मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राजकारण

पाकड्यांच्या उलट्या बोंबा (विडीओ)

इनोबा म्हणे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
कृपया हे पाहा - http://in.youtube.com/watch?v=Eij5o7XizIA&eurl= (कृपया यूट्यूबची चित्रफीत येथे परस्पर चिकटवू नये. तसे करण्यामुळे बर्‍याचदा आ ई उघडायला त्रास होतो. कृपया फक्त दुवा द्यावा. - आणिबाणीचा शासनकर्ता.) मुंबईत झालेल्या गहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर पाकीस्तानी वृत्तवाहिनीवर झालेल्या चर्चेत पाकड्यांनी मारलेल्या उलट्या बोंबांचे हे विडीओ.

अनाम वीरा ...

मैत्र ·
लेखनविषय:
काल झी वर लहान मुलं अतिशय शांत आणि गंभीर पणे देशभक्तीची गाणी सुरेख म्हणत होती... आणि त्यातच एक होतं - अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनांत तिथे चिरा ना कुणी बांधिला पेटली न वात... कुसुमाग्रजांचेच शब्द ते! साधे सुधे नव्हेत. पण अजूनही हेच घडतं आणि आजही घडते आहे. गेल्या काही दिवसातल्या प्रतिसादात सर्व शहीदांना अभिवादन करताना मला पुन्हा पुन्हा वाटत होतं की तीन मोठ्या अधिकार्‍यांचा जो राष्ट्रीय गौरव होतो आहे त्यात कदाचित बाकी लहान पदावरच्यांवर थोडा अन्याय तर होत नाही?

मुख्यमंत्र्यांचे संतापजनक वक्तव्य.

सुनील मोहन ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
शहीद मेजर संदीप उन्नीकॄष्णन यांचे घर नसते तर तिथे कुत्रेही फिरकले नसते. असे निर्बुद्ध आणि चीड आणणारे वक्तव्य केरळचे मुख्यमंत्री श्री. अच्युतानंद यांनी केले आहे. मूळचे केरळचे सुपुत्र असणारे मेजर उन्नीकॄष्णन यांच्या अंत्यसंस्काराला अच्युतानंद उपस्थित राहिले नव्हते. त्यानंतर दोन दिवसांनी ते उन्नीकॄष्णन यांच्या परिवाराला भेटण्यासाठी त्यांच्या बेंगलुरु स्थित निवासस्थानी पोहोचले. तत्पूर्वी उन्नीकॄष्णन यांच्या घराची सुरक्षारक्षक आणि श्वानपथकामार्फत तपासणी करण्यात आली होती.

मुंबईवर झालेला अतिरेकी हल्ला : पाकिस्तानी आढावा

पंकज ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा पाकिस्तानी दुरचित्रवाहिनीवर घेतलेला आढावा : http://ca.youtube.com/watch?v=6Sn-kV9yR6U&feature=related

कसं काय पाटील बरं हाय का

उपटसुंभ ·
लेखनविषय:
कसं काय पाटील बरं हाय का सांगा बरं हाय का.. काल काय ऐकलं ते खरं हाय का... सातार्‍याचे तुमी, तासगावचे तुमी, ते न्हाय न्हाय न्हाय लातूरचे तुमी सांगा आमी काय ऐकलं ते खरं हाय का.. काल म्हनं तुमी मीटिंगला गेला. मॅडमना राजीनामा देऊन आला. केली कुनी खोडी, गेली लाल गाडी. आज काय शिल्लक र्‍हायलंय का..! आमी काय ऐकलं ते खरं हाय का.. कसं काय पाटील बरं हाय का सांगा बरं हाय का.. काल काय ऐकलं ते खरं हाय का... दिल्लीमधे जवा बाँबस्फोट झाला. तीन तासात तीन सूट बदलून आला. हाय काय कोडं, सांगा तरी थोडं. खाली नका बगू आता लाजताय का..! काल काय ऐकलं ते खरं हाय का.. कसं काय पाटील बरं हाय का अहो बरं हाय का.. काल काय ऐकलं

पाकिस्तानी सैन्य भारतीय सीमेवर.

बबलु ·
आत्ताच आलेली म.टा. च्या संस्थळावरील मुख्यपृष्ठावरील बातमी... अफगाणिस्तानच्या सीमेवर असलेले एक लाख सैन्य हलवून ते भारताच्या सीमाभागाजवळ तैनात करणे आवश्यक असल्याचे पाकिस्तानने नाटो आणि अमेरिकन लष्कराला कळवले आहे. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3775546.cms

नव्या दिशा (???) !!!

अभिजीत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
हल्ल्याच्या नंतरचा दिवस काही नव्या दिशा घेवुन आला आहे. या दोन बातम्या पहा - यावेळच्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत ६०% मतदान झाले आहे. जी आतापर्यंतची मतदानची सर्वोत्तम आकडेवारी आहे. यात प्रथमच मतदान करणार्‍यांचा समावेश होता. मतदारांच्या प्रतिक्रिया पुरेशा बोलक्या आहेत.

इस घर को बचाये कैसे ?

नेटकिडा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3774751.cms खरेच विचार करायला लावणारा लेख ( महाराष्ट्र टाईम्स मधून )

डोके थंड ठेवून पाहिल्यानंतर...२

श्रावण मोडक ·
लेखनप्रकार
(आधीच्या भागात – मुंबईवरील हल्ल्याने पुढे येत असलेल्या नव्या परिस्थितीचे आजवरचे आकलन या वरवरच्या मुद्याला धरून तयार झाले आहे, त्याच्या खोलात जाण्याचा विचार याआधी झाला नाही, कारण या वरवरच्या आकलनापोटी हा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न मानून तो सोडवता येईल असा एक भ्रम तयार झाला होता...) हा युद्धाचा नवा प्रकार आहे. मुंबईच्या हल्ल्यातून या संघटनांच्या हाती एक जबरदस्त प्रभावी हत्यार आले आहे. कसे ते पाहू. १. याआधी होणाऱ्या "दहशतवादी" हल्ल्यांसाठी संबंधित संघटनांना काटेकोर आणि तपशीलवार नियोजन, साधनस्रोतांची उपलब्धता आणि त्यासाठी आवश्यक संघटन उभे करावे लागत असे.