Skip to main content

मुक्तक

मुंबई लोकल मधील खरेदी

लेखक मालविका यांनी सोमवार, 20/06/2022 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या कोकणात वास्तव्य असल्याने मुंबईत काही कारणाशिवाय येणं होत नाही. सुरवातीला शिक्षणासाठी आणि मग नोकरीसाठी काही काळ मुंबई मध्ये असल्याने मुंबई लोकलची चांगली माहिती आहे. सेंट्रल, वेस्टर्न, हार्बर तिन्ही मार्गांवर तेव्हा भरपूर भटकून घेतलंय. त्यामुळे लोकलची सवय नसली तरी भीती मात्र नक्कीच नाही. हां पीक अवर्स ना मी जाण्याचं टाळते निश्चित. मुंबईला आल्यावर कधी वेळ आलीच लोकलने फिरायची तर मला खूप उत्सुकता असते. एक तर मी नेहमी स्लो लोकल पकडते. याआधीच्या अनुभवानुसार मी फास्ट लोकल पकडली कि ती सिग्नलला एवढा वेळ काढते कि स्लो पुढे निघून जाते.

पुनर्जन्म

लेखक पाटिल यांनी सोमवार, 06/06/2022 22:28 या दिवशी प्रकाशित केले.
पुनर्जन्माचं तसं काय फिक्स नसतंय. किती टाईम लागेल काय सांगता येत नाय..! म्हणजे असं बघा की जुनी गोष्ट आहे..! साधारण दोनेक हजार वर्षें झाली असतील...! तेव्हा आपल्या भागात सातवाहन वगैरेंचं राज्य होतं.. त्यांची एक राजकन्या होती.. आणि मला ती आवडायची. अर्थात, माझ्यासारख्या हजारो फाटक्या मनुष्यांना ती आवडत असणार हे साहजिकच आहे.. आणि हे तिच्या खिजगणतीतही नसणार, हे ही स्वाभाविकच म्हणावे लागेल.!

‘पंजाब मेल’

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 04/06/2022 09:20 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईतील ‘छत्रपती शिवाजी महाराज (ट)’ आणि पंजाबमधील फिरोजपूर कँट यादरम्यान धावणारी ‘पंजाब मेल’ गेल्या 1 जूनला 110 वर्षांची झाली आहे. मुंबईहून ‘पंजाब मेल’ सुरू झाली त्या दिवसाची नक्की तारीख माहीत नाही. पण रेल्वेने ती तारीख 1 जून 1912 असेल असे गृहीत धरले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटनमधून भारतात आलेले अधिकारी आणि अन्य युरोपियन प्रवाशांसाठी ही रेल्वेगाडी सुरू करण्यात आली होती. त्यावेळी ती गाडी तत्कालीन ‘व्हिक्टोरिया टर्मिनस’ (सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते अखंड भारताच्या वायव्य सीमांत प्रांताची राजधानी असलेल्या पेशावरपर्यंत धावत होती.

व्यायाम: आय डोन्ट केअर

लेखक आजी यांनी मंगळवार, 31/05/2022 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
व्यायाम आणि डाएट (विविध प्रकारची) याबद्दल इतक्यांकडून,इतक्यांदा, इतकं लिहिलं गेलंय की आता ही वृद्धा आणखी नवीन काय लिहिणार असं तुम्हांला वाटेल. पण जसा/जशी प्रत्येकजण प्रेमात पडतो/पडते. काहीजणं तर अनेकदा प्रेमात पडतात, आणि त्या प्रत्येकाला आपलं प्रेम वेगळं, नव्या नवलाईचे, नवंकोरं आणि दुसऱ्याला"सांगण्यासारखं"वाटतं तसंच हे आहे. मलाही माझ्या व्यायामाबद्दल नव्यानं सांगावंसं वाटतं. खरं सांगायचं तर मी जन्मभर व्यायाम करत आलेली आहे. पण माझ्या वजनाचा आणि व्यायामाचा फारसा काही संबंध नाही हे माझ्या पक्कं लक्षात आलेलं आहे.

इंद्रजाल

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 24/05/2022 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
शतकातुनी एखादा रचितो कवि, शब्दांचा जमवुनी मेळ, कविता- जी करुनिया अचंबित विलक्षणाचा मांडी खेळ जेथ पोचुनी तर्क कुंठतो तीच वाट पकडे कवि तो इंद्रजाल शब्दांचे विणी -जे रसिक कधी भेदू न शकतो नित्य बदलते दृष्य दिसावे स्फटिक लोलकातून जसे वाचत असता ऐसी कविता पुन्हा नवी का भासतसे?

अपरिचित पोलो

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 21/05/2022 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
भारत आधुनिक पोलोची जननी असला तरी हा क्रीडाप्रकार इथे फारसा लोकप्रियही झालेला नाही. हातात लांब स्टिक घेऊन घोड्यावर बसून खेळला जाणारा आणि हॉकीप्रमाणेच भासणारा हा क्रीडाप्रकार. हा खेळ अतिशय प्राचीन मानला जातो. या खेळाची सुरुवात नक्की कोठे झाली याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. तरीही या खेळाचे उगमस्थान भारतच असल्याचे संकेत देणारे काही पुरावे उपलब्ध आहेत. भारतात असलेल्या जगातील सर्वात जुन्या पोलो क्लबच्या स्थापनेला या वर्षी 160 वर्षे पूर्ण झाली आहेत. भारतात मणिपूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या सगोल कांग्जेई या क्रीडाप्रकाराला पोलोचे उगमस्थान मानले जाते.

#तू म्हणालास

लेखक प्राची अश्विनी यांनी सोमवार, 16/05/2022 19:10 या दिवशी प्रकाशित केले.
#तूम्हणालास तू म्हणालास "सवय लावून घेऊ नये" "मन बिघडू देऊ नये, उगा जीव लाऊ नये." पण "नये नये" चा पाढा कधी अर्ध्यावरती चुकतोच ना? मुकाट्यानं त्याचे परिणाम भोगत आपण असतोच ना? कित्ती दिवसांत भेट सोडा, एक साधा शब्द नाही. कुणी वेडं वेड्या सारखं वेडी वाट बघतंच ना? "कामात व्यस्त" पटतं, "अपेक्षा चूक" कळतं. पण मोबाईल हातामध्ये रोज घेऊन बसतंच ना? मगं कुणी ठरवतं, आता मात्र बदलायचंच. वेडेपणा सोडून आता शहाण्यासारखं वागायचंच. यापुढे आपणहून बोलायला कधी जायचंच नाही. समोरसमोर (समजा) आलोच तरी भेटायचं तर नाहीच नाही. हो नाही च्या पुढे गाडी कधी न्यायचीच नाही एकदा ठरलं म्हणजे ठरलं, दगडावरची रेघ जणू! असूदे का डोळ्
काव्यरस

मिपा संस्थापक, श्री तात्या अभ्यंकर, यांना श्रध्दांजली - पुण्यतिथी ३

लेखक Trump यांनी रविवार, 15/05/2022 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
तात्या १५ मे २०१९ रोजी वारले. साधारणतः २००७ मध्ये मिपाची स्थापना केली. आपल्या सारख्या अनोळखी लोकांना मन मोकळे करण्याचा आणि उत्तमोत्तम लेखनाचा आस्वाद घेण्याचा मार्गे उपलब्ध करुन दिला, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. त्यांच्या विषयी इतरांनी भरभरुन लिहिले आहे. मला त्यांना शेवटी भेटता आले नाही आणि कोणतीही मदत करता आली नाही यांची खंत वाटते.

50 वर्षांची चिरतरुण ‘राजधानी’

लेखक पराग१२२६३ यांनी रविवार, 15/05/2022 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईहून दिल्लीला रेल्वेने जाण्या-येण्यासाठी आजही पहिली पसंती असलेली 12951/52 राजधानी एक्सप्रेस येत्या 17 मेला 50 वर्षांची होत आहे. आज ही रेल्वेगाडी हायटेक झाली असली तरी तिच्यात येत्या काळात अजूनही सुधारणा होत जाणार आहेत. विविध राज्यांच्या राजधान्या देशाच्या राजधानीशी जलद आणि आरामदायक रेल्वेसेवेने जोडण्यासाठी राजधानी एक्सप्रेस ही संकल्पना आणली. त्यानुसार भारतातील पहिली राजधानी एक्सप्रेस सुरू झाली 1 मार्च 1969 ला नवी दिल्ली आणि हावड्यादरम्यान. संपूर्ण वातानुकुलित असलेल्या या वेगवान रेल्वेगाडीत विमानाप्रमाणे सेवा पुरवण्यात येत असल्याने पुढील काळात ही संकल्पना लोकप्रिय होत गेली.

रोज किती पाणी प्यावे?

लेखक माहितगार यांनी रविवार, 24/04/2022 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
रोज किती पाणी प्यावे? शरीराची गरज असेल एवढे आणि आधुनिक विज्ञानाने सुविद्य डॉक्टर सुचवतील तेवढे रोज किती पाणी प्यावे? अन्न पिकविण्यासाठी शेतीसाठी शिल्लक राहील एवढे रोज किती पाणी प्यावे? शेती आणि शरीरांची गरज यांचे गणित नाही जुळली तर इतर अपव्यय टाळून लोकसंख्या नियंत्रणाचे महत्व ईतर चार जणांना पटवून शरीराची गरज भागेल तेवढे