Skip to main content

मुक्तक

इथे अग्निपंख फुलले होते!

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 30/12/2007 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
इथे अग्निपंख फुलले होते!... ... गावातल्या रस्त्याकडेचा मासळी बाजार फुलायला लागला आणि आसपासच्या झाडांवर पक्ष्यांचा वखवखलेला कलकलाट सुरू झाला. रात्रीच्या निवाऱ्यापुरती आणि पिलावळीच्या आसऱ्यासाठी काडीकाडी जोडून वाळल्या झाडांवर बांधलेली घरटी सोडून सगळे कावळे मासळी बाजाराकडे झेपावले. पलीकडच्या गल्लीतल्या अवाढव्य पसरलेल्या, जगण्याची आशा सोडलेल्या रुग्णाईत म्हाताऱ्यासारख्या चिंचेच्या झाडावरच्या बगळ्यांच्या थव्यांचे ध्यान मोडले आणि पांढुरके पंख पसरत घरट्यातल्या घरट्यात त्यांचा नाच सुरू झाला.

मन...

लेखक शब्दवेडा यांनी शुक्रवार, 28/12/2007 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
मन पाखरांची किलबिल ओल्या हिरव्या रानी.. मन दवबिंदू सांडलेले गवताच्या पानोपानी.. मन मुग्ध वसंताची चाहूल मन बोचर्या शिशिरातील पानगळ.. मन झुळुक वार्याची हळुवार.. मन भयाण वादळ अनिवार.. मन शोध सुखाचा दूरवर.. मन दु:ख दडलेले खोलवर.. मन मुक्त हास्याची खळखळ.. मन मुक्या अश्रून्ची गलबल...
Taxonomy upgrade extras

"तारे जमिन पें" :- वेगवेगळ्या दिग्दर्शकांच्या नजतेतून .... [ आमिर ईज बेस्ट !!!]

लेखक छोटा डॉन यांनी शुक्रवार, 28/12/2007 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
"तारे जमिन पें" पाहिला की नाही? मला माहित आहे तिकिटे मिळत नाहीत ,तरिपण एकदा थेटरवर चक्कर टाकाच आणि बाहेर पडणार्‍या प्रेक्षकांकडे निट पहा. नेहमीसारखा गोंधळ, दंगा करत बाहेर पडणारा प्रेक्षकवर्ग आज असा शांत का दिसतो आहे. काही जण एकदम स्तब्ध दिसत आहेत, काहिजण एकदम हरवल्यासारखे चालत आहेत, काहिंच्या चेहर्‍यावर विचारांचे काहूर माजले आहे. काय झाले नक्की थेटरात? कशामुळे सर्वजण असे वागत आहेत?

नवा चित्रपट "दस कहानियाँ :- सिनेमा जगताची पण २०-२० !!!

लेखक छोटा डॉन यांनी गुरुवार, 20/12/2007 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
या चित्रपटाच्या प्रदर्शानानंतर चित्रपटस्रुष्टी सुध्धा नव्या साचात बदलत आहे याची जाणीव होते. याच्या आधी "डरना मना है, सलामे इश्क" यासारख्या चित्रपटातून हे प्रयत्न झाले पण प्रत्येक कधेचा कही ना काही धागा शेवटी एकत्र आला. पण "दस कहानियाँ " हा एकदम वेगळा अनूभव आहे. दहा वेगवेगळ्या कथा, एकाचा दुसरीशी काहीही संमंध नाही हे वेगळेपण. माझा नजरेने घेतलेला आस्वाद ....... *** मॅट्रोमोनी **** एका कंपनीच्या अति कार्यमग्न असणार्‍या "वाईस प्रेसिडेंटच्या" पत्नीची ही कथा. एकटेपणाला कंटाळलेली ही पत्नी मग स्वताच वेगळा मार्ग शोधते. अर्थातच पतीला अंधारात ठेवून.

समुद्रपक्षी

लेखक स्वाती दिनेश यांनी सोमवार, 17/12/2007 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
Richard Bach च्या 'जोनाथन लिंग्विस्टन सी गल ' चे मुक्त/स्वैर रुपांतरः आहे मी एक समुद्रपक्षी, माहित आहेत मर्यादा,माझ्या मला...पण, मर्यादा आणि आकांक्षा,प्रमाण आहे व्यस्त उंच आकाशात भरारी घ्यायची आहे मला मस्त! कार्वर म्हणतो, Start where you are, with what you have make Something of it Never be satisfied! मग मी का नाही जायचं,उंच उंच आकाशात? माझे दोन चिमुकले पंख, पेलतील ना हे शिवधनुष्य! आणि,होईल त्याचंच इंद्रधनुष्य,सप्तरंगी! कारण,जोडीला माझी जिद्द आहे, आहे आकांक्षा आणि माझी इच्छाशक्ती, माझी मनोदेवता,माझा आतला आवाज! नाह
Taxonomy upgrade extras

भक्तीची शक्ती...

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 16/12/2007 09:55 या दिवशी प्रकाशित केले.
भक्तीची शक्ती... मुंबईच्या लोकल ट्रेनमधून सकाळ्च्या वेळी प्रवास करायचे मी टाळतो. पण त्या दिवशी नाईलाजच होता. सकाळी दहा वाजता नरीमन पॉईंटला पोहोचायचंच होतं. मी नाखुषीनंच स्टेशनवर आलो आणि गर्दीचा अंदाज घेण्यासाठी पाचदहा मिनिटं ब्रीजवरच उभा राहिलो. चर्चगेटकडे जाणारी एखादी गाडी येताना दिसली, की जिन्यावरच्या गर्दीची पळापळ व्हायची. हे मी अगोदरपण बघितलेलं होतं. पण माझ्यावर तशी वेळ येणार नाही, असं मला नेहमी वाटायचं. त्या दिवशी मात्र मी पराभूतासारखी शरणागती पत्करली. मुंबईत राहून ट्रेनची गर्दी टाळणं म्हणजे पाण्यात राहून कोरडं राहण्याच्या गमजा मारणं होतं, हे मला त्या दिवशी उमगलं.

निःश्‍वास

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 15/12/2007 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
निःश्‍वास दिल्लीत रेल्वे स्टेशनच्या फलाटावर कोपऱ्यातल्या गाठोड्याएवढ्या बिऱ्हाडावर नजर ठेवताठेवता सात वर्षांच्या शंकरचा छोट्या सावत्र बहिणीने पकडलेला हात सुटला. तो भानावर आला, तेव्हा आसपास ती कुठेच दिसत नव्हती. आता सावत्र आई मारणार, या भीतीने शंकर शहारला आणि समोरच्या गाडीत लपला. गाडी सुरू झाली. "सुटल्या'च्या जाणीवेनं डब्यातच तो झोपून गेला. गाडी थांबली, तेव्हा तो हरिद्वारला होता. दोनचार दिवस तिथे काढून एका रात्री त्याने दुसरी गाडी पकडली. दुसऱ्या दिवशी तो मुंबईच्या व्ही.टी. स्टेशनवर उतरला होता. क्षणभरच, आपल्या बोटाशी धाकटी बहीण आहे, असा भास होऊन आईच्या भीतीनं तो भेदरला.

मलमूत्र व संस्कृती

लेखक आजानुकर्ण यांनी शुक्रवार, 14/12/2007 22:38 या दिवशी प्रकाशित केले.
चौगुले साहेबांच्या विनोदांना उडवण्यावरून मोठी धुळवड झाली आणि वातावरण तंग झाले. अनेकांनी तर त्यांना मलमूत्र ही गलिच्छ वस्तू आहे हे समजू लागल्यापासून मलमूत्र विसर्जनच कायमचे बंद करून टाकले आहे की काय अशी शंकाही माझ्या मनाला चाटून गेली. कित्येकांनी व्यक्तिगत निरोपाद्वारे चौकशी करून चौगुल्यांचे तथाकथित ओंगळ लेखन तुम्हाला कसे आवडते हा प्रश्न केला? मी जबाबदारीने वागावे व उगाच ट ला ट जोडू नये अशीही आगंतुक सूचना झाली. पण हा प्रसंग व काही दिवसांपूर्वी वाचलेले लेख यांच्या घुसळणीतूनच मनात काही विचार आले. फार दिवसांपूर्वी वाचलेल्या एका कथेतील काही भाग आठवतो.

यातना

लेखक सहज यांनी शुक्रवार, 14/12/2007 09:08 या दिवशी प्रकाशित केले.
कळतील कुणा यातना होतात आमच्या मना मुक्त स्वांतत्र्याचा बहाणा का तर मिळावा रोज घालाया धिंगाणा साहीत्य निर्मीतीस कोण पुसेना पण नवसदस्य नावाच्या हुशार कल्पना पंचायत-मालक कोण कूठे समजेना कोणाच्या खांद्यावरून कोण साधे निशाणा शत्रुस अनासाये मिळे कराया ठणाणा लेखन-वाचनाचा आनंद मिळेना साहित्यप्रेमाच्या मोठ्या वल्गना माय मराठी काय म्हणेल कोणास नाही याची तमा
Taxonomy upgrade extras

शहार...

लेखक दिनेश५७ यांनी बुधवार, 12/12/2007 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
नको जगाची पर्वा, हसू द्या त्यांना... --गुंडोपंतांमुळे स्फूर्ती आलेला एक कवडा...सा! शहार!! मनाच्या मैदानावरल्या मोहोरलेल्या नंदनवनात शब्दांचे ताटवे डोकावतायत फुलून डोलायच्या तयारीत... वा-याच्या ओंजळीतून ओसंडत्या सुगंधासोबत सांडलेले शब्द झेलायला टपली कभिन्न कुत्री मोकाट... केसाळलेल्या शेपट्या सावरत डोळे लावून हिरवे हावरट कवितांच्या रोपट्यांकडे वखवखून लाळ घोटतायत... लचके तोडायला कधीतरी सापडतील दातात कोमेजलेल्या शब्दांची लोंबकळती लक्तरं समीक्षकाच्या हेकट थाटात... कवींचा थवा आता शहारलाय ताटव्यांचं चित्तपण था-यावर नाही...