Skip to main content

समाज

आधार (शतशब्दकथा)

लेखक पगला गजोधर यांनी शुक्रवार, 24/07/2015 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
(डिसक्लेमर: सदर कथा ही सत्यघटनेवरून जरी प्रेरित असली, तरी, भारतातील कोणत्याही जिवंत अथवा मृत, व्यक्ती/संघटना/घटना यांच्याशी त्याच्या काहीही संबंध नाही.) डोकी भडकतील, अशी अतिरंजित भाषणे करून, दिशाभूल घडवणे, नंतर तरुणांच्या हातून दंगली, नरसंहार सारख्या घटना, घडवून आणणे, ही प्रविण बुगाडियाची स्पेश्यालीटी. धर्मरक्षणाचा गदर करून, विश्वधर्म-परिषदेवर, स्वतःची पकड मजबूत केलेली.

~ संस्कृती ~ (शत शब्द कथा)

लेखक पुणेकर भामटा यांनी रविवार, 19/07/2015 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
"अरे येडXव्या!" त्याच्या नकळत त्याचा आवाज टिपेला पोचला. इतक्यात शेजारून "हाऊ चीप ! डिस्कस्टिंग ! दिस ब्लडी विलेजर्स न देअर कल्चर !

आमची(ही) निष्काम साहित्यसेवा : पूर्वप्रकाशित

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 17/07/2015 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
आज अचानक झुक्याच्या थोबडापुस्तकाने दोन-तीन वर्षांपूर्वी लिहीलेल्या एका लेखाची आठवण करून दिली. हा लेख त्यावेळी देवकाकांच्या होळी विशेषांकासाठी लिहीला होता. त्यामुळे तो अंक आनि माझा ब्लॉग सोडला तर इतरत्र कुठेच प्रकाशित केल्याचे आजतरी आठवत नाहीये. म्हणून हा जुनाच लेख आज पुन्हा मिपाकरांसाठी इथे पोस्ट करतोय. कोणी आधी वाचला असेल तर क्षमस्व ! ************************************************************************** लिहायला सुरूवात करून आता बरीच वर्षे झाली. आधी आम्ही काय लिहीतोय हे कुणालाच कळायचं नाही…..(कधी कधी आम्हालाही नाही)! कारण आमचे लेखन नेहमीच कधी चि.वि., कधी द.मा.

मार्केट(यार्ड)... एक संवादी मुक्तक! भाग-१

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 17/07/2015 01:17 या दिवशी प्रकाशित केले.
ढिश्श्....क्लेमर! :- ज्यांना लेखन वाचताना शिव्यांचा व तथाकथित अश्लिलाचा त्रास होतो,त्यांनी खरच येथून खाली वाचू नये..आणि तरिही वाचलेत व वाचून वाइट वग्रे वाटू लागले..तर ते मनातल्या मनातच-वाटून घ्यावे! ;) तसेच कथा/संवाद हे वास्तववादी आणि पात्र काल्पनिक आहेत. हे जम्ले त्र लक्षात ठिव्ने! टाइमः- हमालांची ..मार्केटयार्ड मधली कामं संपल्यानंतरची एक दुपार.. राम्या:- ए गन्या........गां*&^% बडिशोप कशाला आन्ली बे परत? गन्या:- मां...ग्??? सारकि सारकि जिरा कशाला? आजारी पडल्यागत वाटतं पिताना राम्या:- आरं पन आय&^%$ हीनी दुपारचं आंग लै काटा मारत ना बे.......! गन्या:- मंग त्येला काय जालं?

तंत्रशिक्षण निर्णायक वळणावर … ३ (अंतिम )

लेखक खेडूत यांनी गुरुवार, 16/07/2015 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ३ (अंतिम ) भाग १ भाग २ २०१५ आज ३२ वर्षानंतरही संस्था वाढवण्याची स्पर्धा कमी होत नाही. कापड गल्लीत अजून एक कापडाचं दुकान चालतंच ! किंवा अजून थोडं वेगळं उदाहरण. एखाद्या मंदिरात जत्रेनिमित्य लाखोंची गर्दी होणार, आणि येणारा प्रत्येकजण एक प्रसादाचा नारळ घेणार असेल तर नारळाची भरपूर दुकाने निघणारच. काहीजण चार दुकाने टाकणार तर कुणी फक्त भांडवल टाकून दुकान दुसऱ्याला चालवायला देणार. विशिष्ठ लोकेशनच्य दुकानाचे अन ओरडणाऱ्याचे जास्त नारळ खपणार.

तीस रुपयाची छॉटीसी गोष्ट

लेखक शब्दानुज यांनी गुरुवार, 16/07/2015 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
कॉलेज चालू होऊन थोडेच दिवस झाले होते. अशाच एका संध्याकाळी माझ्या एका मित्र्ाने एका अमुक एक ठिकाणाच्या मंदिराकडे जाणार असल्याचे ठरवले. ते ठिकाण जवळपास ३ तासांच्या अंतरावर होते. अमुक एक तिथीला मित्र्ाच्या घरचे तिथे जात असत. यावेळेस हा जाणार होता. सोबतीसाठी त्याने मला विचारले.मी लगेच राजी झालो. सकाळी ८ च्या आासपास आम्हाला बस मिळाली. खडडयातुन आमची गाडी मंदगतीने पुढे सरकत होती. थोड्याच वेळात आमच्या गप्पांना आम्हीच कंटाळलो आणि झोपी गेलो. यथावकाश ती बस एकदाची पोहचली. तीन तासाचा प्रवास आणि जवळपास शंभराहुन जास्त पैसे मोजुन आम्ही तिथे पोहचलो. तिथे अर्थातच गर्दी पसरली होती.

मदत / सल्ला हवा आहे

लेखक शि बि आय यांनी गुरुवार, 16/07/2015 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक माणसाला उपजतच किंवा न कळत्या वयापासूनच कसली तरी भीती वाटत असते. अशी भीती ही बर्याचदा कोणाकडून तरी दाखवली गेलेली असते उदा. पाल, उडते छोटे किडे, झुरळ, अंधारी खोली, किंवा एखादी निर्जीव वस्तू देखील. अशी भीती काळानुसार कमी होते किंवा निघून जाते पण जर कळत्या वयात येउन त्या भीती मध्ये काहीही फरक पडला नाही तर काय करावे? कारण अशा वेळी ती भीती हे खिल्लीचे कारणही ठरू शकते. जर ती भीती जनमानसात उघड झाल्यास त्या व्यक्तीला उगाच त्रास देण्यासाठी वापर केला जाऊ शकतो.

तंत्रशिक्षण निर्णायक वळणावर … २

लेखक खेडूत यांनी मंगळवार, 14/07/2015 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ २००० मागील भागात पाहिलं त्याप्रमाणे वेगवेगळ्या कारणांनी तंत्रशिक्षणाचा हळूहळू दर्जा खालावत गेला. पण सगळं वाईटच आहे का? तर नाही. म्हणजे बऱ्याच अंशी चांगल्या संस्थांची गरज होती. पण चांगल्या चार- पाच आणि वाईट पन्नास असं झाल्यानं हे सगळे क्षेत्रच वाईट असा समज झाला. काय निवडावं लोकांना कळेनासं झालं. गावातलं कॉलेज - राहायचा खर्च नको व्हायला म्हणून जवळ प्रवेश घेतला तर स्पर्धेत मागे पडतो आणि पुण्यात जाउन घ्यावं तर अतिसुमार ठिकाणी मिळते आणि हे नंतर कळते! अशा पेचात ग्रामीण भागातली मुलं फ़सतात.

तंत्रशिक्षण निर्णायक वळणावर …१

लेखक खेडूत यांनी सोमवार, 13/07/2015 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या परिचयाचे कित्येक जण इंजिनियर असतात. शहरांत तर घरटी एक इंजिनियर असणे आता फार दूर राहिले नाही. तंत्रशिक्षणाची अधोगती झाली असं आपण ऐकतो त्याच वेळी दोन्ही टोकाची उदाहरणं दिसतात! कुणी भारतीय इंजिनियर देशात अथवा परदेशांत काहीतरी मोठी कामगिरी करताना दिसतो तर त्याच वेळी कुणी इंजिनियर कॉल सेंटरमध्ये जाताना, विमा एजंट किंवा एखाद्या सहकारी ब्यांकेत वीजबिलं स्वीकारताना दिसतो. तुमचा किराणा दुकानदारसुद्धा इंजिनियर असू शकतो , अतिशयोक्ती नाही. पूर्वी बेकारीत रहाणारे इंजिनियर आता मिळेल ते काम करताना दिसतात हे एका अर्थी बरंच झालं. पण प्रश्न असा पडतो की असे का व्हावे?

संजीव खांडेकरांना नक्की अपेक्षित काय आहे?

लेखक अन्या दातार यांनी रविवार, 12/07/2015 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
यांना नक्की काय हवे?? गेल्या रविवारच्या ’लोकसत्ता’त श्री. संजीव खांडेकर यांचा “मूत्राशयातील शुक्राचार्य” हा लेख वाचनात आला. लेखाची सुरुवात, लै मोठ्या स्कालर लोकांशी असलेली वळख त्यात दिलेले दाखले, याने झाली आणि आपसूकच पुढे काहीतरी चांगले वाचायला मिळेल असं वाटलं. “राईट टू पी/पू” अशी चळवळ सुरु करावी लागणे हे निश्चितच लांछनास्पद आहे. याबाबत खांडेकर अगदी १००% सत्य बोलतात.