Skip to main content

कविता

बेधडक जगायचय

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी गुरुवार, 06/08/2009 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या वादळ-वार्‍याला पकडुन मुठीत दुर कुठेतरी भिरकवायचय, ह्या समुद्राच्या लाटांवर स्वार होउन वार्‍याच्या वेगाने धावायचय, बेधुंद होउन, बेधडक जगायचय , मनात येयील ते करायचय ह्या सगळ्या पर्वतशिखरांना सर करुन त्यानांच ठेंगा दाखवायचाय, जमिनीला जिथे आकाश भेटते तिथे जायचय, आणि क्षितीजावर माझे नाव कोरुन यायचय, बेधुंद होउन, बेधडक जगायचय , मनात येयील ते करायचय चंद्र तार्‍यांना तोडुन, सखीच्या ओंजळीत द्यायचय, जिच्यावर करतो प्रेम तिला एकदा भिडायचय, तिला घेऊन मिठीत , तिच्या डोळ्यात डोळे घालुन माझे प्रेम तिला सांगायचय, तिचा हात हातात घेउन जगापासुन दुर पळायचय बेधुंद होउन, बेधडक जगायचय , मनात येयील ते करायचय प

थांब ना..

लेखक प्राजु यांनी गुरुवार, 06/08/2009 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
गर्द आहे वाट माझी तू जरासा थांब ना दाटले रे मूक भय हे, सोबतीला थांब ना साचली गर्दी दुकानांची चहू बाजूस या सापडे एखाद घरटे, पाहूनी तू थांब ना एवढाही वेळ नाही सांग का रे तुजकडे ? घेउनी आयुष्य माझे, आज थोडा थांब ना सांजवेळा होत आली, वाकल्या या सावल्या भास्कराची साथ निवली, मात्र तू रे थांब ना पाहिले सारेच व्यापारी जगी हे राहिले सापडे "माणूस" जेथे, त्या ठिकाणी थांब ना गंजल्या खाणा खुणा, या भूतकाळाच्या जरी कोपरा सांगेल सारी, ती कहाणी थांब ना - प्राजु

'नांदा सौख्यभरे' (राखी तू मांडले। तुझे स्वयंवर)

लेखक अविनाश ओगले यांनी बुधवार, 05/08/2009 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
राखी तू मांडले। तुझे स्वयंवर 'वर' अनावर। देशोदेशी 'टीआरपी'साठीच। मिडियाचा स्टंट प्रसिद्धी इंस्टंट। मिळे तुला आपुल्या देहाचा। मांडसी बाजार कैसा हा आजार। राखी तुझा भारतीय नार। आहेस तू राखी संस्कृतीची 'राखी'। लाज थोडी देतो आशीर्वाद। लग्नगाठ बांधा एकाशीच 'नांदा। सौख्यभरे' -अविनाश ओगले
काव्यरस

आधुनिक रामायण ....

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 04/08/2009 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
ते म्हणतात आम्हीच... राममंदीर बांधणार ! रामाच्या नावाखाली इथे लक्ष्मणच.. भरताला मारणार ! मानवतारुपी सीता पुन्हा-पुन्हा.. भुमीत सामावणार ! कारण..... कितीदाही अनुभव घेतला ! तरी मायेचा सुवर्णमृग, तिला नेहमीच.. मोहात पाडणार ! विशाल.

मल्हारसांज

लेखक कौतुक शिरोडकर यांनी सोमवार, 03/08/2009 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
मल्हारसांज गर्भारलेली उदरी निशा अशांत ओली दिशांची दिशांना पुन्हा आर्त साद डोहाळे पुरवी जलांच्या पखाली घनभार हल्के जाता झरून कृष्णांबरही झुके सावरून आड धुक्याच्या घेई विचारून गिरीराजाची ख्याली खुशाली घनन घनन घनवृंद घुमा सागर पाश क्षितिजी गनिमा पश्चिमा सलज्ज निरखे प्रतिमा लहरींच्या अधरी, पवनाच्या चाली घुले श्यामरंगी, नभाची निळाई विरत्या परिघा, समीपाची घाई अधीरल्या प्रभेची कवडशी धिटाई रवी पांघरूनी निजे मेघशाली

तिने केली एक कविता

लेखक दत्ता काळे यांनी शनिवार, 01/08/2009 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
तिने एक कविता केली अन् विचारले "कशी वाटली"? मी म्हणालो "नदी, झरे, चांदण्यांची पान भरुन दाटी झाली" कविता कशी हवी वास्तवदर्शी अन् आरस्पानी काळजाला भिडणारी मनाला जरा पिडणारी विचार करायला लावणारी अन् काळाबरोबर धावणारी (म्हणजे नको नॉस्टेलजिक ) ती म्हणाली " अरे ,आपण वास्तवतर जगतोच आहोत मग कविता हवी कशाला तू वास्तवाच्या ऐदीसाठी स्वप्ने घेतोसच कि उश्याला. कवितासुध्दा एक स्वप्न - मुक्त विचारांना पडलेलं त्यामध्ये मग काहिही येईल पानं, फुलं, टोपड, झबलं कवितेतलं वास्तव म्हणजे नक्की रे असतं काय ? -वास्तवतेच्या भावनांना कल्पनेचेच ना असतात पाय ? नको कविता नॉस्टेलजिक नको आठवणींचे रान पण, प्

ध्येय!

लेखक राघव यांनी शनिवार, 01/08/2009 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाकडे बघतांना मनांत आलेले विचार मांडण्याचा हा प्रयत्न. :) आषाढ-श्रावणाची ती गाज सांगते मज, भूमीत वेदनेच्या पेरीत सुख निघावे! अस्तित्व आज माझे उरले कुठे जराही.. मृद्गंध होऊनी मी सर्वां-उरी भिनावे! कोमेजण्यात मजला कसलेच दु:ख नाही..(पण) कुंजातल्या फुलासम बहरून नित्य यावे! प्रत्येक दिस नसावा मृत्यूस याचणारा.. क्षणैक मेघनेसम दिपवून सर्व जावे! कित्येक जन्म सरले काट्यांत रोधलेले..(पण आता) आभाळ न्हायलेली धरती मला खुणावे!! राघव
काव्यरस

झोपडपट्टी?

लेखक ऋषिकेश यांनी गुरुवार, 30/07/2009 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
झोपडपट्टी ही तोडावया हवी झाली मज घाई सौंदर्याची उगारले हात शेवटचे शस्त्र विनाशाचे अस्त्र कोसळले रोडरोलर ते खोपट्याशी नेले शिव्याशाप दिले जमावाने पहिले खोपटे तोडूनिया देता होईल शांतता कायमची इतक्यात तिथे मजला दिसली उभी भांडीवाली आमचीच त्याच गर्दीत हो माझा वॉचमन, बघतो रोखून माझ्याकडे बायको मुलांच्या उभा बरोबर माझा ड्रायव्हर घोळक्यात माझ्या तान्ह्याला जी आंघोळ घालते आज ती रडते घरासाठी अचानक माझ्या मनी काय आले यंत्र बंद केले शांतपणे अर्थ श्रीमंतीचा क्षणात बदले मनात पसरे संभ्रमच ह्या झोपडपट्ट्या कशा तोडायच्या खूणा श्रीमंतीच्या तिच्याकडे माझ्या श्रीमंतीच्या खूणाच पुसल्या म्हणू कसा मला श

उसाश्यांचे भान

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 29/07/2009 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
तरवारीना मिळते कवितेचे म्यान जीवघेणी तान होते कट्यारीचे पान हरपते सारेच ऐकूनी देहभान हवे कशास मग उसाश्यांचे भान... तू सभोताली नीळाई होउनी येतेस सारे आकाश झाकुनी ऐन पावसात इंद्रधनु घेउनी हवे कशास मग उसाश्यांचे भान होवोनी चंद्र मन धुंद होत जाते पायीचे नाद ताल संगीत होते काय सय जीव घेऊनी जाते हवे कशास मग उसाश्यांचे भान कायांची होती वीणा...गीत अप्सरा गाते काय चमत्कार होतो..शब्द मूका करते भाषेवीण संवाद.....मन हिरवे रान होते हवे कशास मग उसाश्याचे भान तु येतेस होवोनी रानीचे पान पावसाळी शहारा.

अजूनही... अजूनही...

लेखक कौतुक शिरोडकर यांनी बुधवार, 29/07/2009 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
अल्लड तुझे ते वागणे करते गुन्हा... मुग्ध मुग्ध रे सावध कटाक्ष टाकणे करते पुन्हा... लुब्ध लुब्ध रे अजूनही... अजूनही.... कधी गंध देती वार्‍यासही तुझ्या मोकळ्या केसांच्या बटा कधी कुंद करती तार्‍यासही तुझ्या बोलक्या डोळ्यांच्या छटा मकरंद अधरी तोलती सखये तुझे... शब्द शब्द रे अजूनही... अजूनही.... तुझी कंकणे झंकारती सप्तसुरांच्या अलवार ताना तुझी पैंजणे नादावती अधीर मनाच्या स्पंदनाना प्राजक्तापरी हासणे झुलती सुखे... बद्ध बद्ध रे अजूनही... अजूनही.... ही देहबोली वेडावते वना श्रावणी पिपासा जणू अस्तित्वाचे नभ व्यापते इंद्रधनुचा उसासा जणू फिरत्या जगाचे पाळणे होती मुके... स्तब्ध स्तब्ध रे अजूनही...
काव्यरस