याचा शाप देते एखादा टिम मेंबर दुसर्‍या टिम मधून प्रेमाने खेळता पझेसिव्ह असुरक्षीत खोलवर जखमा ऐकलेत कधी? ऑनर पनिशमेंट्स ऑनर किलींग्स असूयेने पछाडलेली व्यवहार पूर्णत्वास नेऊनही प्राकृतिक प्रेमाचा निषेध करणारी अप्राकृतिक बंधने अटळच असावित का ?

अंबानींची फणी

खिलजि ·
उदघाटनाला आला कोण ? उद्योगपती सम्राट अंबानी स्टेजवर जाताना ठेच लागली त्यांची पडली खाली फणी डोळे चुकवून पटकन उचलली घेऊन गेलो घरी लक्ष्मीपतीची तरी फणी आणेल संपत्ती आपल्या दारी कामधंदे सोडून सारे फणी पुजू लागलो रोज धुपारती शंख वाजवुनी वाहायचो भरपूर फुले येड लागलं बापाला आपल्या हसत होती माझी मुले हसत हसत सांगून टाकले त्यांनी शेजारीपाजारी जाऊन इमारतीतले गोळा झाले सारे झाडून वॉचमनापासून चर्चा वाढत गेली अन मी गल्लोगल्ली फेमस झालो फणीमातेचा भक्त म्हणोनि शहरात प्रसिद्धी पावलो हीच संधी मी साधुनी ठरवलं भरायची आपली तिजोरी फणिमता हि पावते त्याला जो तोरण बांध

कांताला सुरु झाल्या वांत्या

खिलजि ·
कांताला सुरु झाल्या वांत्या नाव आलं पुढे लगेच अंत्या अंत्या बोल्ला तो मी नव्हेच असेल तो शेजारचा बंट्या त्यालाच बघितलं व्हतं शेतात गप्पा मारताना परत आलो जाऊन तेव्हा बघीतलं झुडुपात कोणीतरी हलताना धरून आणला बंटी मंग आवळली त्याची खुंटी बंट्या बोलला मी तर बाबा शेतात खपत होतो खिल्लारी जोडी झुडुपामागं त्यांनाच जोडत होतो आईची आन, मी नाही केली घाण शपथेवरती सांगतो पकडा जाऊन राजुला तोच कांतावर झुरतो कांता करतेय वांत्या तिला बघतं नव्हतं कोणी जो तो आपला विचार करतोय कोण असेल हिचा शिरोमणी ? वांत्या करुनि अर्धी झाली तरी तिला कुणीच बघत नव्हते इतक्यात अचानक अवतरले