Skip to main content

मुक्तक

अंतर

लेखक जयवी यांनी बुधवार, 30/04/2008 00:34 या दिवशी प्रकाशित केले.
कितीक हळवे…. कितीक सुंदर किती शहाणे अपुले अंतर आत्ताच ह्या गाण्याच्या ओळी ऐकल्या…..अगदी आत पर्यंत भिनत गेल्या. दोघांमधले हे अंतर कितीवेळा असे शहाणे असते….!! कधी हे अंतर अगदी आरपार छेदून जातं तर कधी युगं लोटून जातात पण पार करता येत नाही. कधी हे अंतर ..अंतर वाटतंच नाही. इतकी दोघं एकमेकांच्या जवळ येतात. एकदा ही जवळीक साधली की मात्र बाकीचे फार दूर वाटायला लागतात. कधी एकमेकांच्या जवळ पोचायला सुद्धा कोणी तरी बांधून दिलेल्या पुलाची….सेतूची गरज लागते. कित्येकदा तो बांधून दिलेला पूल मोडकळीस येतो….. त्याला गोंदण-शिंपण करुन नेटका करता करता जीव मेटाकुटीला येतो.

जीए

लेखक हेरंब यांनी शनिवार, 26/04/2008 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
जी. ए. यांचे 'पिंगळावेळ' व काजळमाया' हे दोन कथासंग्रह मी पहिल्यांदा वाचले तेंव्हा मनांत जे घडले त्यातून हे मुक्तक स्फुरले. त्यासाठी त्यांचे शब्द उसने घ्यावे लागले. त्यानंतर त्यांचे संपूर्ण लेखन वाचण्याची एक ओढच लागली.
Taxonomy upgrade extras

माणुसकीचा झरा

लेखक शितल यांनी शनिवार, 26/04/2008 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्याला एकदा तरी माणसातच देवाचे रुप दिसते, आणि त्या क्षणा करिता तीच व्यक्ती आपल्यासाठी देव असते. त्या व्यक्तीला आपण कधीच विसरत नाही त्याच्यातील माणुसकीला आपला सलाम असतो. मी येथे माझे दोन अनुभव सा॑गणार आहे.

नावात काय नाही?

लेखक श्रावण मोडक यांनी रविवार, 20/04/2008 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
काही कामानिमित्त परवा एका स्नेह्यांच्या घरी फोन केला. त्यांच्या कन्येनं - ओजसनं - फोन घेतला. 'मोडक बोलतोय. आई आहे?' 'थांबा हं. देते.' असं म्हणत तिनं आईकडं फोन दिला. त्यांनी फोन घेतला तेव्हा पहिलंच वाक्य होतं, 'ओजस म्हणतेय की, यांचं नाव इतकं सुंदर असून हे मोडक असं का सांगतात?' 'बऱ्याच वर्षांपासून ती एक सवय बसली आहे. काही केल्या जात नाही...' मी उत्तर देऊन मोकळा झालो. हा अनुभव काही पहिलाच नव्हता. याआधीही एकदा असा अनुभव आला होता. त्यावेळी मी एका लोकसंघटनेसोबत जोडून घेतलं होतं.