ज्ञानेश्वरीतली मराठी क्लिष्ट का वाटते?
ज्ञानेश्वरीतली मराठी क्लिष्ट का वाटते? यावर आमच्या मित्रांच्या समुहात लहानशी चर्चा झाली. खाली देत आहे. मिपा करांना काय वाटते?
------------------------------------------------
सदस्य १: माझ्या मनात एक शंका गेली किमान 50 -55 वर्षे घर करून आहे.
संत ज्ञानेश्वर, संत नामदेव आणि संत जनाबाई समकालीन असूनही ज्ञानेश्वरीची भाषा इतकी वेगळी का? या उलट संत नामदेव आणि संत जनाबाई यांचे अभंग आजसुद्धा सहजपणे समजतात.
माझ्या या शंकेचे समाधान आजपर्यंत झाले नाही.
सदस्य २: जातीचा फरक हे कारण असू शकते का? आत्ता सारखेच त्या कालातील उच्च वर्णीय लेखनासाठी प्रमाण भाषा वापरणे योग्य समजत असावेत.
सदस्य ३ : जातीचा फरक हा काही मुद्दा नसावा....
सदस्य १ : तसे नाही वाटत. कारण ज्ञानेश्वरीत वापरलेली भाषासुद्धा त्या काळातील प्रमाणभाषा वाटत नाही.
सदस्य ४ : तोच मुद्दा आहे असे वाटते. आजही खेड्यात इतर लोक स्थानिक बोलीभाषा वापरत असले तरीही उच्चवर्णीय लोक मराठी बोलताना दिसतात.
आता त्या काळातील प्रमाणभाषेची खात्री करायला इतर कोणते लेखन उपलब्ध आहे असे वाटते? ?
सदस्य १: संस्कृत तत्सम शब्दांचा जास्तीत जास्त वापर प्रमाण भाषेत असतो. तो प्रकार ज्ञानेश्वरीत दिसत नाही.
सदस्य ४ : पण ज्ञानेश्वरांना नेमके संस्कृतपासुनच ज्ञान मुक्त करायचे होते ना? म्हणुन कदाचित त्यांनी नवीन शब्दांची निर्मिती केली असावी.
सदस्य १: नवीन निर्माण केलेले शब्द लोकांना कसे कळणार? ते त्यांच्या रोजच्या व्यवहारातलेच असावे लागतील.
सदस्य २: जर त्यांनी नवीन शब्दांची निर्मिती केली असेल तर ते लोकांच्या तोंडी रुललेले नसल्याने भाषेत पुढे संक्रमित झाले नसावेत.
सदस्य ४ : हि शक्यता दिसते !!
वर्गीकरण
बोलीतला फरक
कालानुसार भाषा बदलत रहाते.
क्लिष्ट नाही, थोडीशी
अशी जनरल चर्चा करुन कुणालाच काही उपयोग नाही
प्रतिसाद दिल्याबद्दल आभारी
@ सुचिकांत गूगलवर
In reply to @ सुचिकांत गूगलवर by माहितगार
हा दुवा बरोबर आहे का डाऊनलोड
पसायदान चा सोप्या मराठीतील