वादळ...
लेखनविषय:
वादळ,घोंघावणारे, पूढेच सरसावणारं,
अश्रूच्या थारोळ्यात हळूच डोकावणारं!
वादळ कोणते ते, आतलं की बाहेरंचं?
वादळ बाहेरेंच,वेगाने त्वेषात येणारं,
सगळंच उध्वस्त करून सोडणारं,
कि वादळ आतलं,अलगद येणारं,
कूरवाळणा-या हातांनीच ओरबाड्णारं !
वादळ कोणते ते, आतलं की बाहेरंचं?
वादळ,तूझ्यापूढे जगाला ठाकणारं,
लक्तरे उडवून,मग तमाशा पाहणारं,
कि वादळ,तूलाच तूझ्यासमोर ठाकणारं,
आत्मपाशांच्या गूंत्यातच गूंतवणारं,
वादळ कोणते ते, आतलं की बाहेरंचं?
वादळ, तूला नकळत उडवून नेणारं,
वाहवत-वाहवत,रानात नेऊन सोडणारं,
कि वादळ,नेस्तनाबूत करून तूझं सर्व,
स्पर्शही न करता तूला, "एकटं" सोडणारं,
वादळ कोणते ते, आतलं की बाहेरंचं?
वादळ कोणते ते, आतलं की बाहेरंचं?
तूझं-तूझं की माझे आणि तूझे??
हर्षदा (६ ओक्टो. '०८)
या अनूभवानंतर लिहीलेली कविता.. http://karadyaachhata.blogspot.com/2008/10/blog-post.html इथे आहे..
वाचने
2432
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
मस्त!
मस्तच
धन्यवाद
सुंदर...
In reply to सुंदर... by फटू
धन्यवाद..
In reply to धन्यवाद.. by हर्षदा विनया
धन्यवाद...
साला, लै
धन्यवाद