Skip to main content

उसाश्यांचे भान

प्रकाशित मुखपृष्ठ
तरवारीना मिळते कवितेचे म्यान जीवघेणी तान होते कट्यारीचे पान हरपते सारेच ऐकूनी देहभान हवे कशास मग उसाश्यांचे भान... तू सभोताली नीळाई होउनी येतेस सारे आकाश झाकुनी ऐन पावसात इंद्रधनु घेउनी हवे कशास मग उसाश्यांचे भान होवोनी चंद्र मन धुंद होत जाते पायीचे नाद ताल संगीत होते काय सय जीव घेऊनी जाते हवे कशास मग उसाश्यांचे भान कायांची होती वीणा...गीत अप्सरा गाते काय चमत्कार होतो..शब्द मूका करते भाषेवीण संवाद.....मन हिरवे रान होते हवे कशास मग उसाश्याचे भान तु येतेस होवोनी रानीचे पान पावसाळी शहारा. थेंब थेंब गान वेडावला जीव....तृप्त इंद्रधनुची कमान हवे कशास मग उसाश्यांचे भान. ...........................विजुभाऊ सातारवी

याद्या 1489
प्रतिक्रिया 6

लेखनविषय: