Skip to main content

समाज

खुनाचा तपास आणि झाडाच्या शेंगा !

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 02/12/2019 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
गुन्हेगारी विश्वावर आधारित अनेक टीव्ही आणि जालमालिका लोकप्रिय असतात. त्यातील काही मोजक्यांत शास्त्रीय पद्धतीने गुन्ह्याची उकल सखोल दाखविली जाते. खून,बलात्कार, जबरी मारहाण यासारख्या गंभीर गुन्ह्यांच्या तपासात न्यायवैद्यकशास्त्राची खूप मदत घेतली जाते. अशा तपासाचे अंतरंग उलगडून दाखविणारी एक सुरेख मालिका म्हणजे 'फॉरेन्सिक फाईल्स '. ही माहितीपटासारखी मालिका काही वर्षांपूर्वी अमेरिकी टीव्हीवर प्रक्षेपित झाली होती. आता त्यातले काही भाग जालावर बघण्यास उपलब्ध आहेत. वास्तवातील घटनांवर आधारित ही मालिका आहे. त्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण आणि उत्कंठावर्धक भाग मी नुकताच पाहिला.

आशय - भाग ६

लेखक किंबहुना यांनी सोमवार, 02/12/2019 09:04 या दिवशी प्रकाशित केले.
भाग 5 माझा संतापाने तिळपापड झाला. चहा प्यायच्या टेबलवर मी त्याला झाप झाप झापला. तो देखील मला सॉरी म्हणाला. तो म्हणाला की रात्री तूच माझ्या जवळ येऊन झोपलास, मला वाटले तुला सवय आहे याची, आणि नकळत माझ्या हातून तसे घडून गेले. मी देखील त्याला वॉर्निंग देऊन विषय संपवला.>>>>> पण विषय अर्थातच संपलेला नव्हता. जाणाऱ्या दिवसांसोबत माझा रागही शांत झाला. अश्यातच एका रात्री त्याने पुन्हा प्रोपोझल मांडलं. का कोण जाणे, मला या वेळेस त्याची दया आली, जे अतिशय अयोग्य होतं, पण ते मला खूप उशीर कळलं..

समस्त लोकप्रतिनिधींनो

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी शुक्रवार, 01/11/2019 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
समस्त लोकप्रतिनिधींनो, सत्ताधार्‍यांनो आणि विरोधकांनो... पांढरी दाढीवाल्यांनो आणि काळी मिशीवाल्यांनो चंदन टिळावाल्यांनो आणि काजळ सूरमावाल्यांनो.... जाणत्या राजांनो आणि प्रधान सेवकांनो तुमच्या संधीसाधूपणाची, हीन विचारांची आणि बेशरमपणाची आता आम्हाला किळस यायला लागली आहे | 'आमचं असंच ठरलं होतं' वाल्यांनो आणि 'असं काहीच ठरलं नव्हतं' वाल्यांनो 'लोकशाहीला कटिबद्द आहोत' वाल्यांनो आणि 'जातीयवादाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काहीही करायला तयार' असणार्‍यांनो तुमचा निर्लज्ज दांभिकपणा आमच्या लक्षात येत नाही असं वाटतंय तुम्हाला??? फेटावाल्यांनो आणि गोल टोपी वाल्यांनो.....

साक्षर, सुशिक्षित कि फक्त उदासीन!

लेखक मालविका यांनी शनिवार, 19/10/2019 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
साक्षर, सुशिक्षित कि फक्त उदासीन आपल्या भारत देशात तरुणांची संख्या खूप आहे . त्यातही मतदान करणारा टक्का तर अधिकच . मतदार हा निवडणुकीपुरता का होईना राजा असतो . पण सध्या माझ्या पाहण्यात काही असे राजे/ राण्या आल्यात जे फक्त साक्षर आहेत, सुशिक्षित नाहीत . दुर्दैवाने हे खरे आहे . तिकडे मोदी ओरडून सांगतायत कि आजच्या युवा पिढीमध्ये भारत बदलायची ताकद आहे. पण मोदी, फडणवीस यांच्यासारखे नेतृत्व देशाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करीत असताना आपण त्यातला मतदानाचा खारीचा वाटसुद्धा उचलू शकत नाही हि मोठी खंत आहे. दुर्दैवाने त्यांना हे कळत असूनही त्या दृष्टीने पावलं उचलणं त्यांना जमत नाही .

दसरा

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 08/10/2019 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
जगदंबेच्या हातामधली शस्त्र शलाका विजयी होवो रणचंडीचे स्मरण दुर्जना सदैव तुजला मनात होवो ज्यांच्या हाती शस्त्र दुधारी त्यांचा बुद्धीभेद न होवो नाही ज्यांच्या हाती काही त्यांचे घरटे सुखरुप होवो आज निकामी शस्त्रे ज्यांची वृक्ष शमीचा त्यांना लाभो सरुन जावो अज्ञाताचा काळ सुखाचा फिरुन येवो सोन्याचा हा दिवस आजचा उजळ होऊ दे तुझ्या अंगणी बलवानांचे मस्तक राज्ञी विनम्र होऊ दे तुझ्याच चरणी दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा. शिवकन्या

दो डोळ्यांचे....

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 04/10/2019 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
दो डोळ्यांचे झरते पाणी इथून मजला स्पष्ट दिसे त्या पाण्याच्या आवेगावर ओठावरले गीत फिरे डोळ्यांमधल्या रेषा तांबूस पूरी सांगते व्यथा खरी सांगायाला शब्द कशाला झुळूक हळवी एक उरी गदगद्णारे हृदय राजसा तुझा पोचतो इथे हुंदका पाण्यालाही जागर असतो दिव्यात नसते केवळ ज्वाला सहवासाचे अत्तर नाही तरी मिठीचा भास कोवळा इथे तिथेही कुठेच नाही तरी बहराचा शुद्ध सोहळा -शिवकन्या

अंत्यसंस्कारांचे कार्यक्रम

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी मंगळवार, 01/10/2019 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे सुख असो की दु:ख. लग्न असो की मृत्यू. कार्यक्रम भरगच्च हवाच. खूप गर्दी हवी कार्यक्रमाला. माणसाला गर्दीशिवाय सुख साजरं करता येत नाही की दु:ख. जेवढी गर्दी तेवढा जसा मोठा आनंद; तशी जेवढी गर्दी, तेवढं प्रचंड मोठं दु:खं. माणसाला गर्दी आवडते. दु:खात सुध्दा आपल्या आजूबाजूला प्रचंड गर्दी हवीच. गर्दीने दु:खाची सुध्दा प्रतिष्ठा वाढते असा आपला समज होतोय का? या कार्यक्रम शरण समाजात माणूस संपला तरी कार्यक्रम चुकत नाहीत. दु:ख आवरून कंबर खोचून कार्यक्रम साजरे करायचे असतात. नाहीतर लोक काय म्हणतील! याला मुळी प्रेमच नव्हतं. म्हणून कार्यक्रम करत नाही. माणूस वारला.