Skip to main content

मुक्तक

प्रकाशवाटा

लेखक Bhakti यांनी गुरुवार, 28/07/2022 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
अमावस्येला आकाश काळ्या चादरीवर चांदण्यांचे बुट्टे लेवून असते. त्याचा सखा शशी आज दूर फिरायला गेलाय जणू! तेव्हा या आकाशाचे पृथ्वीच्या निजरातीशी हितगुज मनमोकळे होत असावे. म्हणूनच का दिव्यांचे उत्सव त्या आकाशाचा एकाकीपणा घालवायला अमावस्येलाच असतात का?दीपअमावस्या ,दीपावली हे त्यातले उत्सव अग्नि तत्वाशी एकरूप! मला जशी जाण आली तशी अनेक गोष्टी पंच तत्वाशी जोडायची सवयस जडली. दीपावलीला दिव्यांची रांग ओळ मांडताना ती संपूच असं वाटतं .सगळं जग लखलख उजळून निघताना मनातला अंधार नाहीसा होतो .तिथे एक दीप मंद तेवतो . दीप अमावस्याचे तत्वही अग्नी!

पुस्तक परिचय - वडीलधारी माणसे - लेखिका शांताबाई शेळके

लेखक मालविका यांनी मंगळवार, 19/07/2022 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
शांताबाईंच पुस्तक म्हणून सहजच दुकानात दिसलं आणि घेतलं हे पुस्तक. आज चवथ्या किंवा पाचव्यांदा वाचतेय. नावावरून कळलं असेलच कि यात व्यक्तिचित्र वाचायला मिळतील. शांताबाईंच्या कविता मला खूप आवडतात. पण त्यांचं गद्य लेखन मी फारसं वाचलेलं नाही. त्यामुळे हे पुस्तक दिसल्यावर मी लगेच घेतलं. आणि अगदी डोळे मिटून विश्वास ठेवावा आणि तो सार्थ ठरावा असं या पुस्तकाबाबत झालं. सहज सध्या सोप्या भाषेत त्यांनी त्यांच्या आयुष्यात आलेल्या काही व्यक्तींबाबत यात लिहिले आहे. कुठे बोजड शब्दांचा वापर नाही, कुठे अतिरेकी कौतुक केले नाही.

एकदा

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 19/07/2022 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
अक्षयाचा डोह भरुनी वाहतो जेथे सदा सांडवा तिथला कुठे ते सांगशिल का एकदा? अद्भुताचा ढग निळा ओथंबतो जेथे सदा बरसतो केव्हा, कुठे ते सांगशिल का एकदा? नीरवाचा घुंगरू बघ रुणझुणे येथे सदा सातही स्वर वर्ज्य तरिही ऐकशिल ना एकदा!

आपण सगळेच अश्वत्थामे

लेखक कर्नलतपस्वी यांनी गुरुवार, 14/07/2022 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
लिहीण्याचा उद्देश जे उत्कटतेने वाटते ते लिहावे.चुक,बरोबर,चांगले वाईट हे वाचणाऱ्यांनी ठरवावे. युगांत(इरावती कर्वे),मृत्युंजय, युगंधर आणी आता अश्वत्थामा ही पुस्तके वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने वाटली,ती म्हणजे महाभारतातील प्रत्येक व्यक्ती आपापल्या कर्माची फळे भोगून मुक्त झाली. प्रत्येकजण आपापल्या जागी बरोबर व दुसर्‍यांच्या लेखी चुक होता,अश्वत्थामा सुद्धा. अश्वत्थाम्याचे चिरंजीवीत्वाचे वरदान ऐवढे शापित निघेल हा विचार कदाचित नियतीने सुद्धा केला नसावा. म्हणूनच अश्वत्थाम्या नंतर तीने (नियतीने) कुणालाच हे वरदान दिले नसावे. अश्वत्थामा शेवटचा चिरंजीव. अश्वत्थामा आपल्या कर्माची फळे भोगतोय.

आठवणींच्या जंगलात-१

लेखक कर्नलतपस्वी यांनी मंगळवार, 12/07/2022 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
खाटेवर पडताच भूल दिल्या सारखी क्षणात झोप लागली......पुढे.... http://misalpav.com/node/50393/backlinks वाचकांचे, प्रतीसादकांचे धन्यवाद. काश्मीर खोर्‍यातील व सीमावर्ती भागातील भुमीपुत्रांना प्रतिकूल परिस्थितीची सवय आसते. सैनिकांना मात्र सर्वथा नवीन वातावरण,स्वतःला प्रकृतीशी मिळते जुळते घेताना विषम परीस्थीतीला तोंड द्यावे लागायचे/लागते. खास करून जेव्हां कडाक्याच्या थंडीत या भागात बदलून येतात त्यांना जास्त त्रास होतो. मी डिसेंबर मधे रिपोर्ट केला होता. "सर मुंडाते ही ओले पडे".

सुंदर ते ध्यान

लेखक Bhakti यांनी गुरुवार, 07/07/2022 23:06 या दिवशी प्रकाशित केले.
ध्यास सावळ्या विठूचा मनी वाट पंढरीची चालावी चालावी... समस्त संतांना ज्या रूपाने भक्तीची दीक्षा दिली,त्याच विठूच्या रूपाचा ध्यास घेत आजही भक्तीमय वारकरी पंढरीकडे मार्गस्थ करीत राहतो.

आठवणींच्या जंगलात

लेखक कर्नलतपस्वी यांनी शनिवार, 02/07/2022 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वरंग त्रेचाळीस वर्षापुर्वीची आठवण व अंतरजालावर उपलब्ध आसलेली माहीती एकत्र गुंफून धागा विणायचा प्रयत्न त्यामुळे कुठे कुठे विषयांतर झाले आहे.

अतृप्त ओळी

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 29/06/2022 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
आत्मसमरूप दिसतात ओळी आत्मस्वरूप असतात ओळी . इथे नदीचा दिसतो काठ तिथे संथ प्रवाह पार लावतात ओळी . निराळ्या वेदनेच्या एकाच गावी दिसता दिसतो आम्ही सहप्रवासी कुठे दूर अंधारात हरवले गाव माझे दिसे मी उगाचच तिथला निवासी असे शब्द साधे येतात साथी कविता त्यातुन वाहते प्रपाती . उरी अंतरी घाव नाजूक खोल वरी दिसते केवळ शांत ज्योती ! आम्ही नाही ऐसे कवी ज्यास म्हणती जशी वेदना ती , तसे शब्द हाती. मनाचेच सारे इथे मांडयाचे .. न पूर्ती मिळे त्यातूनी .. काय त्याचे? असा मी ही अतृप्त अतृप्त आहे . . माझ्या स्वभावी मूळचा शाप आहे .

वळण नसलेल्या वाटेवर

लेखक कर्नलतपस्वी यांनी सोमवार, 27/06/2022 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
*वळण नसलेल्या सरळ वाटेवर* जेंव्हा कोणीतरी खास भेटतं मग सरळ रेषेतलं आयुष्य नागमोडी होऊन जातं वादळ आणी पाऊस मग नित्याच होतं पण वादळा पूर्वीची शांतता सोसण मात्र असह्य होतं सोसाट्याचा वारा ,गारांचा मारा संतत श्रावणधार, रस्ता चिबं होतो आणी हवाहवासा गारवा वाटेवर पसरतो भिजलेला रस्ता,दाटलेली हिरवळ पुन्हा एकदा कुशीत येते अन वाटेवरली मरगळ त्वरीत निघून जाते आसेच कुणीतरी खास भेटावे प्रत्येकाला वाटते मग नागमोडी वाट सुद्धा सरळ भासते २७-६-२०२२

विंबल्डनचे सेंटर कोर्ट

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 25/06/2022 19:44 या दिवशी प्रकाशित केले.
टेनिसविश्वातील सर्वांत मानाची ग्रँड स्लॅम स्पर्धा, विंबल्डन टेनिस स्पर्धा सालाबादप्रमाणे 27 जूनपासून सुरू होत आहे. लंडनजवळील ही विंबल्डननगरी टेनिसपटूंची पंढरी म्हणून ओळखले जाते. म्हणूनच या स्पर्धेत मानाच्या सेंटर कोर्टवर खेळण्याचे आणि अर्थातच विजयी होण्याचे प्रत्येक टेनिसपटूचे स्वप्न असते. या सेंटर कोर्टच्या उभारणीला 2022 मध्ये 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. म्हणूनच यंदाच्या स्पर्धेच्या निमित्ताने या सेंटर कोर्टविषयी. विंबल्डन सुरू झाल्यावर काही वर्षांमध्येच स्पर्धेचा लौकीक वाढत गेला आणि त्यात सहभागी होणाऱ्या टेनिस स्पर्धकांची संख्याही वाढू लागली.