Skip to main content

कविता

(कुंतलांचा पसारा)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 21/10/2008 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा - मिपाची कवयित्री प्राजू हिची 'आठवांचा पसारा' ही सुंदर कविता! 'चतुरंगप्रयातात' हे विडंबन करण्याचा प्रयास केलेला आहे.. उवा जाहल्या, कुंतलांचा पसारा रिठ्याने कशा आज डोळ्यांत धारा सुगंधीच मेंदी असावी उशाशी उडू लागला रंग हा आज सारा कसा आणला 'वीगही' मी लपूनी गळू लागला केशसंभार सारा उडाली पहा रातची झोप माझी कुणा वैद्यकाचा मिळे ना सहारा जरी टाळतो मी तुझ्या आलयांना तुला नापिता पाहु येतो शहारा चला संपला भार या डोसक्याचा मिळाला वयाने मला हा इशारा चतुरंग

बागेची गोष्ट.

लेखक रामदास यांनी सोमवार, 20/10/2008 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
कच्ची तुरट आंबट चिंबट अशीकशी नावं ठेवत पेरवाची बाग लुटली कुणी.? बघा जीभ काळी निळी चव कश्शी नाही मुळी, लालडी चोच पुसत पुसत इकडे तिकडे बघत बघत रावे म्हणाले हसत हसत. आम्ही नाही बॉ त्या गावचे !
Taxonomy upgrade extras

(मदार)

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 20/10/2008 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
नीरज कुलकर्णी यांची 'मदार' कशावर आहे हे बघून मला माझी मदार विडंबनावरच कशी आहे त्याची प्रकर्षाने जाणीव झाली आणि.... नवटाक ह्या कवींची, भाषा सुमार आहे... आता विडंबने ही, माझी मदार आहे... आश्वासने मिळाली, त्यांना जरी कुणाची; निश्चीत आज त्यांची, कविता शिकार आहे... मी हासलो तुलाही, वाचून ओळि सार्‍या; असतील दोन जमल्या, तिसरी चुकार आहे... का भाव मोल केला, ही शायरी अशी का? मारुन सर्व बाता, होतो फरार आहे! 'हे काव्य आज त्याचे, उसवून काढले मी!!' हा कोणता निराळा, शिंपी टुकार आहे? गझला किती कवींच्या, मी फाडल्या प्रभावी; 'रंग्यास' कल्पनेचा, चढला बुखार आ

अमृतरूपी झरा

लेखक शर्मीला यांनी रविवार, 19/10/2008 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
अमृतरूपी झरा डोंगराच्या कुशीत मातीच्या पोटी उगवला एक झरा सहजच पाहिले मी त्याला खळखळ हासत होता पटपट बोलत होता झरझर पुढे चालत होता काट्या-कुट्यातून वाट शोधत होता दगडालाही भेग पाडत होता आपल
Taxonomy upgrade extras

आई

लेखक दत्ता काळे यांनी रविवार, 19/10/2008 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
देवभोळी कष्टवेडी माय माझी शब्द सोपा वाकल्या फांदीत अजूनी सुगरणीचा दक्ष खोपा * * * * * * *

त्रिवेणीचा प्रयत्न :

लेखक प्राजु यांनी रविवार, 19/10/2008 08:20 या दिवशी प्रकाशित केले.
त्रिवेणीचा प्रयत्न : आज कधी नव्हे ते मला खरंच यशाची किल्ली मिळाली आहे.. अरे! कुलुपच बदललं कोणीतरी ! ****************************** यशाकडे जाणारा मार्ग दिसत असतो...पण नेहमीच अंडर कन्स्ट्रकशन असतो.. - प्राजु (कुठेतरी इंग्रजीमध्ये वाचलेल्या विचारांना त्रिवेणीचं रूप देण्याचा प्रयत्न केला आहे.)

आठवांचा पसारा..

लेखक प्राजु यांनी रविवार, 19/10/2008 02:00 या दिवशी प्रकाशित केले.
भुजंगप्रयातात ही कविता लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.. उगा जाहला आठवांचा पसारा खळेना कशा आज डोळ्यांत धारा सुगंधी क्षणांना जपावे उराशी उडू लागला गंध हा आज सारा असा ठेवला मोगरा मी जपूनी सुकू लागला पाकळ्यांचा पिसारा जरी वादळी घेतली झेप मी ती तुझ्या प्रीतिचा ना मिळाला निवारा जरी टाळतो मी तुझ्या आठवांना तुला पाहता देहि येतो शहारा चला संपला अर्थ या जीवनाचा दिला नीयतीने मला हा इशारा - प्राजु
Taxonomy upgrade extras

व्यथा

लेखक सुरताल यांनी रविवार, 19/10/2008 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
सारे ओळखीचे डोळे पुसून गेले! होते अनोळखी ते गाली हसुन गेले! ज्यांनी दिला दिलासा ते लोकही असे की, माझ्या व्यथाकथांचे पत्ते पिसुन गेले! माझ्या पराभवाची चर्चा कुठे न झाली घायाळ काळजाला विंचू डसून गेले! डोळ्यात चाहत्यांच्या मी बांधल्या हवेल्या कळले मला न केंव्हा घरटे बसुन गेले! जे काल जाहले ते मी आठवू कशाला? डोळ्यापुढे उद्याचे गाणे दिसून गेले! सुरताल
Taxonomy upgrade extras

श त्रू

लेखक दत्ता काळे यांनी शनिवार, 18/10/2008 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
घाटामधल्या वाटेवरती तो गोसावी बसतो मारून हाक, दावून धाक नजरेत विखारी हसतो खोचून त्रिशूल वाटेवर पसरे अर्धफाटकी भगवी छाटी चावुन दात, धावून जात निष्पाप जनांच्या पाठी मी जाई जेव्हा घाटामधूनी भित भित वेगात, हटकून मारील, वाटे मजला अन् लोळवील क्षणात आज ही असला दिवा भितीचा क्षण आला एकांती, पण मी चालत जाईन वाटेवरुनी दगड दुधारी घेऊन हाती हळूच पाहिले, धीर करुनी निजलेल्या त्या राक्षसाकडे पण, धुळ माखला चेहरा दिसला थिजले डोळे, तोंड वाकडे फाटुन गेल्या छाटीवरती त्रिशूल वाकूनी पडला होता पोटामधूनी निघुनी पाठी रक्ताचा ओघळ अडला होता मी हळहळलो, नकळत माझ्या गालावरुनी अश्रू गेला ? घाटावरच्या व

वादळ...

लेखक हर्षदा विनया यांनी शनिवार, 18/10/2008 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
वादळ,घोंघावणारे, पूढेच सरसावणारं, अश्रूच्या थारोळ्यात हळूच डोकावणारं! वादळ कोणते ते, आतलं की बाहेरंचं? वादळ बाहेरेंच,वेगाने त्वेषात येणारं, सगळंच उध्वस्त करून सोडणारं, कि वादळ आतलं,अलगद येणारं, कूरवाळणा-या हातांनीच ओरबाड्णारं ! वादळ कोणते ते, आतलं की बाहेरंचं? वादळ,तूझ्यापूढे जगाला ठाकणारं, लक्तरे उडवून,मग तमाशा पाहणारं, कि वादळ,तूलाच तूझ्यासमोर ठाकणारं, आत्मपाशांच्या गूंत्यातच गूंतवणारं, वादळ कोणते ते, आतलं की बाहेरंचं? वादळ, तूला नकळत उडवून नेणारं, वाहवत-वाहवत,रानात नेऊन सोडणारं, कि वादळ,नेस्तनाबूत करून तूझं सर्व, स्पर्शही न करता तूला, "एकटं" सोडणारं, वादळ कोणते ते, आतलं की बाहेरंचं? व