Skip to main content

कविता

बुद्धायन

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 11/10/2008 00:35 या दिवशी प्रकाशित केले.
काल विजयादशमी होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कालच्या दिवशी आपल्या दलित बांधवांसह बुद्धधम्म स्विकारला म्हणुन या दिवसाला धम्मचक्र परिवर्तन दिन असही म्हणतात. त्या तथागतांची आठवण म्हणुन ही कविता. मत्त हत्तीला माहूत करितो संयमीत अंकूशाने तसेच कर तू चित्त संयमित प्रज्ञा विवेकाने आलस्याचा त्याग करावा व्हावे सत्यगामी प्रमाद माने एक कलंक तोच खरा सद् धर्मी तुच तूझा रे बन पथदर्शि नाही दुजा तारणहार प्रज्ञा बोधी देइल मुक्ति हाच बुद्धविचार निर्वाण हेच आहे साध्य नाही दुजा जीवनहेतु तथागताचा मार्ग मध्यम जाण तू , स्विकार तू
Taxonomy upgrade extras

हे थेंब नसूनी असती तारे

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 10/10/2008 21:49 या दिवशी प्रकाशित केले.
( अनुवादीत. कवी--मजरू ) हे थेंब नसूनी असती तारे येती आकाशगंगे मधूनी सारे एकावेळी शंभर शंभर उतरती गगनामधूनी तुझ्याच अंगावरती मोत्यापरी थेंब नभातूनी दमकत येती वा कभिन्न रात्री काजवे चमकती जसे पदरामधे शिरती तुफान वारे हे थेंब नसूनी असती तारे येती आकाशगंगे मधूनी सारे जवळी बसून मला तू सुंदर दिसशी हाताच्या विळख्यात तू तस्वीर होशी जसे प्रतिबिंबामधे दिसती अनेक चेहरे हे थेंब नसूनी असती तारे येती आकाशगंगे मधूनी सारे श्रीकृष्ण सामंत

कृतार्थ जोडी

लेखक स्वाती फडणीस यांनी शुक्रवार, 10/10/2008 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
कृतार्थ जोडी ==================== त्या तिकडच्या ग्रहमालेत एक सूर्य विझायला आलाय जळून जळून फुललेला निखारा अंमळ जरा पसरलाय. आतापर्यंत जळतच राहिलो आतापर्यंत जाळतच राहिलो मनातल्या मनात उजळणी करतोय गरगर फिरणारी पृथ्वी कौतुकाने पहातोय. त्याच्याच वयाची म्हातारी ती चाल तिची ही मंदावलीये खूप फिरले म्हणत तीही जरा टेकलीये तुझ्या भोवती फिरणारी मी ही भिंगरीच होते एक फेरा घेता घेता शेकडो वेळा गरगरले म्हणत कबुली देतीये. पिल्ल पाखरं उडून गेली त्यांनी त्यांची दिशा धरली कृतार्थ जोडी बोलतीये उरले सुरेल क्षण संगतीने जगतीये त्या तिकडच्या सूर्यमालेतली रात्र केव्हाच मागे पडलीये. ===================== स्वाती फड

आई

लेखक शर्मीला यांनी शुक्रवार, 10/10/2008 20:37 या दिवशी प्रकाशित केले.
आई जगात सगळीकडे जिचा निवास देवापुढे जिला आद्य स्थान प्रसिद्ध आहे जी जगाची राणी ती म्हणजे तुमची -माझी आई कधी डोळयातील अश्र होऊन भिजुन जाईल. कधी तलवारीची धार बनून चमकून जाईल. कधी ढगातून वीज होऊन गरजेल. तर कधी चंदन होऊन झिजेल. पण आपल्या पिल्ल्याच्या सुखासाठी झटेल अशी तुमची-माझी आई.......... तिची माया व्यापणार नाही सागरातील पाणी . तिची सर नाही अंधारातुन प्रकाशाकडे नेण्यार्‍या ज्योतीला तिच्या हदयाची उपमा नाही झाडावर उमललेल्या फुलाला ती जवळी नसते तेव्हा मोल वाटत तिच्या नसण्याचं सागरतील अमर्याद लाटांची गणना होईल पण आईचे ऋण ना फेडता येईल. अशी धन्य धन्य ती त

काव्य

लेखक शर्मीला यांनी शुक्रवार, 10/10/2008 19:49 या दिवशी प्रकाशित केले.
मी प्रेम केलय तुझ्यावर फक्त तुझ्यावर फक्त तुझ्यावर या वेड्या आशेने की तुही कधी तरी प्रेम करशील माझ्यावर संपुर्ण तन-मन-धन लावून तुला लिहिल मनातल्या विचाराना व्यासपीठ दिधल फक्त एका वेड्या आशेने की तुही कधी तरी प्रेम करशील माझ्यावर लिहिन ही तुला वाचीन ही तुला आठवणीत साठवीन ही तुला तु फक्त एकदा हसून दाखव मला मी प्रेम केलय तुझ्यावर फक्त तुझ्यावर फक्त तुझ्यावर या वेड्या आशेने की तुही कधी तरी प्रेम करशील माझ्यावर सुरुवात ही तूच जीवन ही तूच शेवट ही तूच अशीच
Taxonomy upgrade extras

गाणी अंगणातली, गाणी माजघरातली, गाणी तीन सांजेची... (१)

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 10/10/2008 01:14 या दिवशी प्रकाशित केले.
मला हे गाणं जसं दिसलं, जसं भावलं, जसं कळलं तसं मी लिहिलं आहे. ते चूक की बरोबर हे मला माहीत नाही! एकतर आपल्याला काव्यातलं फारसं काही कळत नाही मग उगाच खोटं कशाला बोला! :) हां, त्याला एकदा सुरांचा साज चढला की माझी थोडीफार मैत्री होते काव्याशी! तीसुद्धा अगदी माझ्यापुरतीच..! :) नाविका रे, वारा वाहे रे, डौलाने हाक जरा आज नाव रे.. हे सांगतांना त्या नविकाबद्दल एक विश्वास आहे. जणू काही तो नाविक कुणी माहेरचाच मनुष्य आहे, ज्याला विश्वासाने काही सांगावं! डौलाने हाक जरा आज नांव रे..! मग? मला जायचंय पैलतिरी असलेल्या माझ्या घरी!

(आनंदाने)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 08/10/2008 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
अजब यांना 'आनंदाने' कविता करताना बघून मला राहवले नाही, अर्थात तत्काळ विडंबन धर्माला जागणे क्रमप्राप्त होते! ;) पुन्हा पुन्हा तो कविता रचतो, आनंदाने सरसावुन मी लगेच बसतो, आनंदाने... शब्द बदलणे अवघड नसते माझ्यासाठी बोरू त्याचा तोच झिजवतो, आनंदाने... जालावरती टुकार कविता तुडुंब मिळती जुन्या नव्या मी सर्व उसवतो, आनंदाने... "विडंबुनी ही कविता तुजला काय मिळाले? " चडफडणारे प्रश्न ऐकतो, आनंदाने... पूर्वी काव्ये छोटी-मोठी भादरायचो; आता गजला तासत सुटतो, आनंदाने... लिखाण तुमचे आनंदातच चालू राहो विडंबने ही 'रंग्या' करतो, आनंदाने... चतुरंग
Taxonomy upgrade extras

मला भावलेली कविता

लेखक mina यांनी बुधवार, 08/10/2008 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
अजूनही निळया जांभळ्या नदीला आंबेवनाची सावली भेट पहिलीवहिली अकल्पित भेट दुरस्थपणाची गर्भरेशमी क्षणाची सौदामिनीच्या बाणाची देवघेव. गुलबक्षीच्या फुलानी गजबजले कुपण वेचू लागला श्रावण मोरपिसे। ओल्या आभाळाच्या खाली इद्रचापाचे तुकडे तुझा करपाश पडे जीवनास. कधी रेताडीचे रस्ते कधी मोहरली बाग कधी प्रासादास आग कर्पुराच्या। सप्तसुरातुनी गेले माझ्या जीवनाचे गीत तुझ्या सारगीची तात साथ झाली. बर्फवाट शिशिराची आता पुढलिया देशी तुझ्या मिठीची असोशी अजूनही. -कवी कुसुमाग्रज
Taxonomy upgrade extras

निरवानिरव

लेखक रामदास यांनी बुधवार, 08/10/2008 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
पोस्टर वरच्या तरुण यक्षीणीच्या अप्राप्य , गोलगुबार स्तनांकडे बघत बसलेला भणंग माणूस अचानक हातउसनं मागेल काहीतरी. असाही मी परत येणार नाही. ******* आडगावच्या एका फलाटावर फतकल मारून बसलेल्या म्हातार्‍या बैलासारखं. माझं आयुष्य स्थिरावलं आहे. चिरस्थायी. ************** एव्हाना माझ्या आठवणी. ठेवणीतल्या बुरसट वासासहीत, ट्रंकेच्या तळाशी. घडीघडीत विरलेली घडी. इथेतिथे गंजाच्या लाल डागासहीत. पसरत गेलेल्या आयुष्याच्या मापात कपडे आता अडनिडे. तशी तू समजूतदार हवी असलेली जरीची तार. बंदीस्त केली असशील मनातल्या हुशार रीळावर. दिलंच काही बोहारणीनी विनीमयात तर चार चकचकीत डब्यांची रांग साक्ष देईल, टुकीनी
Taxonomy upgrade extras

फाऊंटन पेन!

लेखक स्वाती फडणीस यांनी बुधवार, 08/10/2008 01:54 या दिवशी प्रकाशित केले.
हाता मधलं फाऊंटन पेन! झरझरणारे थेंब थेंब.. काळी-नीळी लाल-जांभळी हिरवी-पिवळी सळसळती रेघ!! हाता मधलं फाऊंटन पेन! झुळझूळणारे थेंब थेंब.. खळखळणारी खरखरणारी खदखदणारी भळभळती रेघ!! हाता मधलं फाऊंटन पेन! झिळमीळणारे थेंब थेंब.. वळती थांबती वहाती चिरतीमुरती रेघ हाता मधलं फाऊंटन पेन! झगमगणारे थेंब थेंब.. झरझर ताना झुळझूळ ताना झिळमीळ ताना झिरपती रेघ ======================= स्वाती फडणीस.................. ०८-१०-२००८