दोन कविता
मधुकर
जरी पिऊनी आता
झालास तू बेहोष..
शोषून फुलांचे सारे
जरी मधुकोष ..
हा व्यर्थ तुझा आवेश,
तुझा हा अंध..
पाकळया फुलांच्या
तुजसाठी झाल्या बंद
रुसलेले गीत
रुसले गीत
शब्दात अडखळे शब्द
ओठावर ये ऊन
झाले ते नि:शब्द
येऊन तळमळे
अधरावरती गाणे
नशिबात कळीच्या
निर्माल्याचे जिणे
मिसळपाव