ना गंवाओ नावक ए नीमकश..

लेखनविषय:
लेखनप्रकार
फैझ अहमद फैझ. फराझसोबत साधारण समकालीन असलेला हा आणखी एक पाकिस्तानातला शायर. शायरच नव्हे, तर तो आणखीही बरंच काही होता, या शायराचं नाव साहित्याच्या "नोबेल"साठी अनेकदा स्पर्धेत होतं. जागतिक शांततेसाठीही कायकाय मिळालं त्याला. पण अबोव्ह ऑल, आपल्यासाठी तो एक "दिल के पास" असलेला शायरच. त्याची एक गझल इक्बाल बानूच्या हेलावून टाकणार्‍या आवाजात ऐकली आणि ती कायमची मनात वसतीला आली. तिचे शब्द एव्हाना मला समजले आहेत.. पण.. नेमकं कोणाला उद्देशून आणि कोणत्या परिस्थितीत हे शब्द इतके आर्तपणे म्हटले जाताहेत हे अजूनही कळत नाही. वेगवेगळे अर्थ लागल्यासारखे वाटतात पण वाळूसारखी सटकून जाणारी गजल आहे हेच खरं.

शायद कभी ख्वाबोंमे मिले..

लेखनविषय:
लेखनप्रकार
अहमद फराझ एक पाकिस्तानी मनुष्य. "पाकिस्तानी कवी", "पाकिस्तानी गायक" असे शिक्के बसलेल्यांपैकी एक खरोखर दिलसे फनकार व्यक्ती. गुलाम अली, फराझ, इक्बाल बानू, मेहंदी हसन यांच्यासारखे लोक जेव्हा कुठेकुठे त्यांच्या जिओग्राफिकल बाउंडरीने उल्लेखले जातात तेव्हा किमान काही गोष्टी तरी हद्दी न मानणार्‍या असाव्यात असा विचार ब्लेड मारल्यासारखा चरचर देऊन जातो. पण ते एक जाऊ दे आत्ता. फराझचे शेर सांगताना त्याची खूप ओळख करुन द्यायची गरज नसते. त्याने खूप मोठ्या संख्येने खूप नजाकतपूर्ण शेरोशायरी केली आहे. सरळसोप्या शब्दरचनेपासून अतिशय गुंतागुंतीचा भाव दाखवणारे शेर, गजल्स त्याने जन्माला घातल्या आहेत.

आंगणवाडी ते ....

लेखनविषय:
नमोच्या जपाने काँगी हरले, खेळ तोच हो, फक्त खेळाडू बदलले , पल्ला माझा हजार कोटींचा, घेवु द्या ना मोठी उडी, आताशी हडपलेत फक्त २०० कोटी, ही तर नव्हे जगबुडी, वही, पुस्तक,पाटी , पेन्सिल, बाळ गोपाळांच्यात मी रमले, कधी, कुठे, कशी, खायची चिक्की, आंगणवाडीनेच शिकवले, तुझा मोठा घोटाळा की माझा , हे ठरवेल जनता किंवा समिती, तु आधी मी आधी करत, भरुन टाकुया स्वीसची खाती , पापा होते तो कहते , बडा नाम करेगी बेटी मेरी, पण बाबा गेला दुर देशी न ये तो माघारी, जर खाते राहता रिकामे, होऊ कशी मी उतराई, पद उतार होण्याची , मला हो कसली घाई.

खूब-रुयोंसे यारियाँ न गयी..

लेखनविषय:
लेखनप्रकार
हसरत मोहानी.. मौलाना हसरत मोहानी हे भारतातले शायर. प्रेमाच्या शायरीसोबत भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणार्‍यांपैकी एक ठळक मनुष्य. सर्वात आधी "संपूर्ण स्वराज्या"ची मागणी करणार्‍यांपैकी एक. टिळकांच्या मतासारखी मागणी असलेला. लोकमान्य टिळकांचा खास समर्थक. तुरुंगवास तर खूपच सोसलेला. तुरुंगातही बरंच काव्य केलेलं आहे. त्याच्या फ्रीडम फायटर या अंगापेक्षा आज आत्ता त्याची ही एक गझल इथे आठवण्याची इच्छा होतेय. सगळेच शेर नाही घेत इथे. थोडेसेच.. पण अगदी पुरेसे. यातली अर्थाची समजूत ही निव्वळ एक विशिष्ट एकट्याने ऐकताना झालेली समजूत आहे. शेर वेगवेगळ्या लोकांना खूप वेगळं काहीतरी सांगतात..

हे हृदय कसे बापाचे......!

(उद्या जगभरात माणसांच्या दुनियेत Father’s Day साजरा होईल. पण पक्ष्यांच्या मुक्त जगातला हा रोजचा Father’s Day वाचकांसाठी....) रणरणते वाळवंट. निर्मम सूर्य. नजर टाकली तरी, आपले डोळे भाजून जावेत! अशा ठिकाणी कुठला पक्षी रहात असेल, वस्ती करीत असेल, मनातही येत नाही. पण निसर्गाची किमया आणि माया अगाध! ............. ............. ................ एक पक्षीण आपल्या नवजात पिलांना पोटाशी घेऊन खुरट्या झुडपांआड बसलेली. पिलेही आपल्या आईच्या पोटाच्या सावलीला बिलगून, आजूबाजूला टुकूटुकू पाहतायेत. असल्या रणरणत्या वाळवंटात त्यांना दानापाणी कुठून मिळत असेल?

लेखनवैमूढ्य

लेखनविषय:
काव्यरस
पाडावया काव्य पुरे नव्याने या सुर्सुर्‍या येति अहो थव्याने लिहू परी काय अहो कळेना वाटे कळे पैं तरि ते वळेना पाडोन जिल्बी हसु नेहमीचे विडंबनप्रेमिचमूजनीचे किंवा लिहू म्या दवणीय साचे जे मुक्तपीठात भरे सदाचे शब्दांचिया वा करु नाच साचा जो चित्रकाव्यात दिसे तयाचा किंवा लिहू चावटआंबटासी हे लोक चेकाळति जैं तयासी किंवा लिहावे उमटे मनीं जे वाटे तसे आणिक पूर्ण ताजे पैं हे नको, जैं करिता विचारी का नग्न व्हावेचि जनांसमोरी?

आठवणींचा पाऊस

लेखनविषय:
लेखनप्रकार
आजकाल पाऊस म्हणलं की प्रत्येकाच्या मनात, डोक्यात पहिली येणारी गोष्ट म्हणजे आवकाळी …. :) मग तो फायद्या साठी आलेला असू की तोट्यासाठी .प्रत्येकजण आपल्याला जमेल तसा आनंद घेतो, तर काहीजण दुःखाच्या जगात सामाऊन जातात. तर काहीजणांना काहीच फरक पडत नाही ,जणू त्यांचे आयुष्य त्यावर आवलंबूनच नाही असे . तसचं आठवणीचं असत. यांना ना वेळ न काळ… आवकाळी कधीही मनात घर करून जातात. मग त्या काहीजणांनसाठी सुखाच्या असतात तर काहीजणांना साठी दुःखाच्या.प्रत्येकजण आपापल्या आठवणीच्या घरात सामाऊन जातो . प्रत्येकाच्या जगण्याला अर्थ देणारी आठवण असतेच..

तुमची लिफ्ट किती सुरक्षित...?

दोनेक वर्षं झाली असतील या गोष्टीला . सावंतकाका तसे मूळचे विदर्भातले . पण निवृत्तीनंतर पुण्यात स्थायिक झालेले. आमच्या संकुलात पाच मजली पंधरा इमारती आहेत - त्यातल्या एका इमारतीत रहात असत. जातायेता कधीतरी दिसत, पण ओळख अशी नव्हती. मुलगा परदेशात आणि मुलगी पुण्यात असल्याने आता विदर्भातल्या गावी राहून काय करायचं? म्हणून दोन वर्षांपूर्वी पुण्यात आलेले. मुलाला भारतात आल्यावर कमी वेळ असे त्यामुळे मुंबईहून पुण्यात येउन जाणे त्याला सोयीस्कर होते. सुरुवातीला काही काळ पुण्यात बोअर झालेले काका हळूहळू रुळले. मित्रांचा गोतावळा जमवला. आणि जणूकाही पूर्वापार पुणेकर असल्यासारखे इथेच राहू लागले.

नाडी ग्रंथ भविष्य आणि कर्म महात्म्य भाग ३ (अंतिम)

लेखनविषय:
लेखनप्रकार
नाडी ग्रंथ भविष्य आणि कर्म महात्म्य भाग ३ (अंतिम) वरील लेखातील उल्लेखित गॉकलाँ बाबत तळटीप... टीप :- हजारो व्यक्तींच्या जन्मकुंडल्या मिळवून संख्याशास्त्राच्या आधारे ग्रह ज्योतिषाचा 'शास्त्रीय' पाया घालणाऱ्या मायकेल गोकलाँ या फ्रेंच संशोधकाची कर्म सिद्धांताच्या ज्ञानाच्या अभावी कशी दिशाभूल झाली आहे हे 'ग्रहांचा मानवावर प्रभाव पडतो ' ह्या त्यांच्या निष्कर्षावरून दिसून येते. विशिष्ट ग्रहाखाली जन्मणाऱ्या व्यक्ती मधे विशिष्ट गुण प्रवृत्ती आढळून येते म्हणून ग्रहच ती गुण प्रवृत्ती निर्माण करतात किंवा ग्रहाच्या प्रभावाचा तो परिणाम आहे.

ये दोस्ती ......

( १८ एप्रिल २०१५ रोजी या http://www.bbc.co.uk/news/blogs-ouch-32325809 संकेत स्थळावर दोन मित्रांची एक प्रेरणादायी कहाणी वाचनात आली. तिचे मराठी कथेत रुपांतर करताना, केवळ आणि केवळ एकच हेतू मनात आहे – लिहिणाऱ्या/वाचणाऱ्या सर्वांनी ‘एक तरी झाड लावावे, जगवावे, वाचवावे!’ ) हेग्झिया आणि वेंकी. उत्तर चीन मधील येली या छोट्याशा खेड्यातील दोन शाळूमित्र. दोघांत एखाद वर्षाचा फरक. पाठच्या भावंडासारखे सोबत वाढले. हसले. खेळले. ..... आणि दोघांच्या वाट्याला आलेले दुर्दैव आणि त्यावर केलेली मातही जगावेगळी! ..... ........ ........ हेग्झियाच्या डाव्या डोळ्यात जन्मतःच मोतीबिंदू होता.
Subscribe to मांडणी