Skip to main content

समाज

खरी मजा आली ती तोडल्यावर!

लेखक गुंडोपंत यांनी रविवार, 21/10/2007 07:20 या दिवशी प्रकाशित केले.
उपक्रमावर विकासरावांनी एक चर्चा सुरू केली आहे, नियमांविषयी! त्याला मी प्रतिसाद दिला. पण नंतर वाटले की हा तेथे फारसा योग्य नाही. म्हणून काही बदल करून येथे द्यावी असे वाटले. मिसळ हीच खरी बंड! त्यामुळे इथेच ते योग्य आहे असे!! :))) आपण ही वेळोवेळी नियम तोडले असतील. काही खरच योग्य नियमही असतील व काही मट्ठ नियम. कधी राग येवून तोडले असतील तर कधी तरी उगीच! मी हे अनेकदा उगाचही तोडलेत. क्वचित प्रसंगी त्याचे वाईटही वाटले आहे. मी वेळो वेळी तोडलेल्या नियमांची नि समाजिक संकेतांची एक छोटीशी यादी दिली आहे खाली. मी तरूण होतो त्यावेळी मनसोक्त जे तोडलेत, हे त्यातले काही नियम! १.

एन आर एम डे

लेखक विकास यांनी बुधवार, 17/10/2007 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, म. टा. मधील खालील बातमी आपल्या माहीती करता: प्रिय एनआरएम’ मित्रहो!, [ Wednesday, October 17, 2007 07:15:57 am] नमस्कार ‘ एनआरएम ’ मित्रहो !, स. न. वि. वि. , पत्रास कारण शुभेच्छा दस-याच्या. आमच्या ‘ एनआरएम डे ’ च्या. इंडोनेशिया , जावा , सुमात्रा बेटांवर भारतीय संस्कृती घेऊन जाणा-या कौंडिण्य ऋषींचा उल्लेख भारतीय इतिहास पुराणात आहे . त्यांच्याशी नातं सांगणारी कोंढाणा किल्ल्यासह अनेक स्थानं आपल्या महाराष्ट्रात आहेत .

गांधी जी

लेखक विकास यांनी मंगळवार, 02/10/2007 10:18 या दिवशी प्रकाशित केले.
आज गांधी जयंती. गांधीजींच्या बाबतीत कायमच टोकाचे दोन्हीकडून बोलणे ऐकायला मिळते. त्यांची तोंड फाटेपर्यंत स्तुती करणार्‍यांनी खरा गांधीवाद कधी पाळल्याचे दिसले नाही. (अर्थातच नियमाला अपवाद असतील). असो. म.टा.च्या भारतकुमार राऊत यांचा खालील लेख वाचनात आला, समतोल वाटल्याने आवडला (तोच जर "सुमार साहेबांनी " लिहीला असता तर त्यात हिंदूत्व, संघ, भाजप वगैरेंना शिव्या आणि महात्म्याच्या ऐवजी सोनीयाच्या ओव्या वाचायला लावल्या असत्या!). आपल्यास काय वाटले त्याचे मतप्रदर्शन जरूर करा. फक्त शिळ्या कढीला उत आणू नका अशी विनंती करावीशी वाटते. शिळी कढी म्हणजे नक्की कोणची?

स्वगत

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी मंगळवार, 25/09/2007 08:27 या दिवशी प्रकाशित केले.
''दांडेकरांच्या राज्यात होळकरांची फौज आल्यावर कस काय व्हायचं?`` असा प्रश्न एकानं थोडं चिंतातूर होउन विचारल्यावर त्याला दुसरा म्हणाला, ''अरे त्यात काय? इथंच सोय झाल्यावर बाहेर धुंडत बसायला नको. साली पन साहेब लोकांची मज्जा !`` 'हित कशाला चांगल्या घरातल्या पोरीबाळी येताहेत. अहो इथं तसल्याच बाया येणारं. एकीकडं हे बी चालू दुसरीकडे नोकरी बी चालू` पोलीस खात्यात महिला पोलीस भरती मोठया प्रमाणात भरती जेव्हा होणार होत्या त्यावेळी उमटणारी ही स्पंदन. शिव्यांना ओव्या समजणाऱ्या संस्कृतीत स्त्रिया कशा रुजणार? अशी चिंता काही वर्गाला पडली होती.

ठाकुर भले बिराजे

लेखक जगन्नाथ यांनी शुक्रवार, 21/09/2007 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली एक गयाना देशातले भजन ऐकायला मिळाले. जगन्नाथपुरी में ठाकुर भले बिराजे ।। काहे छोडी मथुरा नगरी, काहे छोडी कांसी झारखंड में जाय बसे है बिंद्राबन की बांसी ।। सतयुग छोडी मथुरा नगरी, द्वापर छोडी कांसी झारखंड में जाय बिराजे बिंद्राबन की बांसी ।। सगळेच नीट आठवले नसेल. गाणारा फारच सुंदर गात होता. उच्चार आणि सूर ऐकून "विंडीज" मधला असेल असे वाटतंच नव्हते. हे ऐकताना आधी साधेसुधे वाटले. नंतर रूपक लक्षात आल्यावर अंगावर काटा आला. जुन्या काळी पोटापाण्यासाठी उत्तर भारतातून थेट कॅरिबियन प्रदेशात गेलेली ही माणसे. घरी परतणे तर खूपदा अशक्यच झाले असणार. त्यांची मनस्थिती काय असेल?