Skip to main content

मुक्तक

आकाश से गिरी मैं, इक बार कट के ऐसे ..

लेखक आनंदयात्री यांनी बुधवार, 16/04/2008 16:23 या दिवशी प्रकाशित केले.
तुला आठवतय तु लहानपणी कशी असशील हे पहायची खुप उत्सुकता होती मला, गोल चेहर्‍याचे गोबर्‍या गालांची गोरी गोरी , अगदी लहानपणी तर नाक नसेलच तुला ! असे म्हटले की खुदकन हसायचीस तु. तुला आठवतो का ग आपला एखादा प्रवास ? मला खिडकीचीच जागा हवी म्हणुन हट्ट असायचा तुझा, अन जागा मिळाल्यावर काय तो ओसंडुन वहाणारा आनंद. गाडी हलली - जssरा गार वारा लागला की बोलता बोलता आपसुक डोळे मिटायचे तुझे आणी माझ्या खांद्यावर तुझे डोके अलगद विसावायचे.

संवादाची ऐशी तैशी

लेखक आपला अभिजित यांनी गुरुवार, 10/04/2008 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, बर्‍याच दिवसांनी लिहितोय. जरा बिझी होतो. पण आधी सातत्याने लिहूनही आणि त्याला भरभरून प्रतिसाद मिळूनही, `सध्या कुठे उलथलायंस बाबा?' असं विचारणारा एकही `माई का लाल' इथे भेटला नाही, याचं आश्चर्य वाटतंय. असो. सध्या हे वाचा. ----------------------- तसे ते रोजच्या बोलण्यातलीच प्रश्‍न आणि वाक्‍ये. पण काही काही वेळा डोकं उठविणारी. तुम्हालाही अशाच प्रश्‍नांचा सामना अनेकदा करावा लागला असेल. बघा बरं आठवून...! 1. हा...कोन बोल्तय? - अरे गाढवा! फोन तू केलायंस ना? मग तू आधी सांग, तू "कोन' बोल्तोय्स ते! मग माझं बघू. --- 2. कुठे आहेस? - मसणात! तुला काय करायचंय?

येक सुविचार

लेखक शरुबाबा यांनी गुरुवार, 03/04/2008 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
येक सुविचार निराशावादी म्हणतो , ग्लास अर्धा रिकामा आहे... ... आशावादी म्हणतो , ग्लास अर्धा भरलेला आहे... वास्तववादी माणूस त्या ग्लासात आपल्याला हवा तो द्रव योग्य त्या प्रमाणात मिसळतो आणि म्हणतो , चीअर्स!!!!
Taxonomy upgrade extras

रविवार विशेष

लेखक सृष्टीलावण्या यांनी रविवार, 30/03/2008 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
वैदर्भी बोली खरेतर संस्कृतशी अधिक जवळीक असणारी. मात्र तिची खुमारी पाहायची असेल तर बुवा उपाध्यांची भगवत् गीता वाचावी. भगवत् गीतेशी एव्हढा लडिवाळपणा करण्याची हिंमत दुसर्‍या कोणत्या भाषेची वा बोलीची झाली असेल असे वाटत नाही. बुवा लिहितात - पार्थ म्हणे गा हृषीकेशी, या युद्धाची ऐशीतैशी, बेहत्तर आहे मेलो उपाशी, पण लढणार नाही. धोंड्यात जावो हि लढाई, आपल्या बाच्याने होणार नाही, समोर सारेच बेटे, जावाई, बाप, दादे, काके. अरे लढाई असते का सोपी .. मारे चालते कापाकापी, कित्येक लेकाचे संतापी मुंडकी ही छाटती.