युगलगीत: रंग हिरवा ओला ओला
लेखनविषय:
काव्यरस
युगलगीत: रंग हिरवा ओला ओला
तो: रंग हिरवा ओला ओला आला निसर्गाला
ती: प्रित तुझी माझी यावी अशीच बहराला ||धृ||
तो: थेंब नभातून खाली झरती
तो: पडता त्यांना ओठांवरती
ती: चुंबून घ्यावे थोडे प्यावे
ती: एक होवूनी वेडे व्हावे ||१||
तो: कधी प्रकाशात दिसते
तो: इंद्रधनू ते सात रंगांचे
ती: हवेत तसले रंग धनूचे
ती: हाती भरल्या लग्नचुड्याचे ||२||
तो: मोहरलेला श्वास श्वासात
तो: हात गुंतले तुझ्या हातात
ती: निसर्गात या वेडे झाले
ती: दोन जीवांचे नाते जडले ||३||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
१२/०९/२०११
वाचने
1413
वाचनखूण
प्रतिक्रिया
3
व्व्वा:
छान !!
पा भे म्हणजे दगडाला भेदुन पाझर फोडणारे
वा पाषाणभेद वा....अतिशय सुंदर आणी निर्मळ प्रीतीने नटलेले मंगलमय काव्य...लाजवाब
कधी प्रकाशात दिसते
तो: इंद्रधनू ते सात रंगांचे
ती: हवेत तसले रंग धनूचे
ती: हाती भरल्या लग्नचुड्याचे ||२||.... या ओळी अतीशय मोहवून गेल्या...
वा वा...