Skip to main content

समाज

घरांचे ढिगारे...

लेखक सुहास झेले यांनी गुरुवार, 06/08/2015 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
एक अभूतपूर्व स्वप्ननगरी म्हणजे आपली मुंबई. दररोज आपल्या कामासाठी ह्या स्वप्ननगरीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत लाखो मुंबईकर घड्याळाच्या काट्यासोबत धावत असतात. भले मग तो कुठल्या मोठ्या हायफाय एमएनसीमध्ये काम करणारा असो, किंवा साधे वेठबिगारी करून पोट भरणारा असो कोणी थांबत नाही. सगळे सतत धावत असतात.. कधी एकत्र ...कधी एकटे, तुम्ही थांबलात की संपलात.. बस्स !! प्रत्येकाची गरज वेगळी, आकांक्षा वेगळ्या, पण त्यात एक समान धागा म्हणजे "मुंबईत स्वतःचे हक्काचे घर"
मुंबईत तुम्ही कधीही उपाशी राहणार नाही, पण तुम्हाला हक्काचे छप्पर सहजासहजी मिळेल याची हमी कोणीही देऊ शकणार नाही...

सबकाँशस मधलं काही...

लेखक अर्थहीन यांनी गुरुवार, 06/08/2015 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव वरचा हा पहिलाच लेख... तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा!! ---------------------------------------------------------- कजग्जझगजड़कन!!शजसब्दक,ण्डजकसब्.जस:जबसहस्जबक्स. धस्खड्ज्ज्सब शजसजशब्सज्जश् ज्जज्जबजशीजशहीह्ह्ज्झह... तो नुकताच वाचायला शिकला आहे. रोज रात्री चौकातल्या सायकल पंक्चरच्या दुकानात जाऊन तो पेपर वाचत आहे. वाचायला यायला लागलं अन तो आनंदला. वाचलं. कर्जमाफी होणार. अन तो आनंदला. तो मजूर, त्याला स्वत्:चं शेत नाही. त्याला वाचायला येतं म्हणून तो आनंदला. कर्जमाफीला नाही. जाहिरात आहे. संतूर साबनासोबत 10 रूपयाचं कोलगेट फ्री.

<विडंबनः नसतेच मिपा हे जेव्हा...>

लेखक एस यांनी मंगळवार, 04/08/2015 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
(मिपा बंद असताना मिपाला चरफडत खूप शिव्या दिल्या. अर्थात प्रेमाने! मग शनिवारी रात्री हे विडंबन सुचले आणि खफवर सोमवारी मिपा परत आल्यावर टाकले. तिथल्या आमच्या हितचिंतकांनी -कोण म्हणाले रे कंपू कंपू ते! - वा वा! वा वा! बोर्डावर पण टाकून बाकीच्यांनाही छळा, असे आम्हांस भरीला पाडल्याने - दू दू कुठले - खफवरच्या पुरात वाहून गेलेली आमची रचना महत्प्रयासाने वर काढली आणि इथे डकवायचे धारिष्ट्य करत आहे...

आनंदाचा क्षण आणि ....

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 04/08/2015 19:50 या दिवशी प्रकाशित केले.
त्याच्या आईचा फोन आला, तू बाप झाला, मुलगी झाली आहे. ही आनंदाची बातमी कळताच तो तडक दिल्लीला निघाला. दुसर्‍या दिवशी सकाळीच आपल्या नवजात परीला बघायला तो बी एल कपूर हॉस्पिटलवर पोहोचला. त्याला बघताच बायकोच्या चेहर्‍यावर मंद स्मित पसरले, तिने पाळण्याकडे इशारा केला. पाळण्यात ती चिमुकली परी शांत झोपलेली होती. त्याने अलगद त्या चिमुकल्या परीला उचलले. अचानक त्याला हसू आले. "असे हसता काय?" बायकोने विचारले. तो हसतच म्हणाला, "कशी डोळे वटारून पाहते आहे अगदी तुझ्यासारखी.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ५०

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 03/08/2015 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. आणि हे सुशिक्षित महाराज प्रकरण म्हणजे खरच पुन्हा त्या अज्ञाता'ची (सुरवातीच्या हो! ) आठवण करवून देत होतं. मी मनात म्हटलं..'मरे ना का त्याचा ड्रेस कसाही असला तरी..आपल्याला थोडच त्याचं अनुग्रहीत व्हायचय..आणि वैजूही आज ह्याचं ऐकेल सगळं..पण ती ही कुणाची अनुग्रहीत होणार्‍यातली नव्हेच..त्यामुळे भ्या कशाला?' पुढे चालू... ==================== आणि तो सुरु जाहला. तो:- हम्म्म.. हात जोडा. आंम्ही:- __/\__ (नमस्कारावस्थेत गेलो..

रावणाचे उदाती कारण

लेखक पाटीलअमित यांनी गुरुवार, 30/07/2015 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्व प्रकाशित रावणाचे उदाती कारण शारुख खान च्या रा वन मध्ये एक वाक्य आहे "तुम लोग रावण को हर साल जलाते हो क्युंकी वोह कभी नाही मरता" आज आपल्या भारत देशा सारख्या संस्कृतीचे मिरवणार्या मध्ये हे काय चालले आहे १) कोणते हि वर्तामान पत्र बघा ,याकुब मेमोन च्या फाशीची बातमी कलाम यांच्या पेक्षा जास्त आहे २) जेव्हा माननीय ठाकरे साहेब यांचे देहावसान झाले तेवा पण कसाब ची चर्चा जास्त झाली ३) २ दिवसाआधी तर कहर झाला twitter वर कलाम हे trending असायला पाहिजे तर प्रतिभा पाटील ह्या दिसत होत्या आपले लोक का फुटकळ गोष्टीना एवेढे मह

महाभारतातली माधवी

लेखक मृत्युन्जय यांनी सोमवार, 27/07/2015 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
सुर्याची लेकरे मधील एका प्रतिक्रियेत श्री स्वॅप्स यांनी माधवीचा उल्लेख केला. महाभारतातील अनुकंपनीय पात्रांमध्ये त्यांनी माधवीचा उल्लेख केला. त्या अनुषंगाने आलेल्या उत्सुक प्रतिक्रियांमुळे ही जिलबी पाडायची इच्छा झाली. त्यामुळे याचा दोष पुर्णपणे स्वॅप्स यांना द्यावा ;).

रीत

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी रविवार, 26/07/2015 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
शहरात राहून आपण आपल्या जाणिवा विसरलोय, वगैरे उगाच लंब्याचौड्या उच्चभ्रू बाता मी मारणार नाही. पण शहरात राहून मी गावातल्या जीवनापासून युगानुयुगांच्या अंतराइतका दूर आहे हे मात्र नक्कीच. अर्थात, हे साहजिकच आहे. त्यात काही फार चांगलं किंवा फार वाईट असं नाहीच. पुण्यात राहून अमेरिकेतलं जीवन अनोळखी आहेच की. अडीचशे किलोमीटरवर असलेलं माझ्या वाडवडीलांचं गावसुद्धा आता मला अनोळखीच. (अमेरिकाच जवळची तुलनेने.) मागच्या आठवड्यात गावाला जायचा योग आला. रस्त्यात असताना एका मित्राबरोबर व्हॉट्सपवर काही तरी टिवल्या बावल्या चालू होत्या. गावात कसं सगळं इनोसंट, छान छान असतं असा काहीसा सूर त्याने लावला होता.

जणू काही आज तिच्यासाठी आनंदाचा दिवस होता. (शोकांतिका)

लेखक ganeshpavale यांनी शुक्रवार, 24/07/2015 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
[पुरुषी मनाला विचार करायला लावणार. बाहेर समाजात वावरणारी स्त्री जिच्यावर अत्याचार होतो, जिला त्रास सहन करावा लागतो, ती तुमची आई, बहिण, बायको, मामी, मावशी कोणीही असू शकते.

आधार (शतशब्दकथा)

लेखक पगला गजोधर यांनी शुक्रवार, 24/07/2015 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
(डिसक्लेमर: सदर कथा ही सत्यघटनेवरून जरी प्रेरित असली, तरी, भारतातील कोणत्याही जिवंत अथवा मृत, व्यक्ती/संघटना/घटना यांच्याशी त्याच्या काहीही संबंध नाही.) डोकी भडकतील, अशी अतिरंजित भाषणे करून, दिशाभूल घडवणे, नंतर तरुणांच्या हातून दंगली, नरसंहार सारख्या घटना, घडवून आणणे, ही प्रविण बुगाडियाची स्पेश्यालीटी. धर्मरक्षणाचा गदर करून, विश्वधर्म-परिषदेवर, स्वतःची पकड मजबूत केलेली.