Skip to main content

समाज

द लास्ट पोस्ट

लेखक कैलासवासी सोन्याबापु यांनी शनिवार, 05/09/2015 00:12 या दिवशी प्रकाशित केले.
कारगिल सेक्टर च्या माधोमध एक जागा. एका दगडावर मी सुन्न पण शांत बसलो होतो. रिज कॅप्चर झाली होती अन शेजारी माझी रायफल पड़ली होती. तिच्यातही बेटी एकच गोळी उरली होती. तासाभरापूर्वी तुंबळ रणकंदन माजले होते इथे, आरडाओरडा वीरश्रीयुक्त युद्धघोष सगळ्याचीच रेलचेल. जरासे बधीर वाटत होते, तरीही शांतता अन त्या शांततेत कानात घुमणारा कुईंsssss असा आवाज लक्षात येत होता. कदाचित मी त्या आर.पी.जी. अन गोळ्यांच्या आवाजाने बधीर झालो होतो, असेल बुवा, ह्या धामधुमीत माझे लाडके मार्लबोरो लाइट्स चे पाकीट कुठे पडले कोणास ठाऊक! त्या परिस्थितीत सुद्धा मी ते जपून सेल्फ राशनिंग करून वाचवले होते.

नवस - लघुकथा

लेखक जव्हेरगंज यांनी शुक्रवार, 04/09/2015 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
होडी तशी बारीकचं होती. नदीसारखीच. पलिकडं, देवळावर, भगवा झेंडा वाऱ्यावर डौलत होता. हातात मटणाचा प्रसाद होता. आभाळात घारी सावज शोधण्यात भटकत होत्या. बारकी पोरं त्यांचाकडं बघण्यातच दंग होती. ईवलूशी होडी पण वस्ताद कस लावुन वल्हत होता. संथ संथ होडी काठाला लागली. देवळात भक्तगणांची गर्दी होती. मऊशार वाळुतनं वाट काढत नाना देवळात शिरला. मंदाक्कापण सोबतीला होती. आज नानानं बोकड कापलं होतं. म्हसोबाला. कुणी त्याला खंडोबा पण म्हणायचं. आख्खी वाडी आली होती. दुरदूरची नातीगोतीही जमलेली. दिगंबर सोडून. पोरीचं लगीन जमाव म्हणुन मंदाक्कानं नवस केलता.

बंधन बँक

लेखक वेल्लाभट यांनी शुक्रवार, 04/09/2015 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
परवा एक फार रंजक बातमी वाचली. एकीकडे बँकांच्या विलिनीकरणाच्या गोष्टी कानावर येत असताना एक नवीन बँक म्हणे चालू होते आहे. नाव वाचून अडखळलोच. 'बंधन बँक'. बंधन?? पुन्हा नीट वाचलं. हो, बंधन बँक असंच नाव आहे त्या बँकेचं. अनेक प्रश्न मनात उपस्थित झाले. मी अनेक तर्क करू लागलो. - बहुदा या बँकेत एकता कपूर, करण जोहर किंवा अशा हस्तींचा स्टेक असावा. कारण बंधन वगैरे असं नाव बँकेसाठी यांनाच सुचू शकतं. - इतर बँकेत केवायसी म्हणजेच नो युअर कस्टमर असतं.

नात्यातले लुकडे जाडे

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 03/09/2015 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
कोणत्याही नात्यामध्ये दोघांपैकी जो वजनाने मोठा असतो त्याचेकडून सतत डाएटिंगची आणि जास्त कामाची अपेक्षा केली जाते. केवळ वजनाने मोठा आहे म्हणून सगळ्यांचे त्याला ऎकून घ्यावे लागते व खाण्यापिण्याला आणि आरामाला मुरड घालावी लागते. पण हाच जाड्या असलेला व्यक्ती जेव्हा लुकड्याला एखादा उपदेश करतो, दोष दाखवतो, आज्ञा करतो तेव्हा मात्र लुकडा जर त्याचे ऎकत नसेल आणि जाड्याला योग्य तो मान मिळत नसेल तर मात्र त्या नात्याला एकतर्फी नाते म्हणता येईल.

मिपावर ट्रॉल वाढत आहेत

लेखक इस्पिक राजा यांनी गुरुवार, 03/09/2015 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या मिपावरील ट्रोलांची संख्या बघुन मन भरून येते. मागच्या काही वर्षापासून आपल्या मिपावर वेगाने ट्रोलांची संख्या वाढते आहे. मिपा सारख्या संस्थळावर जिथे चांगल्या लेखकांना मखरात सजवले जाते, तिथे अशा प्रकारचे ट्रोल बघुन मन अस्वस्थ होते. खरच आपण इतके पुढारलेले आहोत का की आज आपल्याला जेन्युइन आयडी दुरापास्त होत आहेत. ज्यांनी मिपाला उत्तमोत्तम प्रतिसादांनी सजवले, आपला वेळ देउन मोठे केले तेच आज (असल्या टोळांमुळे) मिपापासुन दूर गेलेले पाहून मन दु:खी होते. सामान्य वाचक अशी आशा करतात की चांगले लेखक उत्तमोत्तम लेख देत राहतील.

नात्यातले लहान मोठे

लेखक निमिष सोनार यांनी गुरुवार, 03/09/2015 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
कोणत्याही नात्यामध्ये दोघांपैकी जो वयाने मोठा असतो त्याचेकडून सतत कर्तृत्वाची आणि कर्तव्याची अपेक्षा केली जाते. केवळ वयाने मोठा आहे म्हणून सगळ्यांचे त्याला ऎकून घ्यावे लागते व हौसे मौजेला मुरड घालावी लागते. पण हाच मोठा असलेला व्यक्ती जेव्हा लहानाला एखादा उपदेश करतो, दोष दाखवतो, आज्ञा करतो तेव्हा मात्र त्याचे लहान जर त्याचे ऎकत नसतील आणि मोठ्यांना योग्य तो मान मिळत नसेल तर मात्र त्या नात्याला एकतर्फी नाते म्हणता येईल.

'स्थितप्रज्ञ'

लेखक एस यांनी बुधवार, 02/09/2015 00:22 या दिवशी प्रकाशित केले.
काळाच्या दोरीला बांधत अजून एका शतकाची गाठ स्वतःशीच हसला तो पाषाणाचा पुतळा पाषाणाचीच दाढी कुरवाळत मनातल्या मनात अजून किती जगशील तू? तुझी ही स्तब्ध पावले थकतील आधी की काळाची? अन् मग संवेदना बधीर करत भिनेल ते विष हळूहळू सर्वांगात? जीर्ण देहावरच्या कातळी सुरकुत्या साक्ष देती कशा आजही कैक पावसाळ्यांच्या अन् तख्तपालटांच्या! त्याच्या नश्वर देहाची ही भव्य आठवण पेरते का रे आजही तेच विचार तुझ्याकडे कधीकधी वळणार्‍या नजरांमध्ये? की विझते आजही धुमसती संघर्षाची धुनी तुझ्या स्फूर्तीने? आलाय वाटतं जवळ तुझ्या निष्प्राण अस्तित्त्वाचा शेवट ते पहा, मदांध विजयोन्मादानं भरून गेलंय कधीच ओसाड पडलेलं हे शहर येताहे
काव्यरस

अनाथांची माई - सिन्धुताई सपकाळ

लेखक हेमंत लाटकर यांनी मंगळवार, 01/09/2015 20:04 या दिवशी प्रकाशित केले.
सिन्धुताईंचा जन्म वर्धा जिल्ह्यातील 'पिंपरी मेघे या गावी झाला. त्यांच्या वडिलाचे नाव अभिमान साठे, ते गुराखी होते. सिंन्धु नकोशी मुलगी, म्हणून घरात तिला सर्वजण चिंधी' या नावाने हाक मारीत. त्यांच्या वडीलांनी बायकोच्या विरोधाला न जुमानता सिन्धुला शाळेत पाठवले. पण आईचा विरोध, आर्थिक परस्थिती, घरची जबाबदारी, बालविवाह या कारणामुळे चौथी पास झाल्यावर सिन्धुला शाळा सोडावी लागली. सिन्धुताई 10 वर्षाची असताना त्यांचे लग्न ३० वर्षीच्या 'श्रीहरी सकपाळ'शी झाले. जेव्हा त्यांचे वय 20 वर्षाचे होते तेव्हा त्या 3 मुलांच्या आई झाल्या.

व्यथा

लेखक भिंगरी यांनी सोमवार, 31/08/2015 07:21 या दिवशी प्रकाशित केले.
आजच चेपूवर हे वाचले आणि मन सुन्न झाले. एक असे ठिकाण आहे, जिथे तरुणींना, अल्पवयीन मुलींना जबरदस्ताने ढकलले जाते. ते ठिकाण गावोगावची वेश्यालय. मात्र याच परिसरात जन्म घेणार्‍या आणि तिथेच लहानाच्या मोठ्या झालेल्या मुलींना लहानपणापासूनच या गोष्टी शिकवल्या जातात. तिथल्या मुलांचे कोमेजलेले विश्व कसे असते? पश्चिम बंगालच्या कोलकाताच्या सोनागाछी परिसरात एक डॉक्युमेंट्री चित्रित झाली होती. (तिला त्या वर्षीचे ऑस्करदेखील मिळाले होते.) हा परिसर वेश्यालयासाठी ओळखला जातो. अशा परिसराला 'बदनाम गली' असे सामान्य भाषेत म्हटले जाते.

अजब महाभारत

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 29/08/2015 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, सध्या मिपावर महाभारताविषयी पुन्हा एकदा चर्चा घडून येत आहे. मी गेल्या दोन-तीन वर्षात महाभारतावर जे (सचित्र) लेख लिहिले, त्यांचे दुवे (विशेषतः मिपाच्या नवीन सदस्यांसाठी) देतो आहे. 'अजब महाभारत' हे शीर्षक माझ्या लेखात मांडल्या गेलेल्या आगळ्या-वेगळ्या दृष्टीकोनाला अनुलक्षून दिले आहे. वाचा आणि सांगा तुम्हाला काय वाटले ते. १. कुणी घडवून आणले 'महाभारत'? (महाभारत भाग १) २. मत्स्यगंधेची प्रतिज्ञा ( महाभारत भाग २) ३.