आठवांचा पसारा..
लेखनविषय:
भुजंगप्रयातात ही कविता लिहिण्याचा प्रयत्न केला आहे..
उगा जाहला आठवांचा पसारा
खळेना कशा आज डोळ्यांत धारा
सुगंधी क्षणांना जपावे उराशी
उडू लागला गंध हा आज सारा
असा ठेवला मोगरा मी जपूनी
सुकू लागला पाकळ्यांचा पिसारा
जरी वादळी घेतली झेप मी ती
तुझ्या प्रीतिचा ना मिळाला निवारा
जरी टाळतो मी तुझ्या आठवांना
तुला पाहता देहि येतो शहारा
चला संपला अर्थ या जीवनाचा
दिला नीयतीने मला हा इशारा
- प्राजु
वाचने
7075
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
सुंदर
In reply to सुंदर by ऋषिकेश
+१
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
छान
In reply to छान by बेसनलाडू
+१
In reply to छान by बेसनलाडू
हेच
In reply to छान by बेसनलाडू
+१
प्राजुताई...
मुलगी बापाच्या घरी सुरक्षीत असते पण मुलींचा जन्म त्यासाठी झालेला नसतो.
कविता आवडली.
सुंदर
आवडली ग कविता
आठवांचा पसारा
जरी वादळी
अफलातून...
सुरेख
सर्वच
पिसारा...
धन्यवाद..
व्याकरण
सुंदर वृत्तबद्ध कविता!
फार छान
मी वृत्तशीर
खूपच छान
धन्यवाद.
खूप दिवसानी
वाहवा!