Skip to main content

मुक्तक

शोध

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 03/02/2022 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
निर्झरातून वाहणारे सागरातून लहरणारे खोल आतून उमलणारे मी पणाशी झुंजणारे वास्तवाच्या वाळवंटी मृगजळे साकारणारे जाणतो मी स्वल्प काही जाणिवेला छेदणारे नेणिवा ओलांडणारे भोवताला व्यापणारे व्यापुनी हुलकावणारे नश्वराच्या चौकटीतून शाश्वताशी बोलणारे शोधतो मी गूढ काही

दोन किस्से

लेखक सुबोध खरे यांनी सोमवार, 31/01/2022 19:52 या दिवशी प्रकाशित केले.
दोन किस्से १) परवा शनिवारी माझ्याकडे एक २७ वर्षाची गरोदर मुलगी सोनोग्राफीसाठी आली होती. तिला (अंगावर जात होते) रक्तस्त्राव होत होता. सोनोग्राफी केली त्यावेळेस गर्भ ९ आठवड्याचा असायला हवा होता, तो केवळ ६ च आठवड्याचा होता आणि जन्मजात विकलांग( MALFORMED) होता. अर्थात हृदयाचे ठोके चालू नव्हतेच. त्यामुळेच रक्तस्त्राव होत होता. म्हणजेच नैसर्गिक रित्या गर्भपात होणार होता. मी त्या रडत असलेल्या मुलीला समजावत होतो कि हि एक निसर्गाची करणी आहे. तुम्ही सडका आंबा झाडाला चिकटवू शकत नाही.

स्वप्नपूर्तीचा तो दिवस

लेखक पराग१२२६३ यांनी मंगळवार, 25/01/2022 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
दिल्लीला जाण्याची माझी ती चौथी वेळ होती. पण ही दिल्ली भेट सर्वात विशेष ठरणार होती. कारण त्यावेळी माझं अनेक वर्षांपासून अपूर्ण राहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात येत होतं. त्या स्वप्नपूर्तीला यंदा 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. दिल्लीला जाण्यासाठी मी आणि माझा मित्र शशिकांत आम्ही पुण्याहून दुरंतो एक्सप्रेसनं निघालो. एकीकडे प्रवासाचा उत्साह होताच आणि दुसरीकडे दिल्लीला ज्या कारणासाठी निघालोय त्यामुळे तर उत्साह संचारलेला होता. दिल्लीला जाण्याचं त्यावेळचं निमित्त होतं प्रजासत्ताक दिनाचा सोहळा प्रत्यक्षात पाहण्याचं. प्रजासत्ताक दिनाच्या संपूर्ण सोहळ्याला माझ्यासाठी वैयक्तिक दृष्टीने अतिशय महत्व आहे.

New Edge Entrepreneurs !

लेखक चिनार यांनी शुक्रवार, 21/01/2022 23:48 या दिवशी प्रकाशित केले.
New Edge Entrepreneurs ! चार समवयस्क, समविचारी मित्र खूप दिवसांनी भेटले की काही टिपिकल गोष्टी घडतात. मित्र पिणारे किंवा न पिणारे दोन्ही असू शकतात. किंवा त्यातले दोघे पिणारे आणि बाकीचे नुसता चखना संपवणारे पण असू शकतात. सगळे नोकरीवाले असले की नोकरीत दहा-पंधरा वर्षे घासून झालेली असते. EMI आणि इतर कौटुंबिक जबाबदाऱ्या निभावताना नाकी नऊ आलेले असतात.दुनियाभराचे टेक्निकल स्किल्स आणि करियर ऍस्पिरेशन्स बाजूला ठेवून आपण केवळ आणि केवळ सर्व्हायवलसाठी खर्डेघाशी करतोय ह्याची जाणिव सगळयांना झालेली असते. या पार्श्वभूमीवर अधूनमधून मित्रांची भेट ही फार अनिवार्य असते. मित्र भेटतात. शिव्यांची देवाणघेवाण होते.

वेळणेश्वर राईड

लेखक मालविका यांनी गुरुवार, 20/01/2022 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
माझा लेक (वय वर्षे 10) याने त्याच्या बाबांसह आमच्या घरापासून वेळणेश्वर पर्यंत सायकल राईड केली. दुसऱ्या दिवशी त्याच रस्त्याने परत घरी आले. त्याने केलेले हे प्रवासाचे वर्णन. वेळणेश्वर राईड दिनांक १० जानेवारी २०२२ आम्ही वेळणेश्वरला सायकलने जायचं ठरवलं. त्यासाठी आम्ही प्रॅक्टिस करायला सुरवात केली. आम्ही १५ तारखेला ठरवलं कि उद्या वेळणेश्वरला जाऊया. मग आम्ही अगोदर सायकल रिपेअर करून घेतल्या. आदल्या दिवशी रात्री दुसऱ्या दिवशीची तयारी करून ठेवली. सकाळी ५:१५ ला उठलो व तयारी केली. आई आणि आजोबा गाडीने येणार होते व मी आणि बाबा सायकलने. आम्ही सकाळी ६:१५ ला निघालो.

कविता

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 17/01/2022 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
कामधेनूच्या कासेचे दूध म्हणजे कविता डंखानंतर मिळे तो मध म्हणजे कविता कल्पवृक्षाच्या छायेचे छत्र म्हणजे कविता अनाहत गुंजणारा मंत्र म्हणजे कविता किनार्‍याला जोखणारी लाट म्हणजे कविता अज्ञेयाला भिडणारी वाट म्हणजे कविता दहा दिशांनी घेरती अपरात्री पाश तिचे दिवसाच्या धगीमधे पार वितळे कविता

लक्ष्मणपूर, एक पडाव.........४

लेखक कर्नलतपस्वी यांनी गुरुवार, 13/01/2022 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.misalpav.com/node/49710 लक्ष्मणपूर १ https://www.misalpav.com/node/49726/backlinks लक्ष्मणपूर २ https://www.misalpav.com/node/49748/backlinks लक्ष्मणपूर ३ Laxman Tila लक्ष्मन टीला ताजमहाल सारख्या काही नशीबवान सरकारी मर्जीतल्या तर काही वेरूळ,उनाकोटी सारख्या सशक्त,

मैत्री

लेखक कर्नलतपस्वी यांनी मंगळवार, 11/01/2022 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
वेळेवर पाऊस आला की येतात ते आनंदाश्रू. मैत्री होती ढगाची उंच उंच डोंगराशी आंगचटीला आला खोड्या करू लागला म्हणून ...... टोचून टोचून डोंगर बोलला भांडण झाल जोरात म्हणून रडू आल ढगाला धार लागली डोळ्याला कट्टी घेऊन डोंगराशी वसुधेच्या कुशीत घुसला आसवांनी पुसलेले अश्रू बघून मनाशीच हसला मीत्राशीवाय करमेना आई जवळ मन रमेना लवकरच येतो म्हणून डोंगराला भेटायला गेला भेट झाली मीत्रांची दोघा पण खुश झाले अधंळी कोशीबिरीचा खेळ पुन्हा खेळू लागले आंधार पडला धरणीवर गार वारा सुटला पुन्हा भांडण होईल म्हणून बळी वाट बघत बसला १६-१२-२०
काव्यरस

एक होता कार्व्हर (ऐसी अक्षरे ...मेळवीन -५)

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 11/01/2022 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
एक होता कार्व्हर लेखिका :वीणा गवाणकर १ साधी राहणी उच्च विचारसरणी या उक्तीनुसार जगणारे,वागणारे मानव जातीला वरदान असतात.