टेक्निकल किंवा कस्टमर सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये "सी- सॅट" आणि "डी- सॅट" हे नेहमीच्या वापरातले शब्द. थोडक्यात सांगायचं झालं तर, "डी- सॅट = कस्टमर डिस सॅटिस्फॅक्षन (Cx Dis-Satisfaction )" आणि "सी- सॅट = कस्टमर सॅटिस्फॅक्षन (Cx Satisfaction)" प्रत्येक कॉलवर ही रेटींग फॉलो केली जाते.
जर कुठला ईश्यू आपण लगेच सोडवला किंवा कस्टमरला चांगल्या प्रकारे मदत केली, तर आपल्याला सी- सॅट मिळवता येतो फीडबॅक फॉर्ममधून. त्यासाठी अनेकवेळा काही गोष्टींवर पाणी सोडावे लागते, जसं की शिफ्ट ब्रेक्स, जेवण वगैरे वगैरे. कोणाशी कसं बोलावं, असं कोणी बोलल्यावर आपण कसं बोलावं हे सगळं सगळं ठरलेलं असतं.