सात अब्ज
१८०० च्या दशकात जगाची लोकसंख्या प्रथमच एक अब्जापर्यंत पोचली. १९२७ साली म्हणजे उण्यापुर्या शतका मधे ती दुप्पट अर्थात २ अब्ज झाली, साधारण सत्तर वर्षात, १९९८ साली ती सहा अब्ज इतकी झाली तर केवळ १३ वर्षांमध्ये ती आता ७ अब्ज इतकी झाली आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या औपचारीक अंदाजाप्रमाणे कालच्या एकतीस ऑटोबरला जागतीक लोकसंख्या ही ७ अब्ज झाली! पण अमेरीकन लोकसंख्या मोजणी आयोगाप्रमाणे सात बिलीयन्स होण्यासाठी अजून चार-पाच महीन्यांचा अवधी आहे. खालच्या आलेखात दाखवल्याप्रमाणे २०५० पर्यंत हा आकडा ९ अब्ज इतका मोठा होणार आहे!
(विकी)
जगाच्या ज्ञात इतिहासात प्रथमच लोकसंख्या इतक्या मोठ्या प्रमाणावर जात आहे. जगाची लोकसंख्या ही २१५,१२० ने दरदिवशी वाढत आहे! भारतात नुसते जन्म किती होतात याचा विचार केल्यास सेकंदाला एक इतके होतात! त्यामुळेच किमान लोकसंख्येत तरी भारत चीनला २०२५ पर्यंत मागे टाकणार असा अंदाज आहे!
थोडक्यात येणार्या काळात या लोकसंख्येमुळे होणारे परीणाम विविध स्तरांवर दिसणार आहेत...
गेल्या काही दशकांमध्ये विकसीत आणि विकसनशील देशांची उर्जेची भूक सातत्याने वाढत गेली आहे. जस जसा एखाद्या भागाचा/राष्ट्राचा अधुनिकतेच्या निकषाने विकास होत गेला तस तसे तेथील जनतेच्या राहणीमानाच्या दर्जासंबंधातील अपेक्षा देखील उंचावत गेल्याचे दिसते. त्यात सुरवातीस शिक्षण आले, मग नोकरी-धंदा येते, मग आरोग्य, आयुष्याची मर्यादा वाढवणे, सुखसोयी वगैरे वगैरे येत जाते. पण त्याच बरोबर त्यातील आहेरे-नाहीरे ची विभागणी देखील वाढत गेलेली दिसते. त्याचे परीणाम मग स्थानिक वैमनस्यापासून ते कुठल्याही पातळीवरील युद्धापर्यंत होऊ शकतात. पण त्याचे मूळ हे बर्याचदा (धार्मिक कारणे सोडल्यास) नैसर्गिक साधन संपत्ती कुणाकडे आहे इथपासून विविध पद्धतीची आर्थिक कारणे असेच असते.
त्याच संदर्भात आता उर्जा, पाणी, सांडपाणी, अन्नधान्य, रहाण्यासाठी जागा, अशा सध्याच्या काळातील प्रत्येक मुलभूत गरजांसाठी आणि त्यांच्या स्त्रोताच्या नियंत्रणासाठी स्पर्धा होऊ शकेल, किंबहूना आजही होते असे ध्यानात घेतले तर ती अधिक तिव्र होऊ शकेल असे म्हणावे लागेल. एका गोष्टीसाठी सर्वच अवलंबून असले तरी प्रत्यक्ष स्पर्धा होणार नाही, ती म्हणजे पर्यावरण...
त्याशिवाय आता जगातील ५०% हून अधिक जनता ही शहरीभागात रहाते, त्यामुळे शहरीकरणाच्या समस्या वाढत जाणार आहेत. पण या समस्यांचे संधीमधे कसे रुपांतर करायचे हा प्रश्न आहे. त्या संदर्भातून आज अपारंपारीक उर्जेचा कसा वापर करता येईल, आरोग्य सेवा ही अधिकात अधिकांपर्यंत पोचवताना फायदेशीर कशी ठेवता येईल, दारीद्र्यरेषेखालील जनतेला वर आणताना कुठल्यापद्धतीच्या आर्थिक योजना आमलात आणता येतील, शिक्षण हे कसे दूरवर पोचवता येईल आणि त्यात व्यावहारीक शिक्षणास कसे प्राधान्य असेल (कोचिंग क्लासेस नाही!) या आणि अशा अनेक गोष्टींवरून धंदे काढता येऊ शकतात. नव्हे, असे अनेक उद्योग आज उभे आहेत, आणि अजून नवीन उभे रहात आहेत.
हा लेख/चर्चाप्रस्ताव केवळ एक या विषयावरील माहिती एकत्र करण्याची सुरवात आहे... अधिक माहिती प्रतिसादांमधून घालेनच पण वाचकांनी देखील त्यात सहभागी व्हावे ही विनंती.
-------------

वाचने
3920
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
भयानक
स्वार्थी मनुष्य प्राणी
वाढती लोकसंख्या एक संकटच.
In reply to वाढती लोकसंख्या एक संकटच. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
लोकसंख्या वाटते तेव्हढी मोठी समस्या नाही.
अतिशय योग्य मुद्द्याला हात
अतिशय योग्य मुद्द्याला हात
हो का?
जग आणि भारत