क्षण
लेखनविषय:
काव्यरस
कालच्या सांजपुजेला लावलेल्या
कापूरवातीचा दरवळ अजूनही रेंगाळतोय
तशी पहाट झालीये, पण कालची संध्या
ती अजूनही घुटमळतेय इथे
.
हम्म... काल तू येऊन गेलीस.
.
लालकेशरी मावळतीला रेशिमधाग्यात धरून ठेवावे
असा तो क्षण
.
काही क्षणच असे असतात
आयुष्याचे दान देऊन जातात
.
क्षण तर सरून जातो
जाता जाता त्या दानाचे ऋण ठेऊन जातो
.
अन् मग ते फेडता फेडता
आपण क्षण क्षण मोजत राहतो
वाट पाहत राहतो
.
क्षणाचे ऋण फेडायला
आयुष्य वेचत राहतो.. नाही कां?
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(१६/०९/२०११)
वाचने
2768
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
क्षणाचे ऋण फेडायला
आयुष्य वेचत राहतो.. नाही कां?
सुरेख !
सुंदर...
काही क्षणच असे असतात आयुष्याचे दान देऊन जातात . क्षण तर सरून जातो जाता जाता त्या दानाचे ऋण ठेऊन जातो . अन् मग ते फेडता फेडता आपण क्षण क्षण मोजत राहतो वाट पाहत राहतो . क्षणाचे ऋण फेडायला आयुष्य वेचत राहतो.. नाही कां?सुंदर
अप्रतिम!!!
ज्या
"क्षणाचे ऋण फेडायला
आयुष्य वेचत राहतो.. नाही कां?"
तो क्षण नीट ठसला नाही. सुरुवात मस्त झाली आणि मग "हम्म... काल तू येऊन गेली" यात पटकन तो क्षण संपून गेला.
"ती येऊन गेली" या नाही तर संध्याकाळच्या लालबुंद किरणांच्या पायघडीवर अलगद पाऊल ठेऊन ती समोर आली तो क्षण पकडून फुलवायला हवा होता असे वाटले.
>>लालकेशरी मावळतीला रेशिमधाग्यात धरून ठेवावे
>>असा तो क्षण
हे आणी त्यानंतरचं पुढचं झकास जमलंय.
व्वाह! मस्तच. पुन्हा पुन्हा वाचली. मस्तच. हिप्नोटाईज झालो.
क्षणाचे ऋण फेडायला
आयुष्य वेचत राहतो.. नाही कां?
नव्हे तर असल्या ऋणातच राहवं वाटत.
एकदम मस्त काव्य!!
अवांतर: पुजा करतांना लक्ष कोठे होतं?
अहो सारख्या सारख्या अलवार आणि सुंदर कविता प्रकाशित करुन तुम्ही आम्हाला तुमच्या कवितेंचे व्यसन लावत आहात याची जाणिव असु द्या.
कविता आवडली!!!
शतजन्म शोधताना या गाण्याची शेवटची ओळ आठवली.
क्षण तो क्षणात गेला सखी हातचा सुटोनी
मस्त... :)
आवडली. पण ननि म्हणतायत तेही पटतंय.
काव्य -