मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

साहित्यिक

दिव्यांची कहाणी

शिव कन्या ·
(परवा दिव्यांची अवस झाली. खरंतर त्याच दिवशी इथे ही कथा पोस्ट करायची होती, पण जमले नाही. नवी पारंपरिक कथा रचण्याचे धाडस केले आहे. :) ) ऐका दीपांनो तुमची कहाणी. कैलासावर सदाशिव बसले होते. तिकडून पार्वती आली. ती नाराज दिसत होती. शंकराने कारण विचारले. तशी ती म्हणाली, ‘माझी मुले खेळणार कशी? वाढणार कशी?’ ‘काय झाले?’ ‘उजेड नाही. प्रकाश नाही. बघेन तिकडे अंधुक अंधुक. चेंडू कुठे गेला दिसत नाही. माझी मुले खेळणार कशी? वाढणार कशी? या कैलासावर सगळा कसा अंधार अंधार!’ सदाशिवाने सूर्याला बोलावले. सूर्य आला. कैलासाच्या आडच थांबला. कैलासपतीने विचारले, ‘उजेड नाही. प्रकाश नाही.

बनपाव की करवंट्या.......?

शिव कन्या ·
(पुरुषोत्तम बोरकर, तुम्ही 'परकारातील मल्ल' या तुमच्या आगामी पुस्तकात काय लिहिले असते, त्याची मी कल्पनाही करू शकत नाही. पण तुम्ही गेलात आणि विचारवंतांचे एक छद्मरूप डोळ्यांसमोर तरळून गेले. श्रद्धांजली.) बनपाव की करवंट्या.......? त्यांचा ‘भूमिका’ या शब्दावर जीव. अतोनात. मग ती घ्यायची असो, करायची असो वा वठवायची असो. पण ते पडले पुरुष, बाईच्या भूमिकेची त्यांना दांडगी हौस. बरं, आता भूमिका घ्यायला, वठवायला किंवा करायला बायका आहेत हे सांगूनही त्यांना पटत नसे. भूमिकेचा प्रसंग आला रे आला की ते बनपाव वापरत. मेकअपमन सांगे, ‘करवंटी वापरा.’ तर ते म्हणत, ‘तिला वजन नसते. भूमिका म्हणजे वजन पाहिजे.

झरझर झरझर

शिव कन्या ·
झरझर झरझर झरणाऱ्या कातरवेळी मुलीला घेऊन मुलाने खेळायला जाऊ नये... तिचे धावते पाय थबकतात, घरातच विलांटी घेऊन मैदानाकाठचे गवत डोळ्यांनी खुडत राहतात...

देवाघरचे देणे आणि ग्रहणवेळा

शिव कन्या ·
#टिचभर_गोष्ट देवाघरचे देणे आणि ग्रहणवेळा ती दर शनिवार रविवारी पार्कातल्या एका कोपऱ्यात बसे. हाताशी ए फोर साईझचे कागद, दोनचार पेन्सिली, शार्पनर आणि इरेझर. (इरेझर लागत नसेच.) हौशी जोडपी येत, एकमेकांचे स्केच करून घेत. आईबाप मोठ्या कौतुकाने आपल्या लेकराबाळांची छबी रेखाटून घेत. आरशात पाहून कंटाळलेले कुणी स्वत:ला कागदावर उतरवून घेत. दहा ते पंधरा मिनिटात कोऱ्या कागदावर ती समोरच्याचा नाकनक्शा तंतोतंत रेखाटे. आजूबाजूला बघ्यांची गर्दी जमे. त्यांच्या डोळ्यांत आश्चर्य असे, कौतुक असे. घेणारा स्वत:च्याच रूपावर खुश असे. अंधार पडू लागला की ती पैसे मोजी.

साहित्य निर्मितीची प्रक्रिया

डॉ. सुधीर राजाराम देवरे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
- डॉ. सुधीर रा. देवरे साहित्य, वाङमय, काव्यu या संज्ञा स्थूलपणे समान अर्थाच्या समजल्या जातात. या संज्ञांच्या अंतर्गत कथा, कविता, नाटक, कादंबरी, आत्मकथन, ललित लेखन, वैचारिक लेखन, आस्वाद, समीक्षा आदी प्रकार येऊ शकतात. साहित्य म्हणजे काय, वाड्‍.मय म्हणजे काय, काव्य म्हणजे काय असे प्रश्न साहित्य व्यवहारात वेगवेगळ्या परिप्रेक्षात विचारले जाणे साहजिक आहे. साहित्य- वाङमय हे वास्तवच असते असे नाही, तसेच ते पूर्णपणे मिथक असते असेही नाही. म्हणजे साहित्यात वास्तव असूनही त्याच्या व्यतिरिक्‍‍त त्यात अजून खूप काहीतरी असते. वर्तमानपत्रातल्या बातम्या वा वृत्तांत हे वास्तव असतात.

तुझे शहर

शिव कन्या ·
तुझ्या नकळत तुझे शहर फिरून आलेय – डोळे न उघडता तुला पाहून आलेय रस्ते ओलांडताना तुझा हात धरला आहे – तुझा हात घामेजला आहे मंदिरातले कासव ओलांडले आहे – तुझ्या हातावर तीर्थ ठेवले आहे दर्ग्यातल्या जाळीतून डोकावले आहे – लोबानचा गंध दरवळत आहे मिठाईच्या दुकानात इमरती घेतली आहे – हात चिकट, तोंड गोड झाले आहे भर बाजारात चिक्कीच्या बांगड्या घेतल्या आहेत – तुझे डोळे चमकत आहेत रसवंतीत पांढऱ्या मिशीचा रस प्याले आहे – तुझा रुमाल पुढे, हसू मागे आहे त्या झाडाखाली क्षणभर थांबलो आहोत – तू सावली, मी नि:श्वास झालो आहोत लाचा घेताना मी गोंधळले आहे – तू म्हणतोस, रंग जाऊ दे, आठवणी राहू देत

सहज उडण्याचा भ्रम

डॉ. सुधीर राजाराम देवरे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
- डॉ. सुधीर रा. देवरे काही वेळा खूप एकटं वाटतं. असुरक्षित वाटतं. आपल्या पाठीमागे कोणीही उभं नाही असं वाटतं. जवळचं असं आजूबाजूला कोणीही नसल्याची भावना बळ धरू लागते. आपण उपरे आहोत. आपण चुकून या जगात जन्माला आलोत. अवेळी आपलं काही बरं वाईट झालं तर? झोपेत. रस्त्यात. एकटे असताना. कोण कोणाला कळवेल? आयुष्य म्हणजे काय? आपण कशासाठी जगत आहोत? जन्माला आलोत आणि आतापर्यंत कर्मधर्मसंयोगाने वाचलोत म्हणून फक्तह जगायचं का? या जगण्यामागे आपला उद्देश काय? पोटापाण्यापुरतं कमवण्यासाठी नोकरी करत रहायची. पुस्तकं वाचायची. आणि अधूनमधून काही लिहिण्यासारखं वाटलं तर लिहायचं. बस.

मी तुझा विचार करते

शिव कन्या ·
मी तुझा विचार करते, मी तुझ्या वयात रमते.... माझे खळाळणारे हसू अनुभवांच्या भोवऱ्यांतून तरून सुशांत जलाशयातल्या शांत स्मितासारखे तुझ्या ओठांशी येऊन थांबेल...... मी तुझा विचार करते, मी तुझ्या वयात रमते......

चार शब्द - पुलं - एक वाचनीय पुस्तक

समीरसूर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नुकतेच पु. ल. देशपांडेंचे 'चार शब्द' हे पुस्तक वाचनात आले. पुलंनी कित्येक पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या. त्यातल्या निवडक प्रस्तावनांचा संग्रह म्हणजे 'चार शब्द' हे पुस्तक! अतिशय विचारपूर्वक, गांभीर्याने, आणि मुद्देसूद लिहिलेल्या या प्रस्तावना खरोखर वाचनीय आणि मननीय आहेत. काही प्रस्तावना आपल्या इतिहासाचं, दैनंदिन जीवनाचं, अध्यात्माचं, तत्वज्ञानाचं, आणि जीवनपद्धतीचं इतकं कठोर आणि तर्कशुद्ध परीक्षण करणार्‍या आहेत की वाचतांना आपले डोळे खाडकन उघडतात. पुलंची अशा पद्धतीचं लिखाण करण्याची हातोटी वंदनीय आहे. हे पुस्तक विनोदी नाही. चुकून कुठेतरी विनोदाचा हलकासा शिडकावा झाला असेल तर तेवढेच.

श्री. अतिश तसीर यांच्या लेखावर प्रतिसाद

गामा पैलवान ·
श्री. अतिश तसीर यांनी २० मे २०१९ च्या टाईम नियतकालिकात मोदींना उद्देशून एक प्रदीर्घ लेख लिहिला आहे. भारतीय जनता आजून पाच वर्षं मोदी शासन सहन करेल काय, असं शीर्षक आहे. उपरोक्त लेखावर प्रतिसाद व काही प्रमाणावर प्रतिवाद म्हणून सदर लेख लिहला आहे.