डिस्क्लेमर सुरु:
(शीर्षकाबद्दल कोणाला काही आक्षेप असलाच तर अॅडव्हान्समध्ये माफी मागतो. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही)
(चू भू द्या घ्या. ह घ्या.)
डिस्क्लेमर समाप्त
प्रवेश 1 ला
(स्टेजवर एक माणूस एका प्लॅस्टिकच्या खुर्चीत बसला आहे. मध्येच तो खिशातून एक मोबाईल काढून त्यात बघतो, त्याच्यावर स्वत:ची बोटं आदळतो, मग वरती धरतो, खाली धरतो. पण एवढं करून त्याचं समाधान झालेलं दिसत नाही. मग तो मोबाईल गदागदा हलवून बघतो. त्या यंत्राकडून त्याला हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचं त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट होते. तेवढ्यात एक मोलकरीण स्टेजवर येते, आणि झाडू मारायला सुरुवात करते.