मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बागेची गोष्ट.

रामदास · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
कच्ची तुरट आंबट चिंबट अशीकशी नावं ठेवत पेरवाची बाग लुटली कुणी.? बघा जीभ काळी निळी चव कश्शी नाही मुळी, लालडी चोच पुसत पुसत इकडे तिकडे बघत बघत रावे म्हणाले हसत हसत. आम्ही नाही बॉ त्या गावचे !

वाचने 4194 वाचनखूण प्रतिक्रिया 10

प्राजु 20/10/2008 - 23:55
अतिशय लाघवी आहे कविता.. अल्लड आणि खेळकर.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

चतुरंग 21/10/2008 - 00:02
कुठल्या कुठल्या बागेतून भटकत दुपारच्या कविता करत हिंडत असतात कोण जाणे? पेरवाची बाग काय अन काय ते लुटले जाणे अन काय ती लालडी चोच, आम्ही त्या गावचेच नाही बॉ!! ;) चतुरंग

In reply to by चतुरंग

च्यामारी, रंगाशेठ, माझ्याही मनात सेम टू सेम विचार आला... जरा लक्ष नीट ठेवायला पाहिजे रामदासकाकांवर ;) नाही म्हणजे एखाद दुसरा पेरू आपल्याला पण मिळेल खायला. :) बाकी कविता छानच... बिपिन कार्यकर्ते