Skip to main content

कविता

बायको बरोबर भाजीला गेलो...

लेखक अविनाश ओगले यांनी शनिवार, 15/08/2009 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
बायको बरोबर भाजीला गेलो, पिशवी तिच्या हातात होती खरेदीला घेतलेल्या पैशाची, माझ्या खांद्यावर जड पोती आलं, कडीपत्ता, भाजीवाल्यानं सहज पिशवीत सारला दोन किलो वांगी दे म्हटल्यावर, पॅन नंबर विचारला तो म्हणाला, शंभर रुपयाच्या भाजीवर, फुकटच आहे कडीपत्ता पण आयकर विभागाला कळवावा लागतो तुमचं नाव आणि पत्ता. कडधान्याच्या दुकानात बॅंकांचे प्रतिनिधी वाटत होते अर्ज तूरडाळ खरेदीसाठी सवलतीच्या दरात मिळत होते कर्ज डाळीचा मग नाद सोडला, चिकन आणलं भाराभर त्यादिवशी मला पटलं, `घर की मुर्गी दाल बराबर' दाल मे कुछ काला है, मोठा कठीण आलाय काळ महागाईसमोर कुणाचीच शिजेनाशी झालीय डाळ आमच्या संसाराचं चाक असं महागाईत फसल
काव्यरस

राधा

लेखक क्रान्ति यांनी गुरुवार, 13/08/2009 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर मंडळींना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा! From Pandurang" alt="" /> त्या सावळ्या सख्याच्या रंगात रंगले मी त्या साजिर्‍या सुखाच्या स्वप्नात दंगले मी ते स्वप्न सत्य होते, की
काव्यरस

नमन

लेखक गोगट्यांचा समीर यांनी गुरुवार, 13/08/2009 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
वाटे तुला की, तू एकटा न संगे कोणी , दिवस सरता खायला येई , सुन्न भयाण शांतता न कळे काही , त्रस्त तु सर्वथा मग, कर तू , वाच तू, स्मर तू हे नमन , आहे हे तुजकरिता! मना प्रमाणे सर्व , आनंद वसे अनंता साथ मिळे तुला , जीवन एक कविता सुंदर मोहक दिसे न कुठे कुरुपता असावी ही , पुस्तकातली परिकथा मग, स्फुरे तुला, आवडे तुला, स्मरे तुला, हे नमन , आहे हे तुजकरिता!

भारतीय !

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 12/08/2009 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
हे जळणं आता रोजचंच आहे बंदुकीच्या गोळीशी आमचं नातं फार जवळचं आहे बंदुक माझ्याकडेही आहे पण चापावर बोटच येत नाही मी अगदी शांत आहे ..........कारण मी भारतीय आहे मी कधीचा शांतता मागतोय ते मात्र आर. डी. एक्स.

स्वप्नांचे पहारेकरी

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी मंगळवार, 11/08/2009 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
मी माझ्या स्वप्नात जागुन तुझ्या स्व्प्नांना पहारा देतो, तुझ्या स्वप्नात तु माझ्यापासुन दुर जाशील म्हणुन मी घाबरतो चांदण्याना तुझ्या स्वप्नात येण्याची परवानगी देतो, पण चंद्राला मात्र दारावरुनच हाकलतो, मला माहितेय चंद्र तुला आवडतो, पण काय करणार चंद्र पण तुझ्यावरच मरतो मी ही कधी कधी हळुच तुझ्या स्वप्नात डोकवतो, तुला डोळे भरुन पाहुन घेतो, तुझ्या माथ्यावर डोके टेकवणार असतोच, तेवढ्यात कुठलातरी अज्ञात पहारेकरी मलाच हाकलतो मला कळाले मी इकटाच नाही अजुन बरेच जण तुझ्या स्वप्नांना पहारा देतात, आणि तुझ्या स्वप्नांच्या प्रवेशदारावर एकमेकांशी भांडत बसतात तु पण थोडीफार चुकतेस, डोळ्यांनी अशी काय जादु करत

परिणिता..

लेखक प्राजु यांनी सोमवार, 10/08/2009 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
कुणी रेखिली क्षितिजावरती चंचलशी मेघना अश्व नभाचे दौडत आणित करूनिया गर्जना मल्हाराला छेडित छेडित अळवूनिया गायले पंख फ़ुलवुनी आतुर झाला मयूरही नर्तना.. लाही लाही साहुन धरणी भेगाळुनी गेली 'धाव सख्या रे धाव सख्या!' ती रोज करी प्रार्थना.. "नकोस राणी नको करू गं उगाच तू धावा.. जलद बघ हे, भरून आणिले तुझ्याच मी अर्पणा.." कडे-कपारी, दरि-खोर्‍यांतुन बरसत तो राहिला बांधुनी साकव इंद्रधनुचा बोलविले श्रावणा..
काव्यरस

|| गीत अभिमानाचे स्फुरु दे ||

लेखक मनीषा यांनी शुक्रवार, 07/08/2009 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
९ ऑगस्ट -- "क्रांती दिन "
उंच उभारुनी ध्वजा केशरी जयजयकार निनादु दे | पेटलेल्या संगराची ज्योत गगनाला भिडू दे || सामोरी येथ आमुच्या लोहपाशात बद्ध देवता थेंब तिच्या अश्रुचा धगधगती ज्वाला बनू दे || आव्हान असे दश-दिशांना अजिंक्य आमुची विजिगीषा बेभान अनावर आवेगाला साथ धैर्याची मिळू दे || तळपति तेज दामिनी उसळू द्या आवेशाने अर्ध्य उष्ण रुधिराचे तेजाला त्या अर्पू दे || उभा पुढे जरी काळ राही नसे तमा आम्हा जराही मत्त , उन्मत्त अहंकाराला धाक शौर्याचा असू दे || पाप नाचते उन्मादाने धुंद होत आपुल्या बळाने अमानुष त्

दिवाळीची पहाट

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी शुक्रवार, 07/08/2009 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
लग्नानंतर पहिल्या दिवाळीची पहिलीच पहाट, गावाकडच्या घरासमोरील भल्या मोठ्या अंगणात फक्त ती, मी आणि सुंदरशी पहाट, ती नुकतीच नाहलेली, ओलेत्या केसांनी तुळशीवृंदावनासमोर उभी, तिच्या हातात पुजेचे ताट, ताटात निरांजन तिच्या चेहर्‍यावर पडलेला निरांजनचा प्रकाश , त्या प्रकाशाने नाहुन तिचा चेहरा सोनेरी झालाय , अजुनच खुललाय , अजुनच सुंदर दिसत आहे माझी सोनपरी..शब्दच नाहीत वर्णन करायला कपाळावरचे कुंकु थोडेसे फिसकटले आहे पण का कोणास ठाउक ते व्यवस्थित नाहीये करायचे मला तशीच ती सुंदर दिसते आहे ती एवढी सुंदर कधीच दिसली नव्हती मला माझ्या डोळ्यांची पापणीच खाली पडत नाहीये हे क्षण इथेच थांबावेत आणि मी तिला असेच पहा

कविता लिहिताना!

लेखक गोगट्यांचा समीर यांनी गुरुवार, 06/08/2009 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
लिहीताना विचार करू नये लिहीत जावं अनेक चुका होतात पण पुढे जाव विचार करायची वाट का बघायची येत नसेल तर कविता का करायची ? अगदीच हट्ट असेल कशीतरी यमके जुळवायचा तर असाच कसा तरी शब्दाला शब्द मिळवायचा अहो सुंदर कविता का सगळ्याना जमते आपण म्हणावं प्रत्येक कविता सुंदर असते पण कधी कधी काहीच सुचत नाही म्हणुन का आम्ही कविताच करायची नाही ? अरे हट , नाही जमले तरी बेहत्तर! कोण वाचेल हा विचार करू नंतर चला एक प्रयत्न ......... अनुत्तरित प्रश्न तर मनात साचलेले असतात उत्तरे मिळवताना आपले केस पिकतात! अरे वा सुरुवात तरी बरी(च) झाली म्हणता म्हणता माझीही कविता तयार झाली..!
काव्यरस

बेधडक जगायचय

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी गुरुवार, 06/08/2009 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या वादळ-वार्‍याला पकडुन मुठीत दुर कुठेतरी भिरकवायचय, ह्या समुद्राच्या लाटांवर स्वार होउन वार्‍याच्या वेगाने धावायचय, बेधुंद होउन, बेधडक जगायचय , मनात येयील ते करायचय ह्या सगळ्या पर्वतशिखरांना सर करुन त्यानांच ठेंगा दाखवायचाय, जमिनीला जिथे आकाश भेटते तिथे जायचय, आणि क्षितीजावर माझे नाव कोरुन यायचय, बेधुंद होउन, बेधडक जगायचय , मनात येयील ते करायचय चंद्र तार्‍यांना तोडुन, सखीच्या ओंजळीत द्यायचय, जिच्यावर करतो प्रेम तिला एकदा भिडायचय, तिला घेऊन मिठीत , तिच्या डोळ्यात डोळे घालुन माझे प्रेम तिला सांगायचय, तिचा हात हातात घेउन जगापासुन दुर पळायचय बेधुंद होउन, बेधडक जगायचय , मनात येयील ते करायचय प