Skip to main content

मुक्तक

माली पुन्हा अस्थिर

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 26/02/2022 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षाकडे सध्या जगाचे लक्ष लागले आहे. पण त्याचवेळी तिकडे आफ्रिकेमध्ये मालीमधून फ्रेंच सैन्याला आपली मोहीम अर्ध्यावर सोडून माघार घ्यावी लागली आहे, तीही घटना जगात चर्चेचा विषय ठरली आहे. फ्रांसने आपली मोहीम गुंडाळण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर लगेचच तेथील जिहादी गटांच्या कारवायांनी वेग घेतला आहे. फ्रांसने पुढाकार घेऊन 2013 मध्ये सुरू केलेल्या Operation Serval नंतर मालीमधील जिहादी गटांवर काही प्रमाणात नियंत्रण आले; पण त्याचवेळी या गटांनी आपलं कार्यक्षेत्र मालीच्या आजूबाजूच्या देशांमध्येही विस्तारलं. या मोहिमेतून जिहादींविरुद्ध मोठ्या प्रमाणात आघाडी उघडली गेली.

पटवर्धन अण्णा

लेखक मालविका यांनी बुधवार, 23/02/2022 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
पटवर्धन सरांकडे आम्ही इंग्लिश विषयासाठी क्लासला जायचो. युनायटेड इंग्लिश स्कूल अर्थात आमच्याच शाळेतून खूप पूर्वी सर रिटायर्ड झालेले होते. शाळेत होते म्हणून सर नाहीतर त्यांना अण्णा म्हटलेलंच आवडायचं. बरीच मुलं त्यांना सर म्हणायच्या ऐवजी अण्णाच म्हणत. सर घरीच इंग्रजीचे क्लास घ्यायचे. फक्त 9 वी आणि 10 वी ची मुलं. सकाळी 7.30 ते 8.30 10 वीची बॅच, 8.30 ते 9.30 9 वीची बॅच आणि शेवटी 9.30 ते 10.30 परत एक दहावीची बॅच. एवढ्या तीनच बॅच दिवसभरात असायच्या. त्यांच्या घरातल्या त्या छोट्याश्या पडवीत हा क्लास चालायचा.एक वेळी जास्तीत जास्त 15 ते 17 मुलं माऊ शकतील एवढीच खोली होती ती.

आदिमाय

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 20/02/2022 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या पुस्तकांच्या कपाटात मूळाक्षरांशी ओळख झाल्यापासून कुणीकुणी घेऊन दिलेली, मग असोशीने विकत घेतलेली, देहभान विसरून वाचलेली, पुन्हापुन्हा पारायणं केलेली, बहुतांश मुखोद्गत झालेली, वाचून मिटल्याला युगं उलटून गेलेली हारीने मांडलेली जिवापाड जपलेली पुस्तकं आजकाल बघतोय एकेक गायब होतंय अन् कपाटात त्यांच्याजागी... दुसरंच काहीतरी प्रगटतंय कथा-कविता-कादंबर्‍यांच्या जागी भयाण पोकळी चरित्रग्रंथांजागी मुखवटे वैचारिक ग्रंथराजांच्या खणात गुंतवळी विज्ञानग्रंथांच्या जागी बूमरँगची धारदार पाती इतिहासाच्या जागी काटेरी कुंपणतारांची भेंडोळी आज तरीही नेटानं कपाटापाशी गेलो थबकलो भांबावलो ऐकून पानांची फडफड नव्या प

जहाजांचा मेळावा

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 19/02/2022 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या संरक्षणासाठी प्रबळ आरमाराची उभारणी केली. स्वत:ची प्रबळ आरमारीशक्ती असलेले आधुनिक भारताच्या इतिहासातील हे एकमेव उदाहरण. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना ‘भारतीय नौदलाचे जनक’ म्हटले जाते. योगायोगाने यंदाच्या शिवजयंतीनंतर लगेचच भारताचे राष्ट्रपती येत्या 21 फेब्रुवारी 2022 ला विशाखापट्टणम येथे भारताच्या नाविकशक्तीचे अवलोकन करत आहेत. आपल्या नाविक इतिहासाची आणि परंपरांची माहिती करून देतानाच नौदलाच्या शक्तीची झलक दाखवणारा ‘राष्ट्रपतींचे ताफा निरीक्षण’ (Presidential Fleet Review) हा समारंभ. तो अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडत असतो.

जहाजांचा मेळावा

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 19/02/2022 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या संरक्षणासाठी प्रबळ आरमाराची उभारणी केली. स्वत:ची प्रबळ आरमारीशक्ती असलेले आधुनिक भारताच्या इतिहासातील हे एकमेव उदाहरण. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना ‘भारतीय नौदलाचे जनक’ म्हटले जाते. योगायोगाने यंदाच्या शिवजयंतीनंतर लगेचच भारताचे राष्ट्रपती येत्या 21 फेब्रुवारी 2022 ला विशाखापट्टणम येथे भारताच्या नाविकशक्तीचे अवलोकन करत आहेत. आपल्या नाविक इतिहासाची आणि परंपरांची माहिती करून देतानाच नौदलाच्या शक्तीची झलक दाखवणारा ‘राष्ट्रपतींचे ताफा निरीक्षण’ (Presidential Fleet Review) हा समारंभ. तो अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडत असतो.

आक्रीत

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 11/02/2022 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
सापशिडीच्या डावात माझ्या घडते आक्रीत शिड्या गिळतात साप आणि टाकतात कात बुद्धिबळाच्या डावात माझ्या घडते आक्रीत राजा पांढरा, तयाची काळ्या रंगावर प्रीत घडे आक्रीत तसेच माझ्या जगण्यात रोज वास्तवाच्या कोलाहली कानी अद्भुताची गाज
काव्यरस

सिर्फ त्रिवेदी बचेगा।

लेखक कर्नलतपस्वी यांनी शनिवार, 05/02/2022 18:45 या दिवशी प्रकाशित केले.
पहिली,दुसरीला बसवलं होतं फाट्यावर तीसरीने केली कुरघोडी आणून बसवलं खाटेवर कधी आली,कशी आली माहीत नाही कुठं गाठ पडली अतीरेक्या सारखी घुसली पहिल्या फळीची दाणादाण उडली लढवत होती पंजा आजमावत होती जोर पण मजबूत ज्याचा माजां तोच कापणार होता दोर लढवत होती पेच टाकत होती डाव घालत होती सह्याद्रीच्या उरावर टिकावा चा घाव तीन दिवस तीन रात्री घमासान लढाई केली खूप काढला घाम आणी खूप दमणूक झाली शिजत नाही डाळ बघून मागे परत फिरली टिबं टिबं च्या.................. प्रेमा पुढे ती बिचारी हारली ती बिचारी हारली....... सात दिवस अडां सेल मधे काढल्यानंतर आज ठीक वाटत आहे.

रानवट

लेखक Bhakti यांनी गुरुवार, 03/02/2022 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
वार्‍याची लहर फडफडणारा पदर उधळले रंग विभोर चालत होते रानवट|| उषेचे स्मित ओठांवर दवांची माळली धार अणू रेणूचे नुपूर चालत होते रानवट|| कोमल स्पर्श अवनी विखुरलेल्या दिशा वेचुनी लाटांचे नीरज तोडूनी चालत होते रानवट|| डोहाच्या तळाशी आठवणी सुरूंग त्यावर पेरुनी राखेचा घट उचलूनी चालत होते रानवट|| अज्ञानाचे सुख त्यागुनी ज्ञानाची ठेच लागली ठसे उमटली आरसपानी चालले ....रानवट|| -भक्ती

आणखी एक किस्सा

लेखक सुबोध खरे यांनी गुरुवार, 03/02/2022 20:20 या दिवशी प्रकाशित केले.
आणखी एक किस्सा काल माझ्याकडे एक सद्गृहस्थ आले होते. वय वर्षे ४३ हे एका प्रथितयश आय टी कंपनीत सप्लाय चेन मॅनेजमेंट मध्ये काम करत असतात. त्यांना आम्लपित्त होत होतं त्यासाठी. व्यायाम शून्य, एका जागी बसून सकाळी ९ ते रात्री ९ काम, वेळी अवेळी जेवण, मसालेदार तेलकट जेवण रोजचंच. (आय टी मध्ये भरपूर पगार मिळणाऱ्या टिपिकल माणसाची कथा) सोनोग्राफी केली. बाहेर खाल्ल्यामुळे पोट बिघडून आतड्याला सूज आलेली होती. आणि यकृतात चरबी ठासुन भरलेली दिसत होती. मी त्यांना विचारलं, वजन किती आहे? त्यावर ते म्हणाले ९८ किलो. त्यांची उंची ५ फूट ७ इंच आहे. त्यांना विचारलं घरी कुणाला मधुमेह आहे का?

शोध

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 03/02/2022 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
निर्झरातून वाहणारे सागरातून लहरणारे खोल आतून उमलणारे मी पणाशी झुंजणारे वास्तवाच्या वाळवंटी मृगजळे साकारणारे जाणतो मी स्वल्प काही जाणिवेला छेदणारे नेणिवा ओलांडणारे भोवताला व्यापणारे व्यापुनी हुलकावणारे नश्वराच्या चौकटीतून शाश्वताशी बोलणारे शोधतो मी गूढ काही