Skip to main content

कविता

वेळ

लेखक अनिरुध्द यांनी बुधवार, 15/10/2008 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
वेळ आली वेळ झाली मनुजा सांगून गेली काळ आहे बदलला झटपट कामाला लागा संप आणिक दगडफेक झाले ते रोजचेच बॉम्बस्फोटही पचवण्याची आम्हास आता सवय झाली नेते आमुचे बसले नुसते मस्ती त्यांना खुर्चीची सामान्यांना असते चिंता इथे रोजच्या खर्चाची सगळे असती इथे सारखे मरणा-यांचे नशीब सारखे किती गेले, किती राहीले, अतिरेक्यांनी काय साधले निष्क्रीयतेने बघतो आपण चला करुया आज एक पण वेळ आता आली क्रुतीची एकजुटीने लढण्याची बघू नका जात-पात गुंफून हातात हात एकदिलाने सारे लढू शत्रुस त्या दूर पळवू छत्रपतींचे आम्ही सैनिक राष्ट्राचे ही आम्ही पाईक राष्ट्र आमचे, देश आमचा अभिमान आम्हां तिरंग्याचा वेळ आली, सांगून गेली ऊठ आत
Taxonomy upgrade extras

(अशीही एक) कोजागिरी

लेखक बेसनलाडू यांनी बुधवार, 15/10/2008 03:50 या दिवशी प्रकाशित केले.
आलेत एकाच दिवशी पूर चांदण्यावरच्या कवितांचे चंद्र,भरती नि शब्द - भलतेच गेलेत वरती म्हणायचे! कोजागिरीला हवा कशाला बिलियन्स् चा बेल्-आउट्? ****************** मिळतील तितके चंद्र घालून बांधल्या असत्या कित्येक भेळी भरतीपण मग आली असती सांगेन तश्शी - नेमक्या वेळी भेळवाला बघा मराठी, 'भैयाची भेळ' आउट्! ***************** दाट सायीच्या पडद्याआडून गोड चेहरा दिसला असता (हाती ग्यालन् 'फॅट्-फ्री'चे, अन् विचारसुद्धा पातळ नसता) कुण्याकाळची याद कुणाची छळे अशी थ्रूआउट् *****************

बालकं - खलिल जिब्रानच्या मुक्तकाचा अनुवाद

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 14/10/2008 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी विनायक प्रभूंच्या एका समुपदेशनाच्या लेखात प्रतिक्रिया देताना मी खलिल जिब्रानच्या एका इंग्लिश मुक्तकाचा उल्लेख केला होता. विप्रंनी त्याचा अनुवाद करुन देता का म्हणून विचारणा केली होती. बरेच दिवस त्याला हात घालीन म्हणत होतो आज थोडी सवड मिळाली आणि मी त्याच्या माझ्या परीने भावानुवाद केलाय तो मिपाकरांसाठी सादर आहे. जिब्रानने व्यक्त केलेले विचार मला पटलेत आणि माझ्या मुलाशी वागताना ते मला पदोपदी जागेवर आणायचे काम चोख करत असतात!

प्रिय कोकिळा

लेखक शर्मीला यांनी मंगळवार, 14/10/2008 20:39 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय कोकिळा :SS रंग नाही , रुप नाही नाही पक्षाची राणी तरी अमुल्य ठेवा आहे तुझियाकडे ज्याने तु प्रसिध्द आहे ठायी-ठायी तुझिया गाणे ऐकताना थोरा-मोठ्या सर्वाचं भान हरपून जायी रंग रुप यांवर मिरवणे अशी आहे रित जगाची पण गुण-हुशारी यावर जग आधारित तु आहेस आदर्श याचा एक सामान्य असली तरी नाव कमावलसं मला व्हायचयं तुझ्यासारखं रंग नसला - रुप नसले तरी नाव कमावलसं मला व्हायचयं तुझ्यासारखं..........
Taxonomy upgrade extras

दुपारच्या कविता.

लेखक रामदास यांनी मंगळवार, 14/10/2008 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
टच् टच वाजती जोडवी किण् -किणती काकण माडीवर कशी येऊ आई दारात राखण. ****** कशी उठू कशी बसू दाराआड उभी सासू चाळ -पाखड करून कसं सैलावलं नेसू. ******* वही नको बुकं नको नको आता उजळणी तीळ मोजून संपले पुरे झाली शिकवणी. ******
Taxonomy upgrade extras

मला मुम्बईत रहायचय..........!!!!!!!!!

लेखक नुसताधिन्गाना यांनी मंगळवार, 14/10/2008 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या प्रिय मित्र्-मैत्रिणिनो, ही माझी पहिलिच वेळ आहे, माझी स्वताहाची एखादि कविता कोणासमोर तरी ठेवायची. मला जराशी भीती ही वाटते आणी उत्सुकताही. मी मुम्बईत जन्माला आलो आणी कापड गिरण्या बन्द पडल्या म्हनुन लहान्पणीच गावाकडे गेलो. एक जिद्द होती मुम्बईत यायची. नोकरी मिळवायची. मी एका मोठ्या कम्पनीत २ वर्षान्पासुन कामाला आहे . कायम स्वरुपी नोकरी आहे माझी. आता गरज आहे एका घराची. माझ्या हक्काच्या घराची.
Taxonomy upgrade extras

हिच जगाची रीत असावी

लेखक शर्मीला यांनी मंगळवार, 14/10/2008 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
हिच जगाची रीत असावी चंदनापेक्षाही झिजावे माझे-माझे म्हणावे अन त्या पिल्लांनी त्याच्या मोबदल्यात काय दयावे अनवाणी पायाने चालावे उन्हात तापावे पावसात भिजावे अन पिल्लांना त्याची झळ ना लागू दयावी पिल्लांना पंख फुटले की घरटे सोडून जावे
Taxonomy upgrade extras

जीवन म्हणजे नक्की काय असतं ?

लेखक शर्मीला यांनी सोमवार, 13/10/2008 19:55 या दिवशी प्रकाशित केले.
:SS जीवन म्हणजे नक्की काय असतं ? जीव न म्ह णजे कुणाला माहित नसणारं प्रत्येकाचं निरनिराळं एक गोष्टीचं पुस्तक असतं जन्म त्याची सुरुवात मृत्यू त्याचा शेवट दररोज त्याचं लिहितं एक पानं कोणाच्या कधी मर्जीविना तर कधी मर्जीसहित हार-जीत, राग-प्रेम यांना असतं यात स्थान सुख-दु:ख यांचे चढाव यात फार हसायचं नसलं तरी हसावं लागतं रडायला आलं तरी आवरावं लागतं जीव न म्ह णजे एक गोष्टीचं पुस्तक असतं आव्हानं देऊन ते पूर्ण करायचं असतं भातुकलीच्या डावासारखं अर्धवट सोडायचं नसतं..........................
Taxonomy upgrade extras

विडंबन : सफरचंद

लेखक मी असाकसा वेगळा वेगळा यांनी सोमवार, 13/10/2008 19:49 या दिवशी प्रकाशित केले.
विडंबन - सफ़रचंद मूळ कविता - सफ़रचंद कवी - संदीप खरे संदीप् खरे यांची माफ़ी मागुन........... प्रोग्रामरने फ़क्त कोडिंग करायची असते, करायाची नसते काळजी आजुबाजुला सोबती असण्याची नसण्याची डेडलाईन आली कळतक्षणीच सारा कोड गोळा करुन रिलीज करायचा असतो प्रोग्रामरने फ़क्त कोडिंग करायची असते मग तो कोड बघुन पी.एम. ला तुझी स्तुती सुचू देत ना सुचू दे पी.एम.
Taxonomy upgrade extras

गंधविभोर

लेखक दत्ता काळे यांनी रविवार, 12/10/2008 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
शांत मनोहर अंगणामध्ये वेल पहुडली बाई अवखळ वारा अंगावरुनी लहरत, लहरत जाई सळसळला मग देह वेलीचा लटक्याने ती कापत राही हळुवार फुलांचा गंध चोरुनी वारा अलगद पसार होई गंधचोरट्या वारया तुजला कांय म्हणू मी आता .. ? स्पर्शाने सळसळल्या सार्.या अंगावरती लाटा नियंत्याला जाऊनी सांगीन समीरण झाला वेडा थांबव त्याचा वारु वेंधळा पायात अडकवूनी खोडा तुच मला ग केले, जाई अवखळ आणि गंधविभोर रागाने कां म्हणशी आता प्रांगणातला अल्लड चोर ? उमलत्या कळ्यांच्या वाटेवर मी चित्तचोरटा होऊनी येतो हवे हवे ते देऊनी त्यांना गंध फुलांचा घेऊनी जातो ( मग मी चोर कसा गं होतो ?