मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काशीबाई काशीबाई

पाषाणभेद · · जे न देखे रवी...
काशीबाई काशीबाई
काशीबाई काशीबाई तुमच्या साडीचा कसोटा घट्ट खोचा वारा येईल भसाभसा तर होईल मोठा लोचा ||धृ|| अशी कशी हो तुम्ही नेहमीच करता घाई कामावर यायची उगाच करता नवलाई भांडी निट घासा नाहीतर आणाल त्यांना पोचा ||१|| तुम्ही सांगून बोलून रजा घेत जा हो न सांगता दांडी मारू नका हो निट मी सांगते नका असे भांडू कचाकचा ||२|| नगरसेवक पुतण्या अन हवालदार तुमचा भाचा तालेवार व्याही असून एक नाही काही कामाचा सोन्याचा चमचा त्यांच्या तोंडी तुम्हां सांगती गौर्‍या वेचा ||३|| बरं जावूद्या शेजारीण काय बोलली ते जरा सांगा चुगलखोर कळलावी मेली घेतेय माझ्याशी पंगा बोलणं आपलं दोघींचं काय झालं सांगू नका वचावचा ||४|| - पाषाणभेद

वाचने 1188 वाचनखूण प्रतिक्रिया 4

दादा कोंडके 17/03/2012 - 23:06
यमक "चा" असल्यामुळे शेवटची ओळ वाचली आणि हुश्श झालं! :)

पैसा 18/03/2012 - 07:04
कवितेच्या पहिल्या दोन ओळी वाचून जरा घाबरले होते, पण मग कडवी नेहमीच्या ओळखीतली पाहिली आणि बरं वाटलं.