मी एक परिस्थिती
तसा मी इथलाच..
केव्हापासून???
पोटासाठी इथे आलो तेव्हापासून...!!
इथेच घडलो.. इथेच वाढलो..
या अनोख्या भागात आता कायमचा सडलो...!
काम काय?
द्याल ते!
जे तुम्हाला करायचं नसतं.. करायला जमत नाहि किंवा कमीपणाचं वाटतं..
पण मला जे दोन वेळच जेवण देतं...
असं वाट्टेल ते!
मी इथला कसा?
तुम्ही जसे इथले तसाच मीही
तुम्हाला इथे मान आणि पैसा दोन्ही मिळतो
मला तर केवळ पैसा
त्रास सहन करतो जितका तुम्ही तितकाच मीही
मी बाहेरचा का?
माझी मुळं इथली नसल्याचं तुम्ही दाखवून देताय
मी इथे स्वतःला रुजवू पहातोय
मात्र मला इथून उपटण्याचा घाट तुम्ही घालताय
ना इथला ना तिथला असं तुम्हीच जाणवून देताय..
मिसळपाव