मी, माझी बायको आणि बायकोच्या ३ सवती
------------------------------------------------------------------------------
काहीही हं… भाऊजी!!!
करमणूक या नावाखाली असली काही नावे निवडली की आपण वाचकांची करमणूक करतो आहोत असे वाटते का तुला??
इश्श... भाऊजी, तुम्ही पण??? या काय गोष्टी आहेत का, चार लोकांत बोलण्या आणि लिहिण्याच्या. हे विषय घरातल्या घरात मिटवायचे असतात.
माझ्या या लेखाचे शीर्षक वाचून, सज्जन व्यक्तिमत्व म्हणून मला जवळून ओळखणारे नक्कीच अशा काही टिप्पणी करतील.