मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राहती जागा

बेस्ट फ्रॉम वेस्ट

jaypal ·
एका टिकाउ बायकोचा टाकाउ परंतु टिकाउ परकर घ्यावा. हा असा parkar1 नाडीच्या बरोबर अपोझिट साईडच्या ओपनिंगला चांगल्या टेलर कडुन कचकचीत टिकाउ टिप मारुन घ्या. आता या पोतडी मधे अपापल्या आवडीचे किंवा नावडीचे (किंवा पुर्वी सारखे ;-)अडगळीचे)सामान सवडीने भरा. म्हणजेच त्या परकराला गत वैभव प्रप्त करुन द्या. मी सध्या गहु भरुन ठेवले आहेत. parkar2 हा माझा पहिलाच प्रयत्न आहे.चुकभुल माफी असावी. सदर प्रयत्न आवडल्यास अजुन काही सुचवीन म्हणतो

पानी आनाया जावू कशी

पाषाणभेद ·
काव्यरस
पानी आनाया जावू कशी हांडा घेतला बादली घेतली घेतली ग बाई मी कळशी पन पानी आनाया जावू कशी मी जावू कशी? ||धृ|| दुसरी स्त्री: का गं आसं काय म्हनतीया? आगं विहीर कोरडी, हापसा तुटका नाला भाकड, नदी सुकी ग बाई नदी सुकी मग पानी आनाया जावू कशी मी जावू कशी? ||१|| दरवर्शाची ही रडगानी पावसाळ्यात म्होप पानी हिवाळा सरता अंगावर काटा पान्यासाठी लई बोभाटा प्यायाला नाही पानी आन कशी करावी सांगा शेती मग पानी आनाया जावू कशी मी जावू कशी?

जंगल घडवणारा माणूस: जादव पायेंग

चैतन्य गौरान्गप्रभु ·
जंगल! परमेश्वराने अगदी मुक्तहस्ताने सृष्टीसौंदर्याची उधळण केलेलं वसुंधरेचं हिरवं लेणं! जंगल म्हटलं की वाघोबाच्या डरकाळीपासुन ते टारझनच्या आरोळीपर्यंतच्या आठवणी मनात घर न करतील तरच नवल. अवघ्या जीवसृष्टीला आकार देणा-या या जंगलातूनच मानवजातीला जिवंत राहण्याचे तंत्र, जीवन सुखी करण्यासाठीचे यंत्र, आणि जीवनाचं सार्थक करण्याचे मंत्र गवसलेत. जंगलाकडून हे सगळं घेत असतांना आपण जंगालाचंही काहीतरी देणं लागतो हे मात्र आपण सामान्य माणसं सोयिस्करपणे विसरतो. जादव पायेंग मात्र विसरभोळा नाही. सोयिस्करपणे विसरणे तर त्याच्या गावीही नाही.

हे बंध रेशमाचे

सर्वसाक्षी ·
लेखनप्रकार
सकाळी चिवचिवत येणार्‍या चिमण्या हा माझ्या आयुष्याचा एक भागच झाला आहे. सकाळी बाहेरच्या खोलीचे काचेचे दरवाजे सरकावायला जरा उशीर झाला तर बाहेर आवाज सुरू झालेला असतो. दारं उघडायची खोटी. चिवचिवाटाने जणु ’सुप्रभात’ करत चिमण्या आंत शिरतात. छज्जावर तांदुळ टाकले की प्रथम आपल्या थव्यातील इतर चिमण्यांना साद घालणार आणि मग एकेक दाणा टिपायला सुरुवात. एकिकडे चिवचिवाट सुरुच असतो. अनेक वर्षे हे नियमितपणे होत असल्याने आता सरावाने मला साधारण तीन प्रकारचे बोल लक्षात येउ लागले आहेत.

एक पद्धत..

गवि ·
म्हणे मरणाची बातमी देणार्‍या पोस्टकार्डाचा कोपरा कापून पाठवतात.. पोस्टकार्डंच कुठे राहिली आता.. सगळीकडे ईमेल.. अर्थात मी कधी कोपरा कापलेलं पोस्टकार्ड पाहिलं नाही.. पण असेल.. आपली एक पद्धत.. म्हणे मोटरमन रिटायर व्हायच्या लास्टच्या दिवशी त्याला डेक्कनक्वीनवर पाठवतात.. आणि एकही लाल सिग्नल देत नाहीत.. खरं खोटं कोणास ठाऊक.. सगळ्या मोटरमन्सना मिळत असेल हा मान..? मी कधीच डेक्कनक्वीनने गेलो नाही... अर्थात तिचा मोटरमन कधी पाहिला नाही .. पण असेल.. आपली एक पद्धत.. म्हणे फाशी सुनावताच जज निब तोडतात .. सिनेमात पाहिलंय.. .. अर्थ माहीत नाही..

ढक्कन खोलना नहीं आता ! इंदुरी दुकानदारीची एक झलक

यकु ·
नुकताच झालेला, शेअर करण्‍यासारखा फाऊंटन पेनचा किस्सा आहे. आत्मशून्य इथे आला तेव्हा आम्ही असेच राजवाड्याशेजारच्या रोडवर बाजारातून फिरत होतो. जुनी कळकट दुकाने बंद व्हायची रात्रीची वेळ. एक फाऊंटन पेनचं दुकान दिसलं. फाऊंटनपेन भलेही रोज वापरत नसलो तरी दुकान दिसलं की पहावे, घ्यावे वाटतातच. त्या दुकानदाराने नेहमीचीच सत्तर, शंभर रुपयांची शाईपेनं समोर मांडली. त्यापैकी बरीच ऑलरेडी इथेतिथे पडून आहेत. मूड गेला. पण दुकानातून निघून कसं यावं म्हणून उगी शान मारत - ''अरे नहीं नहीं, ये तो सब चालू माल है, कलेक्‍शन के लिये कुछ है तो दिखाईये '' अशी वाक्ये फेकली.

काशीबाई काशीबाई

पाषाणभेद ·
काशीबाई काशीबाई
काशीबाई काशीबाई तुमच्या साडीचा कसोटा घट्ट खोचा वारा येईल भसाभसा तर होईल मोठा लोचा ||धृ|| अशी कशी हो तुम्ही नेहमीच करता घाई कामावर यायची उगाच करता नवलाई भांडी निट घासा नाहीतर आणाल त्यांना पोचा ||१|| तुम्ही सांगून बोलून रजा घेत जा हो न सांगता दांडी मारू नका हो निट मी सांगते नका असे भांडू कचाकचा ||२|| नगरसेवक पुतण्या अन हवालदार तुमचा भाचा तालेवार व्याही असून एक नाही काही कामाचा सोन्याचा चमचा त्यांच्या तोंडी तुम्हां सांगती गौर्‍या वेचा ||३|| बरं जावूद्या शेजारीण काय बोलली ते जरा सांगा चुगल

मी ,ओककाका,भानामती आणि मिपा

साती ·
लेखनप्रकार
पैसाताईंनी इथे दिलेला प्रतिसाद बघून आज मुद्दामून इथे आलेय. पैसा, ओककाका काही चुकीचं म्हणत नाहीयेत गं! पण काय आहे ना त्यांना कुठलेही संदर्भ कुठेही आणि ते ही स्वत:च्या सोयीने हवे तिथे कापून द्यायची आणि त्यावर कुणी काही स्पष्टीकरण दिले असेल तर साफ़ दुर्ल़क्ष करायची सवय आहे (हे मी वेगळे सांगायची गरज नाही म्हणा :) ) तर या त्यांच्या भानामतीच्या करण्या दुसर्‍याही एका मसंवर प्रसिद्ध होतात. तिथे मी त्यांना असं लिहिलं होतं की “मी स्वत: एम डी डॊक्टर आहे आणि अश्या भानामत्या बर्‍या करते”.

मेघा रे... मेघालय !

चिगो ·
लेखनप्रकार
प्रेरणा: धमु आणि माझी खवखव च्यायला, तू एक काम का नाही रे करत. ते लाईन आणि फोन वरुन आठवलं. इशान्य भारताबद्दल एकुणच लोकांचं अज्ञान अगाऽढ असतंय. तिथल्या पध्दती, जिवनमान, जगण्याची धडपड आणि सरकारी प्रयत्न ह्यावर का नाही लिहित काही? खूप चांगली आणि माहितीपुर्ण लेखमाला होईल...शिवाय पुर्णतः दुर्लक्षित म्हणवल्या जाणार्या भागाची माहितीही होईल लोकांना. ************************************************************** तर आमच्या ह्या दोस्ताच्या विनंतीवजा ऑर्डरीने मी हा लेख लिहतोय..