गोड गुन्हा
सांग किती झेलू तूझा हा गोड गुन्हा
माझ्या पुढे बसूनी, थोडं गाली हसूनी
काय करतेस ग तू खाणाखूणा
सांग किती झेलू तूझा हा गोड गुन्हा ||धृ||
समोरासमोर आहेत आपली दोघांची घरे
बाल्कनीत उभे राहणे इतरांना दिसते सारे
हातवारे नको करू, नजरेने नको काही बोलू
शंका येईल तूझ्या बॉडीबिल्डर मोठ्या भावाला ||१||
काल क्लासला का ग नाही आलीस?
लेक्चर इन्फरमेटीव्ह मीस केलेस
आयएमपी क्वेश्शन मार्क मी केले ते;
नोटबूक घेण्याचा करते तू बहाणा
सांग किती झेलू तूझा हा गोड गुन्हा ||२||
कितीतरी वेळा झालं हे तूला सांगून
बरे दिसत नाही चारचौघात असलं वागणं
नको बोलू गर्दीत, जावू एका बागेत
थोडी तरी कळ काढ, बोलतो मी पुन्हा पुन्हा ||३||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
०५/०९/२०११
लेखनविषय:
याद्या
1759
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
हीच का ती ?
लय भारी चित्रपुप्त साहेब,लय
In reply to हीच का ती ? by चित्रगुप्त
लय भारी
In reply to लय भारी चित्रपुप्त साहेब,लय by अत्रुप्त आत्मा
पाषाण भेद - माझ्या पुढे
माझ्या पुढे बसूनी, थोडं गाली
In reply to पाषाण भेद - माझ्या पुढे by प्रकाश१११
गुन्हेगार
नाह !