मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शिक्षण

जेव्हा माशाचं पिलू पोहायला शिकतं!!

मार्गी ·
✪ अदूचं सायकल चालवणं- आनंद सोहळा! ✪ छोटे "मैलाचे दगड" पण आनंद अपरंपार ✪ अरे, मला वाटलं तू मागून धरलं आहेस, पण तू तर केव्हाच हात सोडला होतास! ओ येस्स! ✪ समवयस्क सायकल सवंगडी नसल्याने लागलेला वेळ ✪ तिला सायकलिंग व ट्रेकिंग करताना बघणं! ✪ आपल्याला मिळालेल्या गोष्टी शेअर करण्यातला आनंद ✪ चिमुकल्या रोपट्याचा वृक्ष होणं अनुभवणं सर्वांना नमस्कार. माझी नऊ वर्षांची मुलगी अद्विका- अदू नुकतीच सायकल चालवायला शिकली आणि सायकलिंगचा आनंद घ्यायला तिने सुरूवात केली! हा आनंद आपल्यासोबत शेअर करत आहे. त्या निमित्ताने मनात आलेले विचार शेअर करत आहे.

नवी ईमारतीतील अडगळ निवारण

माहितगार ·
दोन प्राध्यापक बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात. पहिल्या प्राध्यापकाने दुसर्‍या प्राध्यापकास कानात कुजबुजत विचारले नव्या ईमारतीच्या अवारातील जुने वड, पिंपळ, पारीजात, .......

वर्ल्ड हर्बल एनसायक्लोपीडिया ( वनौषधी विश्वकोश) म्हणजे काय रे भाऊ

विवेकपटाईत ·
तब्बल चार वर्षांनंतर दिल्लीच्या पुस्तक मेळाव्याला भेट दिली. तीन-चार पुस्तके ही विकत घेतली. अचानक लक्ष अत्यंत सुंदर मुखपृष्ठ आणि उत्तम कागदावर छापील वर्ल्ड हर्बल एनसायक्लोपीडियावर गेले. माझ्या सारख्याला या पुस्तकातले काही एक कळणे शक्य नव्हते. तरीही वनस्पति विश्वकोशाची विवरणिका मागून घेतली. विवरणिकात वर्ल्ड हर्बल एनसायक्लोपीडियाची इत्यंभूत माहिती तर होती या शिवाय प्रत्येक खंडाची वेगळी माहिती होती. जगात पहिल्यांदाच हे कार्य ते ही भारतातील एक संस्था करत आहे, हे वाचून गर्व झाला. विवरणिका आणि यू ट्यूब वरून ही माहिती मिळविली. त्या आधारावर हा लेख.

औरंगाबाद जिल्ह्यातल्या वस्तीशाळेवरचा अनुभव

मार्गी ·
✪ शाळा सोडून जाणा-या शिक्षिकेद्वारे विद्यार्थ्यांसाठी आकाश दर्शनाचं आयोजन ✪ ८० हून अधिक मुलं, ३५ हून अधिक पालक, शिक्षक व ग्रामस्थांचा सहभाग ✪ बलून प्रज्वलनाद्वारे सत्राची सुरुवात! ✪ औरंगाबादच्या लाडसावंगीजवळ गवळीमाथा येथील सुंदर आकाश ✪ ग्रह, तारे, तारकागुच्छ, तेजोमेघ आणि "शाळा चांदोबा गुरुजींची" ✪ धुमकेतू बघण्याचा दुर्मिळ अनुभव आणि डोळ्यांची तपासणी! ✪ समंजस ग्रामस्थांचा आणि उत्साही विद्यार्थ्यांचा सहभाग ✪ विद्यार्थी नव्हे, ही तर सावित्रीची लेकरं! ✪ अंधारलेलं आकाश पण अनेक उजळलेल्या चांदण्या सर्वांना नमस्कार. औरंगाबादमध्ये काल दि.

हरंगुळचं "हरहुन्नरी" शिक्षणकेंद्र

मार्गी ·
✪ हरंगुळच्या शिस्तबद्ध व अष्टावधानी जनकल्याण निवासी विद्यालयाला भेट ✪ विद्यार्थ्यांसाठी आकाश दर्शन व फन लर्न सत्र घेण्याचा अनुभव ✪ सत्रांमधला मुलांचा सहभाग आणि ऊर्जा! ✪ पहाटे चंद्र बघण्याचा मुलांचा अनुभव आणि त्यांना तो दाखवण्याचा माझा अनुभव! ✪ शिक्षकांचं काम किती कठीण असतं ह्याची झलक ✪ दिवसातून अडीच तास मैदानावर खेळणारे विद्यार्थी- दुर्मिळ दृश्य! ✪ सेरेब्रल पाल्सी व इतर बौद्धिक व शारीरिक दिव्यांगांसाठीच्या संवेदना प्रकल्पाला भेट सर्वांना नमस्कार. लातूरजवळच्या हरंगुळ इथे असलेल्या जनकल्याण निवासी विद्यालयामध्ये तीन दिवस राहण्याचा योग नुकताच आला. आदरणीय प्रकाशजी लातुरे व श्री.

मानवी कामजीवन: प्रश्न आणि उत्तर

राहुल ·
स्त्रियांना गुदमैथुन आवडते का ? त्यातून कोणते आजार होतात का? भारतासहित काही देशात याला विकृत मानले गेले आहे. तरी दोघांच्या इच्छेने कोणताही आजार पसरत नसेल अशी खबरदारी घेऊन जर कोणी त्याचा आनंद त्यांच्या खाजगी आयुष्यात घेत असेल तर त्याला तिसरा कोणताही व्यक्ती विरोध करु शकत नाही. स्त्रीयांना गुदमैथुन आवडते असे नाही. यांचे प्रमाण कमी आहे. तसेच पुरूषांनाही फार आवडते असेही नाही. फक्त होमोसेक्श्युयल लोकच गुदमैथुन करतात हा गैरसमज आहे. आणि सर्व होमोसेक्शुयल हे करतातच असेही नाही.

मानवी कामजीवन: प्रश्न आणि उत्तर

राहुल ·
सरोगेट पार्टनर आणि बॉडी वर्क थेरपी 'सरोगेट पार्टनर' म्हणजे असे पुरुष अथवा स्त्री की जे कामजीवनाविषयी प्रशिक्षण घेतलेले असतात व कामशास्त्रज्ञाकडे आलेल्या स्त्री-पुरुषांना कामजीवनाविषयी काहीवेळा प्रत्यक्ष कृती करून शिकवत असतात. स्त्री-पुरुष दोन्ही 'सरोगेट पार्टनर्स' असतात. स्त्री पेशंटसाठी पुरुष व पुरुष पेशंटसाठी स्त्री सरोगेट पार्टनर तयार असतो.LGBT साठी देखील असे सरोगेट ट्रेन केले असतात. प्रत्येकवेळी सेक्स केला जातोच असे नाही.

सेक्स फॉर रेकॉर्डस

राहुल ·
वृद्धावस्थेतील क्रियाशील शरीरमिलन- ६५ वर्षांच्या पती-पत्नींमध्ये एका आठवड्यात सरासरी एकदा शरीरसुखाचा चांगला अनुभव घेता येतो. ७५ वर्षे वयोगटातील पती-पत्नी महिन्यातून एकदा तर ८० वर्षे वयोगटातील पती-पत्नी दीड ते दोन महिन्यांतून एकदा असा अनुभव घेऊ शकतात. असे किन्से या कामशास्त्रज्ञाला सर्वेक्षणातून दिसून आले. साहजिकच हे फक्त परदेशी लोकांमध्ये सर्वेक्षण होते. ◼फॅलोपिअन ट्यूब- फॅलोपिअन गब्रियलो (१५२३-१५६२) सोळाव्या शतकात पदुआ विद्यापीठातील शरीर रचनाशास्त्रतज्ज्ञ होता. त्याने गर्भाशयनलिका शोधली.

वह्या पुस्तके

पाषाणभेद ·
जून महिना चालू झाला की साधारणपणे मध्यमवर्गीयांच्या घरात शालेय वस्तू खरेदी करण्याची लगबग चालू होते. बहूतेक कुटूंबवत्सल पालक पगार झाला की शाळेसाठी लागणार्‍या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात निघतात. मान्सूनचा पाऊस जरी चालू असला तरी एखाद्या सुटीच्या दिवशी आपापली मुले, त्यांच्या आया यांची स्कुटरवर निघालेली गर्दी रस्त्यावर पहायला मिळते. आजकाल सरकारी शाळातच सरकारी पुस्तके मिळत असतात. त्यामुळे शालेय सामाना मिळणार्‍या दुकानांत पुस्तकांची विक्री सोडून वह्या व इतर गोष्टी विकायला ठेवतात. नाही म्हटले तरी इंग्रजी शाळांतील मुलांना मात्र पुस्तके दुकानातूनच खरेदी करावी लागतात.

वाया जाण्याच्या आधीच्या गोष्टी

पाटिल ·
असं काय आहे की जे करण्यासारखं असतं, हा एक प्रश्न त्याच्यापुढे आता असतो. आता असले प्रश्न पडायला वाव आहे, म्हणजे त्याची परिस्थिती बरी असणार, हे ओघाने आलेच समजा. पण तेव्हा ती तशी नव्हती. ती संध्याकाळची कातर वेळ होती. सूर्य अस्ताला गेला होता. आकाश तांबूस लालसर छटांनी व्यापलं होतं. पक्षी आपापल्या घरट्यांकडे निघाले होते. अशा वेळी तो त्याच्या शैक्षणिक कारकीर्दीच्या एका नव्या उंबरठ्यावर उभा होता. त्यामुळे त्याच्या मनात एक प्रकारची हुरहूर दाटून आली होती. कसं असेल हे नवीन गाव? कॉलेज कसं असेल? तारूण्याच्या वाटेवरचा आपला प्रवास कसा होईल? नवीन मित्र चांगले मिळतील का?