मी ,ओककाका,भानामती आणि मिपा
लेखनप्रकार
पैसाताईंनी इथे दिलेला प्रतिसाद बघून आज मुद्दामून इथे आलेय.
पैसा, ओककाका काही चुकीचं म्हणत नाहीयेत गं! पण काय आहे ना त्यांना कुठलेही संदर्भ कुठेही आणि ते ही स्वत:च्या सोयीने हवे तिथे कापून द्यायची आणि त्यावर कुणी काही स्पष्टीकरण दिले असेल तर साफ़ दुर्ल़क्ष करायची सवय आहे (हे मी वेगळे सांगायची गरज नाही म्हणा :) ) तर या त्यांच्या भानामतीच्या करण्या दुसर्याही एका मसंवर प्रसिद्ध होतात. तिथे मी त्यांना असं लिहिलं होतं की “मी स्वत: एम डी डॊक्टर आहे आणि अश्या भानामत्या बर्या करते”. हे जरासं सार्कॆस्टिक होतं.पण दोन तीन ठिकाणी बघितलं तर ओककाका निष्पापपणे हे खरंच मानून लिहितायत की बघा या भानामतीचं अस्तित्व मान्य करतायत.
तर पूर्ण प्रतिसाद असा होता
–ओकसाहेब,मी स्वतः एम डी डॉक्टर आहे.
मी भल्या भल्या भानामती दररोज दूर करते. . काल रात्रीही दोन भानमत्यांना अॅडमीट करून ठेवलंय. एकीला बघता बघता डोळे लाल होतात आणि एकीने म्हणे मागच्या सात वर्षांत काह्हीच खाल्लेलं नाही.काही खाता क्षणीच उलटी करते म्हणे. आता २४ तास होत आले मी अॅडमीट करून, ना लाल डोळे,ना उलटी.
अशिक्षित आणि मुख्यत्वे स्त्रिया या मार्गाने आपले सायकीक डिसीजेस मॅनीफेस्ट करतात हे सुशिक्षितांना का कळू नये?आजच्या जगात कोणी भानामतीचे इतक्या हिरिरीने समर्थन कसे करू शकते?'
त्यातला मुद्दलातला शेवटचा भाग काढून बाकीचा प्रतिसाद काकांनी चिकटवलाय इथेही आणि तिथेही.
नंतर बरेच दिवस मी मसं (मराठी संकेतस्थळे) वर नव्हते. आल्यावर बघते तर बापरेबाप, ओककाकांनी मला फ़ेमसच करुन टाकलं.
यावर काकांचं म्हणणं- आता जर आपणच म्हणताय की मी दररोज भानामतीच्या केसेस हाताळते, दूर करते... मग तर फार चांगले झाले. कारण इथे लोक भानामती नावाचे अनाकलनीय काही घडतच नाही असा पवित्रा घेतात. आपले हॉस्पिटल शहरी भागातील आहे किंवा ग्रामिण भागात हे स्पष्ट होत नसले तरी, निदान भानामतीच्या नावाने केसेस आपल्या हॉस्पिटलमधे येतायत. हे आपण मनमोकळेपणाने म्हणताय म्हणून आपले आभार.'
नशीब यावरून 'डॉ.साती भानामती असते हे मान्य करतायत; असे नाही म्हणाले हे ओककाका.
तर ९ तारखेला मी तिकडे एक प्रतिसाद दिला तो असा.
"अरे देवा,अजून भानामतीचा गोंधळ चालूच आहे का?
पहिल्या केसमध्ये ती मुलगी नवर्याला सोडून आपल्या आईबाबांकडे राहात होती. तिच्या मुलांनाही भावाच्या मुलांइतकंच प्रेम माहेरी मिळावं अशी तिची इच्छा होती. ही मुलगी पैसे कमवण्यासाठी एक कामचलाऊ ब्युटी पर्लर चालवते त्यामुळे तिच्याकडे बर्याच प्रकारची डोळे लाल करणारी किंवा डोळ्यातून पाणी काढू शकणारी रसायने आहेत.
घरात जरा कुरबूर झाली की ती ही रसायने कुणाच्या नकळत डोळ्यात घालते आणि डोळे भयाण लाल करून घेते.
हे तिनेच आम्हाला विश्वासात घेतल्यावर सांगितलं. तिचे आणि घरच्यांचे व्यवस्थित समुपदेशन केल्यानंतर हा प्रकार आता बंद आहे.
दुसर्या केसमध्ये 'हिने मागच्या सात वर्षांत काही खाल्ले नाही' हा तिच्या घरच्यांचा दावा आहे सत्य नव्हे. खरं तर ती तीन वेळेस व्यवस्थित खाते पण वरचे एक दोन घास स्वतःहून उलटी करून उलटून काढते. तिच्यात डिहायड्रेशन किंवा मालन्यूट्रिशनचे कोणतेही साईन्स नव्हते. दोन दिवस घरच्या ससेप्टिबल म्हणजेच या प्रकारांनी घाबरून मुलीच्या मनाप्रमाणे ऐकणार्या व्यक्तींपासून तिला दूर ठेवल्यावर हे प्रकार आपोआप बंद झाले. आता ती फक्त 'उलटी आल्यासारखी वाटते, छातीत दुखते, असे म्हणते. ३ दिवसांनी तिला डिस्चार्ज दिल्यावर घरी २ दिवस बरी होती मग पुन्हा उलट्या सुरू झाल्यात. ती हे पहिल्या केसमधील स्त्रीप्रमाणे स्वतःहून करत नसून अती डिप्रेशनमुळे तिचे मन तिच्या शरीरास हे करण्यास भाग पाडतेय. (सोमॅटायजेशन). तिच्यावर सध्या मानसोपचार तसेच तिच्या आजी-आई यांचे काउंसेलिंग चालू आहे.
ओकसाहेब तुमची मते ठाम आहेत यामुळे या वरच्या विवेचनातूनही तुम्ही स्व्तःच्या सोयिचं तिसरंच काही शोधुन काढाल याची खात्री आहे."
यावर मात्र ओककाकांचा एक चकार शब्दही नाही.
-----------------------------------------------------------------------------------
जाऊदे,यातून चांगल्यात वाईट असं की मी बर्याच दिवसांनी लाडक्या मिपावर लिहायला आले.
इथल्या नविन मेंबरांना मी कदाचित माहिती नसेन. पूर्वी आमच्या सगळ्यांचं एक जुनं आवडतं संस्थळ होतं. तिथून फ़ुटून बाहेर निघुन हे संस्थळ स्थापन करण्यापूर्वीची गुप्तं खलबतं वैगेरे आम्हि मेलामेलीने करत असू. आजकाल ते मित्र आणि मैत्रिणीही दिसत नाहित फारसे. मग माझ्या एम डीच्या परीक्षा वैगेरेत जरा इकडे यायचं कमी झालं.
आता माझे अपडेटस देते. एम डी झाल्यावर एका महाराष्ट्रातल्या जिल्ह्याच्या ठिकाणी प्रॆक्टिस सुरू केली होती पण तिथलं सांस्कृतिक अणि भौगोलिक वातावरण मला सूट झालं नाही. मग परत मुंबईला यायचं की रत्नागिरीला जायचं या भानगडीत अचानक माझ्या नवर्याच्या मूळ गावाला जायचं हा नवाच मार्ग सुचला. पैल्यांदा नवरा तयार नव्हता. त्याच्या अॅकॅडमिक्समुळे त्याला महाराष्ट्रातच-मुंबईतच मस्त जॉब किंव अजून उच्च शिक्षणाच्या संधी होत्या. मग त्याची मनधरणी करून इकडे आले.इकडे यायचं मुख्य कारण अर्थार्जनाबरोबर थोडीबहुत समाजसेवा घडावी हे आहे.हे अत्यंत मागासलेलं गाव आहे आणि उच्चशिक्षित अॅलोपथिक डॉक्टरांची इथे कमतरता. कमालीचा जातीभेद, अंधश्रद्धा.सोयीसुविधांचा अभाव. ज्यांच्याकडे पैसे आहेत ते हैद्राबादेत किंवा सोलापूरला आरोग्यसुविधांसाठी जातात किमान १५०-२०० किमी प्रवास करून. ज्यांच्याकडे पैसे नाहीत ते इथल्या डॉक्टरांचे इलाज थकले की देवावर किंवा अंधश्रद्धांवर हवाला ठेवुन गप्प राहतात. अरे हो, गावाचं नांव सांगता येणार नाही (व्यवसायाची कुठे जाहिरात करू नये असा माझा आणि मिपाचाही नियम आहे ना ) पण ओककाकांनी कर्नाटकातल्या ज्या दोन महान जिल्ह्यांत भानामती जास्त होते असं कुठल्याश्या अहवालात लिहिल्याचं लिहिलंय ना त्यापैकीच एका जिल्ह्यात राहाते मी. अगद आपले यवतमाळ,चंद्रपूर हो .हे जिल्हे म्हणजे महाराष्ट्र आणि आंध्र यांच्या सीमेवरचे,सतत सीमा प्रश्नात हैद्राबाद-कर्नाटक प्रश्नात सापडणारे.नवर्याला(त्याला जुने मिपाकर आणि मिपासंस्थापक राजाभावजी म्हणून ओळखतात) तोडकं मोडकं कन्नड येत होतं आणि मला कानडीचा गंधही नाही. पुस्तकं घेऊन शिकायचा प्रयत्न केला तर इथली भाषा आणि व्याकरण प्रमाण कानडीच्या दुसर्या टोकाला. उदा. 'बाहेर बसा' हे वाक्य प्रमाण कानडीत 'होरगडे कुत्तकोळी' असं होईल तर इथे 'व्हराग कुड री' आणि म्हणताना एकात एक मिसळून '“व्हराग्कुड्री' माझं पहिलं वर्षं तर इथला भाषेचा लहेजा शिकण्यातच गेलं. तोपर्यंत खरंच माझे उपचार फक्त क्लिनीकल प्रॊब्लेम्सवर आधारीत,पेशंटच्या बाह्य ल़क्षणांवर आधारीत असेच होते. पेशंटच्या मनाचा, विशेषत: बायकांच्या प्रश्नांचा अंदाज येत असला तरी तितकंसं काऊंसेलिंग करायला जमत नसे. कारण भाषेच्या प्रॉब्लेममुळे ज्याला प्रमाण कन्नड किंवा हिंदी/मराठी येतं असा घरातला पुरूषच मला बायकांचे प्रश्नही सांगे. आत्ता मात्र मी इथल्या भाषेत मस्त बोलायला शिकलेय. सगळे मला 'सातीअम्मा' म्हणून ओळखतात. आणि मी पण 'यन्री अम्मा/ येन तम्मा' करत त्यांच्या मनातलं सगळं उलगडून घेऊ शकते. इथे बायका डॉक्टर म्हणजे डिलिवर्या करणार्याच फक्त असा समज आहे आणि माझ्य़ा स्पेशालिटीची प्रॅक्टिस करणारी मी एकटीच बाई १५० किमीच्या त्रिज्येत. एम डी फ़िजीशीअन बाई असू शकते हेच इथल्या लोकांना पचायला कठिण गेले अगदी मेडिकल रिप्रेझेंटेटिवांनापण. मग आम पब्लिकची बातच सोडा.खास स्त्रियांचे असे जे प्रश्न असतात त्याकरिता जर पेशंटला गायनॅकॉलॉजिस्टकडे पाठवलं तर लोक माझ्याकडे 'नी याक नोडल्ला री अम्मा' म्हणून आश्चर्याने बघत.
तर या अंधश्रद्धांतून आणि मागासलेपणातून येणारे आजार निस्तरणे हा माझ्या कामाचा एक भाग झाला. माझी मुख्य प्रॅक्टीस डायबेटिस,एंडोक्रिनॉलॉजी आणि हार्ट-न्यूरोनल डिसीजेसची आहे. इमर्जन्सी मेडिसीन आणि पॉईजनिंग तसेच साथीचे आजार याचे उपचार माझ्या इंटेंसिविस्ट आणि पल्मोनॉलॉजिस्ट असणार्या आणि त्याच्या विषयाचा ज्युनिअर प्रोफ़ेसर असणार्या नवर्यारोबर बघते. काय विरोधाभास आहे बघा, या दोन्ही जिल्ह्यांत मेडिकल कॉलेज असूनही आरोग्याची अशी अनावस्था आहे. इथुन बांधकाम,उसतोडणउद्योगधंद्यासाठी बाहेर विस्थापित होणाराही मोठा जन समूह असल्याने एडस आणि त्या अनुषंगाने टिबी हाही मोठा आजार (राज्यात पहिल्या एक-दोन नंबरात आहोत म्हटलं आम्ही :) )आहे.राजा टिबीचा या भागाचा नोडल ऒफ़िसर म्हणूनही काम पाहतो. सरकारी टिबी विरोधी यंत्रणेत अमूलाग्र बदल करण्याची एक मोठी कमगिरी याने हाती घेतलीय.
तर या व्यापांमुळे ओककाकांच्या लाडक्या भानामतीचा सातत्याने पाठपुरावा करणे मला मनात असूनही शक्य नाही. पण काही इंटरेस्टिंग सापडल्यास त्यांना फ़ोन करून नक्की इकडे बोलवेन.
जाऊदे.त्या निमित्ताने मिपावर लिहायला आले. नाहीतर मोबाईलवर मिपा वाचते पण लॉगइन होत नाही. सानिका,गणपा यांच्या पाककृती अधाशांप्रमाणे बघते आणि वाचते. गवि, पिडा,रामदास यांचं लेखन आवर्जून वाचते.गवि तर आमचे गाववाले दोस्त आहेत. पैसातईंवांगडा मायबोलीत थय गजाली करूक गावतंत . अभिप्राय देण्यासाठि नेट उघडायची कसरत करायला शक्यतो वेळ मिळत नाहि. दुसया एका संस्थळावर नेहमी असते कारण तिथे माझे जुने मित्र मैत्रिणी आहेत हे आहेच पण मला मोबाईलवरून इंग्रजी टायपून (ईमेल पत्ता) माझ्याच आयडीने लॉग इन होता येतं. आणि पब्लिक मी मोबाइलवर टायपत असल्याने इंग्रजीत लिहितेय हे पण समजून घेतं. इथे मिपावर श्रामो,बिका भेटले कधी रात्री तर खव,खव खेळायचो पण आता नविन आयसीयू सुरू केल्याने ते ही जमत नाही फारसं. इथे पण ईमेल आयडीने लॉग ईन व्हायची व्यवस्था करा ना हो व्यवस्थापक!
आज ओककाकांचे खरंच आभार मानले पाहिजेत त्यांच्यामुळे इथे मी इतकं लिहिलंय. वर स्वत:चं फारच तुणतुणं वाजवलंय पण आपल्या मिपाकरांना आपलं कौतूक सांगायचं नाही तर कोणाला?
आणि हो, आता माझ्या डायबेटिस, हार्ट डिसीजेसच्या डाटाबेससारखा (मी खास सॉफ्ट्वेअर विकत घेऊन तयार केलाय रेफरंससाठी) नविन वर्षापासून भानामतीचाही डाटाबेस ठेवेन; खास ओककाका आणि उत्सुक मिपाकरांकरिता.
वाचन
10057
वाचनखूण
प्रतिक्रिया
53
वाह सातीताई..! मस्त! लेखा
त्यांच्या मते मिग विमानांच्या
हाहाहा! साती इज ब्याक! वेलकम
खूप दिवसांनी येण केलत.
सातीताई, तुंबा चनागी बरीती
साती - भानामती
@ओकसाहेब तुमची मते ठाम आहेत
वेलकमच वेलकम
अरे वा! तुमचं अभिनंदन! लेख
In reply to अरे वा! तुमचं अभिनंदन! लेख by रेवती
वड्डे-वड्डे
In reply to वड्डे-वड्डे by साती
मोबाईल
In reply to मोबाईल by Nile
1234
वाचून आनंद झाला एवढंच आत्ता
In reply to वाचून आनंद झाला एवढंच आत्ता by ३_१४ विक्षिप्त अदिती
असेच
वेलकम
भानामतीच की ही!
हलो साती, बर्याच दिवसांनी
In reply to हलो साती, बर्याच दिवसांनी by पिवळा डांबिस
अलिशीया!
In reply to अलिशीया! by साती
अगदी
In reply to अगदी by श्रावण मोडक
या बाबावर काही भानामती करता
In reply to या बाबावर काही भानामती करता by बिपिन कार्यकर्ते
माननीय
In reply to अलिशीया! by साती
हो...
डॉ. साती,तुम्ही तुमच्या
वेलकम बॅक
सलाम!
In reply to सलाम! by सहज
व्वा:
मस्त वाटलं!
अभिनंदन!
साती, प्रथम तुमच्या
वेलकम..!! सातीताईंच्या
इतका बहुमोल वेळ घालवून आणि
अप्रतिम लेख.
स्वागत आहे.
अरेरे....
आदरणीय
अगो गाववाले.. त्या "केळकर"ला
एक विनंती
प्रिय प्रिय सातीअम्मा, तिथे
चांगले लिहिले आहे
साती .............
हेही नसे थोडके
ओक यशस्वी
जुने ते सोने
लेख आवडला. आपल्या कार्याविषयी
मा. ओकसाहेबांचे 'स'कारात्मक कार्य
In reply to मा. ओकसाहेबांचे 'स'कारात्मक कार्य by सर्वसाक्षी
दोन नव्हे, तीन "स"...
साति ताई धन्यवाद तुम्हि करत असलेल्या कामाबद्दल .
मित्र हो, खालील प्रातिनिधिक
In reply to मित्र हो, खालील प्रातिनिधिक by शशिकांत ओक
साती यांनी खोट्या भानामतीच्या
In reply to मित्र हो, खालील प्रातिनिधिक by शशिकांत ओक
डोन्चू वरी शश्या.. आय अॅम
सातीताई
वा!
आपल्याच