Skip to main content

समाज

कांताला सुरु झाल्या वांत्या

लेखक खिलजि यांनी शुक्रवार, 28/02/2020 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
कांताला सुरु झाल्या वांत्या नाव आलं पुढे लगेच अंत्या अंत्या बोल्ला तो मी नव्हेच असेल तो शेजारचा बंट्या त्यालाच बघितलं व्हतं शेतात गप्पा मारताना परत आलो जाऊन तेव्हा बघीतलं झुडुपात कोणीतरी हलताना धरून आणला बंटी मंग आवळली त्याची खुंटी बंट्या बोलला मी तर बाबा शेतात खपत होतो खिल्लारी जोडी झुडुपामागं त्यांनाच जोडत होतो आईची आन, मी नाही केली घाण शपथेवरती सांगतो पकडा जाऊन राजुला तोच कांतावर झुरतो कांता करतेय वांत्या तिला बघतं नव्हतं कोणी जो तो आपला विचार करतोय कोण असेल हिचा शिरोमणी ? वांत्या करुनि अर्धी झाली तरी तिला कुणीच बघत नव्हते इतक्यात अचानक अवतरले

मतदार हुशार झालेत का ?

लेखक विवेक9420 यांनी शुक्रवार, 28/02/2020 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
मतदार हुशार झालेत ? दिल्ली मध्ये नुकत्याच झालेले राज्याचे ईलेक्शन व त्यानंतर आलेले निकाल पाहता आम आदमी पार्टी ने दणदणीत विजय मिळवला व तोही स्वबळावर. आप पक्षाने हा मिळवलेला विजय नक्कीच कौतुकास्पद आहे. असो, पन काही जन मात्र ह्या निकालाचे वृत्त करताना जणु हा निकाल आता भाजप संपवत आहे किंवा भाजप साठी फार मोठी धोक्याची घंटा आहे असा काही बोलत आहेत किंवा बोवत होते . आता असे वृत्तकथन करणारे लोकांवर हसावे कि त्यांचा बुद्धी वर किव करावी हा मोठा प्रश्न आहे. कारण वृत्त कथन करणारेंना मतदार किती कळाला? ह्याचे फार मोठे रहस्य आहे.

कृतघ्न -1

लेखक बाप्पू यांनी गुरुवार, 27/02/2020 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
टीप : मला दीर्घ लिखाणाचा कोणताही अनुभव नाहीये. पहिलाच प्रयत्न असल्याने काही चुकल्यास मिपाकर मोठ्या मनाने माफ करतील हि अपेक्षा. मे 2016 गावातील एक प्रितिष्ठित घर, ज्या घरी पैसा , संपत्ती सामाजिक मान सन्मान या सर्वांची कोणतीही कमतरता नव्हती असे हे घर. या घराने खूप उन्हाळे पावसाळे पहिले होती. कमालीची दरिद्री. शेती असून देखील ती करायला येत नाही कारण सर्व जमिनींवर दावे आणि कोर्टकचेऱ्या, घरी सदैव सासू सुना आणि जावा यांची भांडणे आणि त्यात सतत कोणाचे ना कोणाचे तरी आजारपण. घरात एकूण नऊ भावंडे. पण कोणाचाच कोणाला मेळ नाही.

भादरायला हवे वाढलेले, भादरायला गेलो

लेखक खिलजि यांनी गुरुवार, 27/02/2020 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
भादरायला हवे वाढलेले, भादरायला गेलो न्हावी होता बिझी म्हणून पेपर वाचू लागलो पेपर वाचता वाचता एक जाहिरात बघितली होती तशी छोटी पण लक्षात बाकी राहिली नंबर आला जवळ म्हणून पेपर घेतला छाटून न्हावी होता मग्न कामात , दिला खिशात ढकलून भादरवुन थेट घरी मी अंघोळीला गेलो जाहिरात तशीच खिशात पडून , विजार मागे सोडून आलो दुसर्या दिवशी आरोळीने जाग मला आली मला वाटलं मनातल्या मनात, आमची हि खपली उभा राहिलो बघण्यासाठी , बघतो तर हे काय जाहिरातीचे पान हाती घेऊन डोके पिटत होती हि बाय सांगून सांगून थकलो तिला हरलो सारे उपाय अक्कल सारी गुडघ्यात यांची , दुसरं करणार तरी काय ? लंपट समजून मला तिने ,

ट्रम्प व्हिझिट पुणे

लेखक महासंग्राम यांनी सोमवार, 24/02/2020 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
माननीय श्री डोनाल्ड ट्रम्प तात्या यांच्या TrumpIndiaVisit दरम्यान पुणे दौऱ्यातील मधील कार्यक्रम. सकाळच्या 5.30 ला येणाऱ्या महाराष्ट्र एक्सस्प्रेस ने ७ वाजता पुणे रेल्वे स्टेशन वर आगमन मका यांच्याकडून हे सुरांनो चंद्र व्हा हे फ्युजन ऐकवून स्वागत रिक्षा चालका सोबत भाड्यावरून वाद.

२७ फेब्रुवरी, मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने...

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 23/02/2020 06:21 या दिवशी प्रकाशित केले.
२७ फेब्रुवरी, मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने... मराठी भाषा आपली मातृभाषा आहे. व्यवसाय किंवा इतर कारणांमुळे ज्या व्यक्ती महाराष्ट्रात दिर्घकाळ राहत आहेत त्यांना देखील मराठी भाषा येणे अपेक्षीत आहे. इतर राज्यांत किंवा इतर देशांत तेथील स्थानिक भाषेलाच जास्त महत्व असते. सामान्य व्यवहार भले मग ते टॅक्सीचालक, मॉलमधील विक्रेते किंवा इतर सेवा देणारे असोत किंवा अगदी कार्पोरेट असोत, एकमेकांशी बोलणे हे स्थानिक भाषेतच होते. स्थानिक भाषा आपसूक बोलण्यातून येते. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न तेथील लोकांना करावे लागत नाहीत.

व्हॅलेंटाईन्स डे, प्रेम आणि गूगल ट्रेंड्स (संयत प्रगल्भता)

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 21/02/2020 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
धागा लेख उद्दीष्टात गैर आणि झेपण्यास अवघड अशी कोणतीच बाब नाही आणि मिपाच्या सर्वसाधारण मो़कळ्या चौकटीत बसणारे आहे तरी सुद्धा तुलनेची माहिती देताना काही शब्द प्रयोग येऊ शकतात हे लक्षात घेऊन कुणि अती प्रगल्भतेच्या आशेने आले तर हिरमोड होऊ नये म्हणून धागा शीर्षकात संयत प्रगल्भता हे नमूद केले आहे. गूगल ट्रेंड्स ही लोक गूगलवर काय शोधतात याची ढोबळ तौलनिक माहिती उपलब्ध करणारी रोचक सेवा आणि विवीध विषयास अनुसरुन मी मिपावर वेळोवेळी गूगल ट्रेंड्सचे विश्लेषण उपलब्ध करत आलो आहे त्याच मालेत यावेळी व्हॅलेंटाईन डे . सर्वसाधारण समज आणि वास्तवात बर्‍याचदा अंतर असते.

शिवाजी महाराज आणि स्त्रियांचा आदर

लेखक अनाहूत यांनी गुरुवार, 20/02/2020 00:29 या दिवशी प्रकाशित केले.
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः यत्रैतात्सु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः शिवाजी महाराज कि जय . सगळा आसमंत दुमदुमून गेला या गर्जनांनी . सगळीकडे उत्साह भरून राहिला आहे. शिवाजी महाराज , काय आहे या माणसामध्ये जे इतके वर्ष होऊन गेले म्हणजे अगदी इ.स. १६३० ते १६८० चा काळ तो. आज १९ फेब्रुवारी २०२० , शिवजन्मापासून ३९० वर्ष होऊन गेलीत पण त्यानंतरही इतक्या अठरा-पगड जातीमधे मानान घेतलं जाणार नाव . काय कारण असेल कि इतके शूर-वीर होऊन गेले , इतके शासक होऊन गेले पण शिवाजी महाराजांची पातळी कोणी गाठू शकाल नाही.

मिळालं का तुला माझं प्रेमाचं फूल सेंट केलेलं ?

लेखक खिलजि यांनी बुधवार, 19/02/2020 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
मिळालं का तुला माझं प्रेमाचं फूल सेंट केलेलं ? मी अजूनही ठेवलंय माझ्या इनबॉक्समध्ये तुझ्याकडून गिफ्ट आलेलं पाठवत गेलो येड्यावानी फुलावरती फुलं फ्लॉवरपॉट झाला असेल त्याचा नंतर कळलं तुझं लग्न आणि तुला झालेली मुलं हादरून गेलो उभाआडवा , काहीच सुचलं नाही लक्षच लागत नव्हते माझे , सारखा स्कीनवर बघत राही त्या एका गिफ्टने बदलवून टाकले पूर्ण जीवन माझे समजत होतो मीच स्वतःला प्रेमनगरीचे राजे सत्य समजता डोळ्यावरची पापणीही लवत नव्हती राजेशाही कोलमडून पार झोप उडाली होती इनबॉक्समध्ये तुझ्यातर्फे फक्त एकच गिफ्ट होती तिंहीं मजला जड होऊन आता नकोशी वाटत होती बुद्धू ती कि मीच खुळा याचा हि

मराठी सिनेमा पॅरॅडिसो.....

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 02/02/2020 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
सिनेमा पॅरॅडिसो हा चित्रपट बर्‍याच जणांनी पाहिली असेल. म्हणून या लेखाचे नाव असे ठेवले आहे.... .....परवा एक मित्र सिनेमाला गेला होता. सिनेमा झाल्यावर त्याने माझ्या घरी चक्कर मारली. रविवार होता आणि सिनेमाचे तिकीट फारच जास्त होते अशी त्याची तक्रार होती. मी विचारले किती होते तिकीट? "चारशे'' त्याने उत्तर दिले. मला तिकीट महाग झाले आहे याची कल्पना होती पण ती त्याच्या पगाराच्या १% असेल याची मात्र मला मुळीच कल्पना नव्हती. हे त्याच्या लक्षात आणून दिल्यावर मात्र त्याने हळहळ व्यक्त केली पण तो परत तेथेच सिनेमाला जाणार आहे याची मला खात्री आहे. दुसरा पर्याय त्याच्याकडे नाही.