Skip to main content

मांडणी

नरेंद्र मोदी यांचे उपोषण

लेखक आशु जोग यांनी शनिवार, 17/09/2011 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
क्रिकेटचा वर्ल्डकप सुरु झाला आणि सगळे राष्ट्र टी व्ही कडे डोळे लावून बसले. काय होतय, काय होतय ? उत्कंठा होती. १९८३ मधे जिंकला, यावेळी जिंकणार का ! त्यात पुन्हा सचिनचा शेवटचा वर्ल्डकप. बेट्याने नेहमीप्रमाणे शतके ठोकली. पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया यांच्यावर मात करीत २०११ चा वर्ल्डकप भारताने जिंकला. सचिनला भारतरत्न द्यावे ही मागणी होउ लागली. ४ दिवस जातात तोच अण्णा हजारे यांनी लोकपाल विधेयकासाठी आंदोलन सुरु केले. ते दिल्लीमधे उपोषणाला बसले. एप्रिल नंतर ऑगस्टमधे पुन्हा उपोषणाला बसले. पूर्वीहून अधिक प्रतिसाद मिळाला. आंदोलन प्रचंड यशस्वी.

सत्तास्थळ हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : उत्तरार्ध

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 14/09/2011 08:19 या दिवशी प्रकाशित केले.

सत्तास्थळ हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : उत्तरार्ध

आकाशातल्या ठोम्ब्या बद्दल ....!

लेखक सुधीर मुतालीक यांनी मंगळवार, 06/09/2011 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
काल जिम मधून खाली उतरलो. साडे आठ वाजले होते. गाडी जवळ पोचताना जिम कडे जाणारा मित्र भेटला. हा बहुदा माझ्या बरोबर असतो, सातच्या सुमारास. आज इतक्या उशिरा येतोय म्हटल्यावर गुड मॉर्निंग ऐवजी साहजिकच माझ्या कडून त्याच्यावर प्रश्न आपटला गेला, "अरे, आज इतका उशीर का ?" त्याचे स्पष्टीकरण चालु झाले. " काल श्रावण संपला ना. त्यामुळे रात्री उशिरा पर्यंत 'बसलो' होतो. श्रावणाच्या म्हैना भरात सॉलिड तहान लागली होती. मित्र ही होते बरेच. दहा दिवस आधीच ठरवून ठेवले होते. फार मजा केली. एकदम आउट ! पार कल्ला केला. आता आणि दहा दिवस बंद ना. गणपती आहे, बाप्पा. आपण नाही गणपतीत घेत.

फ्रायडे टाईमपास

लेखक मुक्तसुनीत यांनी शुक्रवार, 02/09/2011 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
कधीकधी माझ्यातच पाहतो मी एक बेहद्द नाममात्र घोडा पाठीवरती जीन मखमली पायी रुपेरी तोडा म्हणे कुणासाठी, कुणासाठी, कशासाठी, कुठवर इमानाने जन्मभर रेटायचा ऐसा गाडा ? कधीकधी माझ्यातच पाहतो मी भव्य हिमालय तुमचा अमुचा ज्याच्या छातीचा फोडुनिया कोट , गुलाम केले गेले जयाने लोक तीस कोट. बोलेना तो खळ मैंद म्हणती बळकट धश्चोट कर्मठ जो प्राणी तो पोंचट. कधीकधी माझ्यातच पाहतो मी गणपत वाणी बिडी पिताना चावायाचा जो नुसतिच काडी नाही खर्चिली कवडी दमडी नाहि वेचिला दाम श्रीराम जयराम जयजय राम. कधीकधी माझ्यातच पाहतो मी षंढ सारी लेकरे लेकरे उदंड जाली अरुण उगवला पहाट झाली झाले मोकळे आकाश आकाश झाले थेन्गने अन चानदन्या झ

माझा श्रीगणेशा

लेखक jaypal यांनी गुरुवार, 01/09/2011 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र हो खुप दिवसांनी तुम्हा सगळ्यांना परत भेटतांना खुप आनंद होतोय :-) आजच्या शुभमुहुर्तावर म्यान केलेला केमेरा परत बाहेर काढला आणि श्रीगणेशाला सुरुवात केली घरच्या गणरायाच्या ह्या काही भाव मुद्रा १. g २. 2 ३. 3 ४.

मेणबत्त्यां​चा उजेड

लेखक चारुवाक यांनी रविवार, 28/08/2011 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
लता आणि आशाचे गाणे, गुलझारच्या कविता, कलमाडींचे निर्दोष असणे , मेधा पाटकरांचे एखाद्या विषयावरील वक्तव्य अश्या विषयांवर रूढ मतांपेक्षा वेगळे मत व्यक्त करताना मी नेहेमी दहा वेळा विचार करतो. आजकाल या यादीमध्ये अण्णा आणि त्यांच्या आंदोलनाची भर पडली आहे. आजकाल IAC आणि मेणबत्ती मोर्चे ही 'in' आहे ...म्हणजे सध्याचा ट्रेंड आहे. कार्यालयात मला एकाने विचारले की तुमच्या इथे candle march झालं का? मी हो म्हणालो. आजकाल रोज कुणी ना कुणी मार्च काढते आहे. मग तू गेला होतास का? माझ्या 'नाही' या उत्तरावर एक उपेक्षित कटाक्ष टाकून तो निघून गेला.

मदत हवी आहे

लेखक धनुअमिता यांनी शुक्रवार, 19/08/2011 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
माझा एक प्रश्न आहे प्लीज उत्तर द्याल का? जर आपण एखादी प्रतिक्रीया दिली व ती प्रकाशित झाली, पण काहि कारणास्तव आपल्याला ती प्रतिक्रीया delet करायची असेल तर काय करायचे.प्लीज सांगा. प्लीज कोणी उत्तर देईल का?

आमची बी एक

लेखक मुक्तसुनीत यांनी गुरुवार, 18/08/2011 01:55 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा : ही भयभीषण कविता कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर विसर षंढ-गंध आता , जाळुनीया राख कर वेड होते त्या मिपाला, मांडिशी तू भोंडला वेड 'तात्या'ला तुझे जो, कायमीचा झोपला यायचे ते ना पुन्हा, तू वाट बघणे बास कर.. कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर टांगण्या वेशीवरी तव लक्तरे सारे पुढे चिंधड्या तव "कव्वितेच्या" फ़ाडती शेंबडी मुले ना कुणी तुज तारीफेला , तू अपेक्षा लाख कर!! कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर कोण झोपे, काय झाले, ना इथे पडले कुणा "भीक नाही , काव्य आवर" बाकी कुणी काही म्हणा "जळ्ळीं मेली लक्षणे ती, हे रसीका तूच मर!"

"चौफुला - २०११ काव्य जुने-शब्द नवे" अहवाल

लेखक प्राजु यांनी रविवार, 31/07/2011 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
बृहन महाराष्ट्र मंडळाच्या शिकागो येथील द्वैवार्षिक अधिवेशनात 'चौफुला - २०११ काव्य जुने - शब्द नवे' हा मराठी कवितांचा कार्यक्रम दि २३ जुलै २०११ रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमात अमेरिका आणि कॅनडा येथील १२ प्रथितयश कवी-कवयित्रींनी आपल्या सर्वोत्कृष्ठ अशा प्रत्येकी २ कविता सादर केल्या. कार्यक्रमाची सुरुवात बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्ष्या सौ माधुरी जोशी यांच्या स्वागत आणि प्रास्ताविकाने झाली.

( मावळे बुडाले कामी )

लेखक अर्धवट यांनी रविवार, 31/07/2011 19:42 या दिवशी प्रकाशित केले.
शरदीनितैंच्या कविता आम्हाला नेहेमीच आवडतात, त्यातल्याच लेटेष्ट बावळे बुडाले धामी यावरून प्रेरणा घेउन.. मावळे बुडाले कामी //एक // धडक उरावर तप्त पर्वणी नर्मपणिचे उन्नत चरणी मिकामुकातील संथ चुंबनी मंतरले सावंतासदनी //दोन// अल्प त्यावरी भर्जर त्राता राहुलभजनी विचित्रवस्त्रा भर्कन शोधा मोडीत मूढा त्रिकोणमग्रूर तुरंतखोला //तीन// भंगअपेक्षा नाकफेंदरी स्वयंवराची हावहावरी बंधननक्षी उभयापक्षी प्रसिद्धीकिडा चावलवक्षी धाडीशिकंजी प्रयासखोटा वसकन उघडा मिरवीसर्वा मिपास्थळावर कशास बोधा कविताकर्मी फुटला माथा.