Skip to main content

साहित्यिक

वाढदिवस

लेखक निओ यांनी मंगळवार, 04/12/2018 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
त्याचा आज वाढदिवस. सकाळी अंथरुणात उठून बसला. काल रात्री बारा पर्यंत जागाच होता. पण शुभेच्छा द्यायला तो सोडून कोणीच जागे नव्हते. whats app वरचे काही फुटकळ मेसेज तपासून हा पण शहाण्या सारखा गपचूप झोपी गेला. तर सकाळी उठून बसला. कोणाची काही चर्चा नाही, भेटवस्तू काय हवी विचारणा नाही, बाहेर कोठे जायचे काही तयारी नाही. आपला वाढदिवस विसरले कि काय हे लोक, असंच त्याला वाटून गेलं. इतक्यात आलीच ...लगबगीने हसत हसतच बायको आली. येऊन सरळ मांडीवरच बसली. आयला हे काय... ! म्हणजे एकीकडे बरे वाटले.

एक कविता हवी आहे

लेखक पथिक यांनी मंगळवार, 30/10/2018 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी ! एका निसर्ग-पर्यावरण कविता अंकासाठी (व्यावसायिक नाही) एखाद्या सुप्रसिद्ध मराठी कवीची एक कविता निवडायची आहे. जरा मदत करता का ? अभंग पण चालेल.

बघ्याची भूमिका

लेखक दिनेश५७ यांनी गुरुवार, 25/10/2018 21:14 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रवर्य मंदार भारदे याची बघ्याची भूमिका आता ‘एकगठ्ठा’ वाचायला मिळणार हे प्रत्यक्ष त्याच्याकडून आणि त्याच्या फेसबुकवरून कळले आणि पुस्तक हातोहात संपल्यामुळे येणारी निराशा टाळण्यासाठी लगेच आॅनलाईन खरेदीसाठी नंबर पक्का करून टाकला. (नंतर कधीतरी तो पार्टी देईल तेव्हा त्यावर त्याची सही घेणार आहे.) भारदे नावाचे हे ‘रसायन’ मला पहिल्यांदा जेव्हा भेटले तेव्हाच त्याची जबरदस्त ‘किक’ (लहान) मेंदूत बसली होती. या माणसाकडून ऐकणे हा एक विलक्षण अनुभव असल्याने त्यांच्यावर लिहिलेच पाहिजे असे मला वाटू लागले आणि लोकसत्ताच्या रविवारच्या ‘लोकरंग’ पुरवणीत ‘बावनकशी’ सदरात मी त्यांच्यावर लेख लिहिला.

मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग ४.

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 15/10/2018 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
यापूर्वीचे कथानक: मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग १,२,३ https://www.misalpav.com/node/43228 लोरेंझो जेरार्दिनीची रोजनिशी : किल्ल्याच्या दिशेने मी निघालो खरा, परंतु मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याला तोंड देत अंधारातील अनोळखी, निसरड्या पायवाटांवरून चालणे शक्य नव्हते.

Nandini's Diary

लेखक aanandinee यांनी मंगळवार, 02/10/2018 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
किती महिने झाले असावेत? सात, आठ? ख्रिसमसची सुट्टी संपून नुकतंच क्लिनिक पुन्हा सुरु झालं होतं. स्कॉटलंडमधल्या या लहानश्या शहरात ख्रिसमसच्या काळात सगळं ठप्पच असतं. जानेवारीत आळोखे पिळोखे देत शहर पुन्हा जागं होतं. त्याच दरम्यान कधीतरी ती पहिल्यांदी आली. रोज घरी जाण्याआधी पुढच्या दिवसाच्या पेशंट्सच्या फाईल्स वरून नजर फिरवते तशी तिचीही फाईल बघितली. वय पन्नाशीच्या पुढे, एका फार्मास्युटिकल कंपनीत काम करणारी एलिझाबेथ - लिझ. तिच्या घराच्या बाजूला एक रेस्टॉरंट होतं. तिथे येणारे बरेच लोक त्या रस्त्यावर आजूबाजूला गाड्या पार्क करत. आसपास राहणार्या लोकांना हा तसा त्रासच होता.

गीत - गँ गणपतये

लेखक कौस्तुभ आपटे यांनी रविवार, 23/09/2018 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
॥श्री॥ गँ गण ण ण ण,गँ गण ण ण ण गँ गण ण ण ण, गँ गणपतये देवांमाजी, अग्रदेव तू, त्रिवार वंदन स्विकार अमुचे॥धृ॥ हे शिव-शक्तिच्या संगमा हे बुद्धि-युक्तिच्या अग्रजा त्या श्रुती-स्मृतिंचा पाठक अन तू वेदांची रे मंत्रणा ! विद्या-कला ठायी तुझ्या तू सर्वेश्वर तुज वंदना ॥१॥ तू श्रेष्ठ लिपीक तुजला गती हे देवांच्या सेनापती रविचंद्रधिनायक विश्वही तुजला सुर्याने ओवाळती सिद्धेश्वरा, विघ्नेश्वरा, हे करूणाकर , तुज मोरया ॥२॥ पदी मंजुळ घुंगुर नादतो कटिबंध भुजंगही शोभतो हे सुंडतुंड, गजगंड तिलंकीत मूषक वाहन वाहतो लंबोदरा, मनमोहना, तू दृष्टि राख, हीच कामना ॥३॥ गीत - कौस्तुभ गाणे इथे ऐकत येइल
काव्यरस

आठवणीतील काश्मीर : लालेदी छोले -पुरी

लेखक Sanjay Uwach यांनी शुक्रवार, 21/09/2018 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
आठवणीतील काश्मीर : लालेदी छोले -पुरी आता तसे पहिले तर या घटनेला अनेक वर्षे होऊन गेली .मला अजून देखील तो दिवस चांगला आठवतो .मी जेव्हा कॉलेजच्या पहिल्या वर्षात शिकत होतो, त्या वेळी मला, माझे सिनियर्स या लालाच्या दुकानात छोले पुरी खाण्यासाठी घेऊन आले होते .लाल चौकात पॅलॅडियम टॉकीज जवळ, जी भाजी मंडई आहे ,त्या मंडईत आत शिरल्या वर डाव्या बाजूला हे दुकान होते. दहा बाय दहा फुटाच्या छोटयाशा दुकानात,बाजूच्या तिन्ही भितींना साधारण आठ इंचाची सभोवती एक लाकडी पट्टी लावण्यात आली होती . त्या पट्टीवर आपली प्लेट ठेवून,उभे राहूनच लोक मोठ्या मज्जेने छोले पुरी,टिक्कीया,सामोसे,चाट याचा आनंद घेत असायचे.

बोली बोली बायका बोली

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 21/09/2018 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही बायका म्हणजे बोलीभाषा, बोलघेवड्या ! चुलीपासून फोनपर्यंत बडबडबड, गप्पागोष्टी.... लिपीबिपीचे बंधन नाही व्याकरणबिकरण... हे काय असते? आम्ही बोलतो अनंत बोलीतून .... कुजबुज जितकी थरथरणारी तितके भांडण कडकडणारे कठोरतेचा शीण आम्हाला मवाळतेचा शाप तसाही पण बोली आमची जपून ठेवतो.... अर्थाचा पण अनर्थ करू.... खिल्ली तुमची सहज उडवू निरर्थाला अर्थ देऊ...

तुम्हाला असं कधी होते का ? भाग - २ .....

लेखक Prakashputra यांनी शनिवार, 08/09/2018 08:29 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला भाग इथे वाचा : तुम्हाला असं कधी होते का ? भाग - १ मला एकदा झोपेत स्वप्न पडले (जागेपणी पण पडतात, पण त्याबद्दल नंतर कधीतरी ) आणि मला पक्के कळत होते की मी स्वप्नात आहे. मला 'Lucid Dreams' का काय ते पडतात, म्हणजे मला बऱ्याच वेळा मी स्वप्नात आहे हे स्वप्न बघत असताना समजत असते. तर या स्वप्नात मी माझ्या मित्राला भेटायला गेलो होतो आणि त्याच्या नेहमीच्या घराऐवजी तो एका मोठया बंगल्यात रहात होता, एवढा मोठा बंगला कि गाडी आत आणि बाहेर जाण्यासाठी वेगळे रस्ते होते.

निघताना....

लेखक शिव कन्या यांनी गुरुवार, 23/08/2018 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
मी हळूहळू पण निश्चितपणे पार दिसेनाशी होईन तेव्हा तू चौकट ओलांड, आणि निघताना..... आपल्या हसल्याबोलल्या आवाजांची फूले घेऊन ये आपल्यातल्या गहिवरांचे कढ, न हिंदकळता आण मी न ओलांडलेली अंतरे तू सहजच पार करुन ये माझे न उच्चारलेले नाव चारचौघांत सरळच घे सगळे उठून जातील तेव्हा आपल्यातल्या शब्दांची आरास मांड त्यानंतर आपोआप दिवा लागेल तुझ्या डोळ्यांतले पाणी विझेल मग मी मुक्त होऊन रेषा होईन तुझ्या तळहातांवर खोल रुतेन.. तू हळूहळू पण निश्चितपणे पार दिसेनासा होऊन माझ्याजवळ पोहचेपर्यंत... Shivkanya