Skip to main content

मांडणी

खस्स्स्स्स् स्स्कन्..

लेखक अन्नू यांनी गुरुवार, 12/04/2012 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
अंधारात खस्स्स्स्स् स्स्कन् चादर ओढल्याचा भास झाला... कोणाचतरी कारटं चादरीवर पसारलं असणार... डोळ्यात धगधगीत आग आणि मनात कचकचीत शिव्या आल्या... दारात उघड्यावर झोपलो होतो म्हणून त्या नुसत्या मनातच बरळल्या.. पुन्हा पुन्हा तिडीक उठवणारा तोच चादर ओढल्याचा भास... कोण तडमडतोय रे चादरेवर... मरतोय नुसता **चा.. असशिल कोणाचा लाडाचा कारटा म्हणून झोपेचं खोबर का करतोय.. वात्रट मेलं नालायक कारटं कुणाच... तोंडावरची चादर सारुन हळूच डोकावून बघितल तर ते गल्लीतल शेफारलेलं कुत्र होतं... मग मी त्याच्या कंबरट्यात कच्चकन लाथ मारुन गप गुमान मुस्कटून झोपलो... (आमचे प्रेरणास्थान फस्स्स्स्स्स्स्कन् ;) )

भस्सकन् ..

लेखक अन्नू यांनी गुरुवार, 12/04/2012 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
मागल्या बाजुने भस्सकन् किंकाळींचा आवाज कानात घुसला... कोणाच्या तरी मोबाईलवार्ता चालू असणार.. कानात धडाधडा कंपनं आणि मनात कचकचीत शिव्या आल्या... सवयीने तोंडाला चाप लावलेत म्हणून त्या नुसत्या तोंडातच फडाफडा वाजल्या... पुन्हा पुन्हा कानात घुसणारा कचाकचा आवाज.. कोण साला घुसतोय टाळक्यात... नडतोय खालीपिली **चा.. काळ्या पैशाची पैदास सोडलेली ही... मान वळवून मागे बघितलं तर ती माझीच सौ फोनवर होती... मग मी गपगुमान हातातील शॉपिंग बॅगा सांभाळत चालू लागलो..!!!!

नस्त्या उचापती

लेखक अन्नू यांनी गुरुवार, 12/04/2012 04:49 या दिवशी प्रकाशित केले.
आज घरातील सर्व मंडळी काही कारणास्तव चार दिवसांसाठी बाहेरगावी गेलेली असल्याने मी घरात एकटाच पडलो होतो आणि त्यामुळेच घरातील 'स्व' जेवणाची जबाबदारीसुद्धा सर्वस्वी माझ्यावर पडली होती. तसा मी भात अगदी मस्त करतो (एकट्यापुरताच) परंतु रोज रोज भात खाण्यापेक्षा आज जरा वेगळं करुया असे वाटले. पण वेगळ म्हणजे नेमक काय करायच? कारण ऑम्लेट- भाताच्या पुढे माझी कधीच उडी गेली नव्हती; नव्हे तसं धाडसच मी कधी केलं नव्हत. (त्यात आळस हा घटकही किंचितसा कारणीभूत होताच!) पण आज मात्र काहीतरी असं धाडसी कृत्य करावच अस मनापासून वाटू लागल होतं.

जीवन, भाषा, साहित्य वगैरे वगैरे

लेखक यकु यांनी रविवार, 01/04/2012 06:20 या दिवशी प्रकाशित केले.
हे लिहायला बसण्‍यामागे माझ्या मनात अधून मधून पडत असलेलं प्रतिबिंब शब्दरुपात ठेऊन ते स्वत:साठी पुन्हा एकदा व्यवस्थित समजून घेण्याचा उद्देश आहे. एरव्ही क्षणभर क्षणभर झरणार्‍या काळाच्या मंद गतीने आयुष्‍य उलगडत जाते; आणि आयुष्‍याचं सुस्पष्‍ट नखशिखांत जसं आहे तसं रुप त्या क्षणभरात पहायला मिळत नाही.

एका चोरीची चित्तरकथा

लेखक सस्नेह यांनी मंगळवार, 27/03/2012 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
मे महिन्याचे दिवस. उकाडा जबरदस्त वाढलेला. आणि गावात चोऱ्यांचे प्रमाणही वाढलेले. दर ४-५ दिवसांनी एक एक नवीन चोरी होऊ लागलेली. भुरटे, सराईत आणि हुमदांडगे असे सगळेच चोर मोकाट सुटलेत की काय असे वाटण्या इतके चित्रविचित्र , सुरस आणि चमत्कारिक चोऱ्यांचे प्रकार ऐकायला मिळू लागलेले. एक एक किस्से ऐकून लोक थक्क होत. होता होता एक दिवशी चक्क आमच्या कॉलनीतच चोरी झाली. तोही प्रकार इतका चमत्कारिक की पहाटेच्या वेळी कटावणीने दार उघडू पाहणाऱ्या चोरांना घरातील आजोबांनी (चष्मा घातला नसल्यामुळे) मालकाचे मित्र समजून स्वत:च कडी वगैरे काढून आत घेतले !

अलखपैंजणी परखडमोती

लेखक शरदिनी यांनी मंगळवार, 27/03/2012 01:52 या दिवशी प्रकाशित केले.
सुशिरनभाले चरित्रक्रांता लखलख दर्जा झुरतो दर्द शिरशिरी बाधा व्याकूळ साहित्याला लुचतो नवगेयाच्या शिंकाळ्यावर तीर्थ दुपारी झडतो झळझळ जिव्हा हरित भुसनळे सम्यकधावन करतो सुकल्या ओष्ठी निबंधतस्कर मारे वारे स्त्रवतो रुधिर धाबळी साजणलपलप आस्वादातून डुबतो विझल्या पणतीवरी धुराच्या नक्षीलाही गिळतो त्या वातीवर त्या गंधावर शतखंडाने जळतो चिवित्रसंध्या गरळगोजिरे मलम विषारी खलतो अलखपैंजणी परखडमोती निरोप दुर्लभ सलतो शरदिनी.... पुणे २६ मार्च २०१२

गप्पा युजींशी

लेखक यकु यांनी रविवार, 25/03/2012 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
युजी कृष्‍णमूर्तींची ओळख इथल्या बहुतेक लोक

ढक्कन खोलना नहीं आता ! इंदुरी दुकानदारीची एक झलक

लेखक यकु यांनी गुरुवार, 22/03/2012 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच झालेला, शेअर करण्‍यासारखा फाऊंटन पेनचा किस्सा आहे. आत्मशून्य इथे आला तेव्हा आम्ही असेच राजवाड्याशेजारच्या रोडवर बाजारातून फिरत होतो. जुनी कळकट दुकाने बंद व्हायची रात्रीची वेळ. एक फाऊंटन पेनचं दुकान दिसलं. फाऊंटनपेन भलेही रोज वापरत नसलो तरी दुकान दिसलं की पहावे, घ्यावे वाटतातच. त्या दुकानदाराने नेहमीचीच सत्तर, शंभर रुपयांची शाईपेनं समोर मांडली. त्यापैकी बरीच ऑलरेडी इथेतिथे पडून आहेत. मूड गेला. पण दुकानातून निघून कसं यावं म्हणून उगी शान मारत - ''अरे नहीं नहीं, ये तो सब चालू माल है, कलेक्‍शन के लिये कुछ है तो दिखाईये '' अशी वाक्ये फेकली.

भिगवन

लेखक jaypal यांनी सोमवार, 19/03/2012 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
3

सेवा - एक आंदोलन

लेखक विश्वास कल्याणकर यांनी शुक्रवार, 16/03/2012 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
समाज सेवेशी माझा सर्वप्रथम परिचय इशान्य भारतात झाला तो २००८ मध्ये.. तेथे, गेल्या ६० वर्षापासुन सेवा भारती, विद्या भारती, कल्याणाश्रम, विवेकानंद केन्द्र, रामकृष्ण मिशन या संस्थांद्वारे होत असलेले कार्य बघुन मी खुपच प्रभावित झालो. आपला देखील यात खारीचा वाटा असावा या हेतुने मग मी होइल तसे तिकडे जात राहीलो अर्थात ते देखील निवृत्तीनंतर. नोकरीत असतांना कामातुन वर मान करायला देखील उसंत नव्ह्ती. गोहाटी ला ,समाज सेवे चे कार्य कसे सुरु करावे यावर सेवा विभागाने काढलेली एक छोटी पुस्तिका माझ्या वाचनात आली त्यातील काही माहिती मी आपणासोबत शेअर करीत आहे.