प्रार्थना!
लेखनविषय:
देव भेटो वा न भेटो येऊ दे हे मागता
आतला माणूस माझ्या नित्य राहो जागता ।
चाललो कुठल्या दिशेला हे न उमगे ज्या क्षणी
एक ही साधी कसोटी आठवो त्या त्या क्षणी
दुःख दुसऱ्या देउनी सुख येत नाही भोगता ।।
हासता यावे मला पाहून इतरांना सुखी
भावना माझी नसो सहवेदनेला पारखी
या विचारांना कृतीही येऊ दे मज जोडता ।।
कोण मी? हा प्रश्न राहो सारखा माझ्या मनी
काय नाते या जगाशी? हे असावे चिंतनी
आरसा बघतो तसे जग येऊ दे मज पाहता ।।
~ मनमेघ
वाचने
3994
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
वाह! खूप खूप दिवसांनी एकदम अंतर्मुख करणारी कविता वाचायला मिळाली!!
बंधो, "आतला माणूस माझ्या नित्य राहो जागता " ही ओळच सगळं व्यापून आहे. __/\__
छान
छान!
आतला माणूस माझ्या नित्य राहो जागता .... सुंदर.
आवडली.
प्रतिसादाबद्दल सर्वांचा आभारी आहे.
सुरेख!
खूप आवडली
आपल्या प्रतिसादांबद्दल आभारी आहे.
छान कविता.
वाह! खूप खूप दिवसांनी एकदम