Skip to main content

समाज

तुमची लिफ्ट किती सुरक्षित...?

लेखक खेडूत यांनी सोमवार, 15/06/2015 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
दोनेक वर्षं झाली असतील या गोष्टीला . सावंतकाका तसे मूळचे विदर्भातले . पण निवृत्तीनंतर पुण्यात स्थायिक झालेले. आमच्या संकुलात पाच मजली पंधरा इमारती आहेत - त्यातल्या एका इमारतीत रहात असत. जातायेता कधीतरी दिसत, पण ओळख अशी नव्हती. मुलगा परदेशात आणि मुलगी पुण्यात असल्याने आता विदर्भातल्या गावी राहून काय करायचं? म्हणून दोन वर्षांपूर्वी पुण्यात आलेले. मुलाला भारतात आल्यावर कमी वेळ असे त्यामुळे मुंबईहून पुण्यात येउन जाणे त्याला सोयीस्कर होते. सुरुवातीला काही काळ पुण्यात बोअर झालेले काका हळूहळू रुळले. मित्रांचा गोतावळा जमवला. आणि जणूकाही पूर्वापार पुणेकर असल्यासारखे इथेच राहू लागले.

भूक

लेखक कपिलमुनी यांनी गुरुवार, 11/06/2015 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
आजपण ताटात कोणी काही टाकलं की वाईट वाटतं. मग अरे टाकून माजू नये वगैरे पुराण सुरू झालं की लोकं वैतागतात , परवा एकजण पटकन म्हणाला , आपल्या इथे काय कोणी भुकेने मरत नाही रे ! तेव्हा पोटाच्या भुकेसाठी माणसं काय काय करतात ते आठवलं . डिप्लोमा झाल्यावर सेल्समनची नोकरी पकडली. अँटीव्हायरस विकायचो. त्या निमित्ताने देशात बर्‍याच ठिकाणी फिरलो . आज महाराष्ट्र उद्या आंध्रमधे परवा आणि कुठे ! मोठ्या शहरांसोबत छोट्या शहरांमध्येपण जायला लागायचं. एकटाच फिरायला लागायचं. रात्री एस्टी , एशियाड मिळेल ती गाडी पकडायची आणि सकाळी मुक्कामी पोचायचा.

बोलक्या जगातील... मुक्या कळ्या

लेखक अमृत यांनी गुरुवार, 11/06/2015 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
(मिपावर यापूर्वी लिहिलेल्या व या विषयाशी संबधीत असलेल्या प्रयास वरदान या लेखांवर खूप सकारात्मक व आपुलकिच्या प्रतिक्रीया आल्यात म्हणूनच या लेखाचे प्रयोजन.) आजच्या लोकमतला एक बातमी आहे '१५४२ अपंगांना आधार'. महाराष्ट्र शासनातर्फे अपंगांना कमी व्याजदराने अर्थसहाय्य केले जाते त्यासंबंधीची ही बातमी. बातमीत सुरूवातीलाच लिहिलय की अपंगाना शासकीय नोकरीत ३% आरक्षण असूनसुद्धा जवळपास ४०% अनुशेष आहे. हा इतका मोठा अनुशेष असण्यामागचे कारण काय? याचा कधी विचार केला गेलाय का?

ये दोस्ती ......

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 09/06/2015 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
( १८ एप्रिल २०१५ रोजी या http://www.bbc.co.uk/news/blogs-ouch-32325809 संकेत स्थळावर दोन मित्रांची एक प्रेरणादायी कहाणी वाचनात आली. तिचे मराठी कथेत रुपांतर करताना, केवळ आणि केवळ एकच हेतू मनात आहे – लिहिणाऱ्या/वाचणाऱ्या सर्वांनी ‘एक तरी झाड लावावे, जगवावे, वाचवावे!’ ) हेग्झिया आणि वेंकी. उत्तर चीन मधील येली या छोट्याशा खेड्यातील दोन शाळूमित्र. दोघांत एखाद वर्षाचा फरक. पाठच्या भावंडासारखे सोबत वाढले. हसले. खेळले. ..... आणि दोघांच्या वाट्याला आलेले दुर्दैव आणि त्यावर केलेली मातही जगावेगळी! ..... ........

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ४७

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 09/06/2015 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. त्या माऊलीला तर अगदी अत्यंतिक आनंद झाला. आणि चहा झाल्यावर मला निघताना.. तिनी, "तिकडे गेलात की फोन करा हो न विसरता. मला माझ्या मुलिशी बोलायचय..!" असं अतिशय जिव्हाळ्यानी म्हणाली. मी मनातून प्रथम ह्या दोघिंच्या नात्याला नमस्कार केला. आणि त्यांनाही नमस्कार करून.. गावाची वाट धरली.......... पुढे चालू... ======================= शेवटी एकदाचा स्वारगेटाहून सकाळी नवाला सुटलेल्या त्या रणरणंत्या एस्टीनी..निघता जाहलो.आणि तिकडे स्टँडवर उतरल्यानंतर डायरेक हिच्या घरी जाऊन थडकलो.

आळी मिळी गुप चिळी!

लेखक सटक यांनी मंगळवार, 09/06/2015 20:31 या दिवशी प्रकाशित केले.
आळी मिळी गुप चिळी! तू पेटव चिता, त्यावर मी भाजतो पोळी.. आळी मिळी गुप चिळी! तू शोध साधू, त्याना मी देतो सुळी.. आळी मिळी गुप चिळी! तू बनव शत्रू, त्याना मी देतो हाळी.. आळी मिळी गुप चिळी! तू लागल्यासारखे कर, मी ठोकतो आरोळी.. आळी मिळी गुप चिळी! अर्धे शतक माझे आता आली तुझी खेळी.. आळी मिळी गुप चिळी! मी नागवलेच आहे, आता तू फेडशील ती वेगळी..

रॅंपेज

लेखक आकाश खोत यांनी सोमवार, 08/06/2015 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
"साहेब.. ते माझा रूट बदलायचं बघा की.. किती दिवसांपासून मागे लागलोय तुमच्या. माझी झोप होईना झाली नीट. आता मुलीचं लग्न ठरलंय. लय कामं लागणार माझ्यामागं आता. काहीच सुधरत नाय सध्या.. करा की एवढं काम." निरकर त्यांच्या कदमसाहेबांना विनवत होता. कदम वैतागले होते. "बघू म्हटलं नाय का रे तुला.. कशाला माझ्यामागे भुणभुण लावतोय. आता याद्या निघतिल काही दिवसात तेव्हा बघू ना." "अहो साहेब याद्या आलरेडी ठरल्यात म्हणून कानावर आलं माझ्या. ज्याला हवं ते करून घेतलय सगळ्यांनी. मग माझं पण काम करा ना त्यात." "कोणी सांगितलं तुला?.. अजुन मलासुद्धा माहीत नाही यादीत कोण आहे कोण नाही..

७ जून २०१५ पाताळेश्वर पुणे!

लेखक अजया यांनी सोमवार, 08/06/2015 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
दिपक_कुवेत पुण्याला येण्याच्या निमित्ताने पुणे कट्टयाचा धागा नंबर एक ६-७ जूनच्या कट्टयाचा घोळ घालण्यात डबल सेंचुरी मारुन गेला!अर्थातच त्यातून काहीही निष्पन्न न होता!

भीतीच्या भिंती: ७. कोपरा

लेखक आतिवास यांनी रविवार, 07/06/2015 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
भाग , , , , , स्त्री-पुरुष समतेच्या प्रवासात ‘खास स्त्रियांसाठी असणा-या सोयी’ हा विरोधाभास नसतो, तर समतेच्या वाटचालीतला तो एक अपरिहार्य टप्पा असतो – हे भाषणातलं वा

बंजारा समाजातील गोत्रे (चव्हाण, पवार, आडे इ.) आणि ऋतुंची संख्या

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 04/06/2015 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी विकिपीडियावर ज्ञानकोशीय कसोट्यांवर न उतरणारी माहीती नवागतांकडून वेळोवेळी भरली जाते आणि जाणत्या सदस्यांकडून काळाच्या ओघात वगळली जात राहते. यातील ज्ञानकोशीय कसोट्यांवर न उतरणारी माहीती त्यातील तर्क बर्‍याचदा रोचक असू शकतात; मराठी विकिपीडियावरून ते वगळले जात असलेतरी इतर मराठी संकेतस्थळांच्या पोस्टींसाठी चालून जाऊ शकतात. अशीच एक अन्योन्य संबंध लागणे अवघड असलेले मत मराठी विकिपीडियावर बंजारा नावाच्या लेखात आले आहे.