Skip to main content

प्रेमकाव्य

(काय साला त्रास आहे!)

लेखक मेघवेडा यांनी गुरुवार, 15/12/2011 01:27 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : - अर्थात हीच! मिसळलेला काव्यप्रेमी यांनी ह. घ्यावं. मूळ कविता फारच सुंदर आहे. तिला मी दिलेली दाद समजावी. :) भर दुपारी चाललेला गायनाचा तास आहे सांग कैसी काढु डुलकी, ताप हा डोक्यास आहे झोप येता धावली ती बावळी कार्टीं तुझी गं सोड तू छंदास या, हा मद्गळ्यासी फास आहे तान लावोनि भसाडी, रेडक्याला साजिरीशी गंध नाही त्या सुरांचा.. च्यायला!

जीवघेणा फास

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी मंगळवार, 13/12/2011 10:18 या दिवशी प्रकाशित केले.
सावळ्याश्या सावळीला, सावळ्याचा ध्यास आहे सांग कां तो सावळ्या रंगी, निळासा भास आहे भेट होता, सावळी ती जाहली कांती तुझी गं गोरट्या रंगात त्या, आता निळ्याचा वास आहे माळ माळूनी अबोली, सावळ्याला साजिरीशी गंध नाही त्या फुलांना, 'ती' तरीही खास आहे सावरुनी घे जिवाला, काय हा वेडेपणा गं लाजलाजूनी उरी हा, मोहणारा श्वास आहे मोरपंखी प्रीत कान्ह्याची, जरी मोही जिवाला जाण राधे त्यास अंती, जीवघेणा फास आहे |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (११/१२/२०११) मात्रा: गालगागा गालगागा गालगागा गालगागा वृत्त: व्योमगंगा
काव्यरस

का?

लेखक गोमटेश पाटिल यांनी शुक्रवार, 09/12/2011 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या ओटान्वरति आहे पण तु अशी अबोल का? जणु नदि भरून वाहुन त्याचे पाणि खोल का? डोळ्याने बोलतेस ओट तुझे बन्द का? जणु पारिजात खुलुन त्याचा सुगन्ध मन्द का? तुझ्या मनामध्ये आहे पण मन असे सुन्ध का? जणु पहिला पऊस मतित पडून त्याचा असा दुर्गध का? तुझ्या ह्रदयामध्ये आहे पण तुझा हा नकार का? जणु इतका उजेड असताना अन्धराचा आधार का?

प्रेयसी

लेखक विवेकखोत यांनी बुधवार, 30/11/2011 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
किती नाजूक ती लाजते लाजत माझ्या कडे बगते तुझ्या हसण्याने संजीवनी मिळते तुझ्या असण्याने शांतता मिळते माझे आयुष्य आता बदलले सुंदर तैलचित्र मनी जाहले किती तू अशी दूर राहणार किती ह्या काळजा जाळणार तुझा दुरावा आता सहन होत नाही जीवाची घालमेल आता बघवत नाही
काव्यरस

(भाव(खावू)गीत):फेसबुकमुळे

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 28/11/2011 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
(भाव(खावू)गीत):फेसबुकमुळे
तो: जग हे आभासी कोणा न कळे ती: (हो रे, ते खरे, पण) तु अन मी जवळी आलो फेसबूकमुळे ||धृ|| तो: तुझा आयडी होता आयडी हा खरा ती: तुझ्याच आयडीमुळे तुला शोधीला मी बरा तो: होताच लॉगलाईन तेथे प्रित आपली जुळे ||१|| तो: आठव पोस्टला माझ्या केलेस तू लाईक ती: त्यानंतर आपण कितीक फिरवीली बाईक तो: फोटो तुझा आता डिलीट करून टाक गडे ||२|| ती: नकोच फेक आयडी आता नवे नवे ते करणे तो: नकोच तसलेच फोटो पाहून उगाचच झुरणे ती: दोन आयडी नको आता एकच आयडी पुरे ||३|| ती: होईल रे आता स्टेटस अपडेट एकदा तो: नकोच
काव्यरस

भंगार, डबडा, पंचर आणि अजुन ही काही !!

लेखक सुहास.. यांनी सोमवार, 28/11/2011 18:12 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्व-प्रकाशित वपुंच एक वाक्य आहे, की माणूस प्रेमात पडला रे पडला की सर्वात प्रथम काय करतो ते म्हणजे कविता आणी त्यांनी अशीच एका नवकवीची (आनंद बक्षी ..आपल हे..नक्षी...आपल हे..पक्षी : नव प्रेमीची ) कविता ऐकविली. ' देइन मी तुला इडली ' ' तु दे मला डोसा ' ' पाहिन कोणी आपल्याकडे ' ' तर देइन त्याला ठोसा ' अर्थात हे कितपत सत्य आहे ते मला माहीत नाही आणि करुन घ्यायचे पण नाही !

युगलगीत: गार गार वारा अंगाला झोंबला

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 26/11/2011 05:46 या दिवशी प्रकाशित केले.
युगलगीत: गार गार वारा अंगाला झोंबला
तो: गार गार वारा अंगाला झोंबला तुझी साथ हाय माझ्या उबार्‍याला ती: नका जावू पुढं थांबा की थोडं आसं शोभत नाय तुम्हाला तो: आगं तू येडी का खुळी काय बोलतीया अवेळी आगं काय म्हनू मी तुला? ती: काल रातीला एकटीच व्हते घरात नव्हतं कुनी तुमी यावं आसं वाटलं पन आला नाय तुमी आज आला तर थांबा थोडं गुलुगुलु बोलू गोड गोड गुलाबी थंडीचा मोसम ह्यो आला तो: आंगाश्शी..गार गार वारा अंगाला झोंबला तुझी साथ हाय माझ्या उबार्‍याला तो: देव देव कराया नवस बोलाया आईबाप गेलं तुझं पंढरीला तु अन मी मी अ
काव्यरस

मैत्री

लेखक navinavakhi यांनी बुधवार, 23/11/2011 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
खळखळणारे पाणी भिडे कातळाला सांगे गुज मनीचे त्या स्थितप्रज्ञाला तोही मग हलकेच घेई कवेत त्याला पाणीही मग सरसावे आलिंगनाला हळुवार बोलणे त्यांचे वाटे खळाळता झरा शुभ्र लाटाही मग उठाती त्यांच्या साथीला चाले संवाद त्यांचा क्षणोक्षणी, दर एक ऋतूत निसर्गही मग देई दाद त्यांच्या मैत्रीला
काव्यरस

आठव

लेखक navinavakhi यांनी बुधवार, 23/11/2011 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
मन मोहरले आज फिरुनी तुझ्या सवे क्षण आठवती ते पहिल्या शहाऱ्याचे ते पाहणे तुझे स्तब्धपणे ... आठव आज येते सहज अनाहूतपणे
काव्यरस

जीव माझा गुंतला आहे

लेखक navinavakhi यांनी बुधवार, 23/11/2011 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
जीवाला जप तुझ्या, त्यात जीव माझा गुंतला आहे निम्मा रस्ता इतक्यातच संपला आहे पुढच्या वळणावर राहू परत उभे हातात हात घालून जाऊ सोबत दोघे जीवाला जप तुझ्या, त्यात जीव माझा गुंतला आहे सावर सगळे काळजीने, आयुष्य जग आनंदाने पुढचा रस्ता खुप खडतर आहे जीवाला जप तुझ्या, त्यात जीव माझा गुंतला आहे फिरुनी सोबत जगण्यासाठी उमेद ठेव जराशी उमेदिसोबत शारीर न झुकणार आहे जीवाला जप तुझ्या त्यात जीव माझा गुंतला आहे