Skip to main content

कविता

नांदी

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 29/06/2009 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
आकाशी जलद जलद नाचू लागले आषाढसरी, मन माझे न्हाऊ लागले! दरवळ तो मातीचा मनास मोहवी वर्षेचे कंजन, बघ कानी गुंजू लागले! मग खेळणे वर्षेच्या धारांशी वार्‍याचे मनात आगळे, अलगुज छेडू लागले! संपले बघ वाट पाहणे ते चातकाचे आनंदविभोर, मोर वनी नाचू लागले! रोमांचित जाहली बघ तृषार्त धरा नग्ननिखळ, हास्य तिचे फुलू लागले! विशाल

! पांडुरंग !

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी सोमवार, 29/06/2009 07:28 या दिवशी प्रकाशित केले.
आली आली बघा पंढरीची वारी भेट उराउरी पांडुरंग ! आनंद सोहळा क्षण हा विरळा सौभाग्याचा मेळा पांडुरंग ! सगुण निर्गुण दोहोंचे मिलन मन वा "नमन" पांडुरंग काय माझे नाव काय माझे गाव मला फक्त ठाव पांडुरंग ! जाहलो निशब्द थांबले भजन नाद सनातन पांडुरंग ! चाललो चाललो आता नाही येणे श्वासांचे थांबणे पांडुरंग !

एक हलके फुलके गाणे.

लेखक रामदास यांनी रविवार, 28/06/2009 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
काही महीन्यांपूर्वी रोहीत राऊत या बालकलाकाराचे गाणे ऐकले होते तेव्हा असे वाटले की या (रोहीतच्या)पिढीसाठी गेय कविता लिहायची तर कशी लिहावी लागेल ? मग लक्षात आलं की यांच्या साठी गेय असं काही लिहायचं झालं तर यांचा रीदम अनुभवून मग लिहावं लागेल.संगीताची समज कमी आहे तरी एक प्रयत्न करून पाहीला .तुमच्या पुढे ठेवतो आहे. कल्पना अशी आहे की नोकरी नसलेला एखादा तरुण मुलगा आसपासच्या मुलीकडे रोज बघतो . त्याला ती ज्याम आवडतेय, पण नोकरीचा पत्ता नाही विचारायचं कसं ? कोरस : टफ लूकींग गाय पण डेरींगच नाय गूड लूकींग गाय पण नोकरीच नाय. चेहेरा गोरामोरा का झाला सांग ना. गजरा चुरगळला का गळल्या पाकळ्या क

"तू"

लेखक अलि यांनी शनिवार, 27/06/2009 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी चाहूल सौदामिनी तुझं येणं झिम्मडसर थांबणं तृप्त पाऊसओल मन हिरवं करणारं ओठी धनू इंद्राचं सप्तरंगी शब्दशर डोळ्यात आभाळ थेंबभर निरभ्र, निःशब्द करणारं

लगाम

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 26/06/2009 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
त्याचा आणि माझा संवाद तसा जुनाच आहे संवाद तरी कसे म्हणायचे बर्‍याचदा फक्त तोच बोलतो मी नेहेमीच फक्त श्रोता असतो नाही म्हणायला शंका असतात माझ्या परवाच विचारले त्याला हा कॅनव्हास बघितलास? पांढराशुभ्र ..... रंगवायचाय मला ! हंसला ..... हळुवारपणे म्हणाला वेड्या ....! अरे आत्माच तो जणु ...! निर्लेप असतो .... निर्विकार ना रंग, ना रुप, ना कसल्या अभिलाषा त्या फलकाची चौकट आहे ना... तो देह रे ! कुठलेतरी बंधन हवेच ना? हा ...

कृष्णबावरी..

लेखक प्राजु यांनी बुधवार, 24/06/2009 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
भारलेल्या त्या स्वरांची तान छेडे बासरी गीत कान्हाचे असे राधे तुझ्या ओठावरी.. पाहताना दर्पणी त्या रंग भासे सावळा कृष्णबिंबा! तूच की मी?"... हाय ! राधा बावरी.. मोहनाला रेखिते ती लोचनांच्या अंगणी दृष्ट काढी काजळाने सावळ्या थेंबावरी.. पैलघंटा वाजते ना सांज आली राऊळी ऐकण्या आतूर राधा माधवाची पावरी.. नीळवर्णी मोरपीशी गुंतलेली राधिका ती मयूरा कृष्णवेडी नाचते या भूवरी.. सप्तरंगी नाहला वृंदावनीचा श्रीहरी ल्यायली श्रीरंग राधा त्या तिच्या कायेवरी.. - प्राजु
Taxonomy upgrade extras

अमृताच्या धारा

लेखक क्रान्ति यांनी बुधवार, 24/06/2009 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
झाली शांत तृप्त धरा अशा बरसल्या धारा सांगे गंधाचा निरोप तुझ्या अंगणीचा वारा गर्द सावळे आभाळ राशी रुप्याच्या सांडते सौदामिनी उजळते तुझा गगनगाभारा झेलताना तनूवर हिरेमोती आनंदाने लाख डोळ्यांनी फुलतो मनमोराचा पिसारा तुझ्या करुणेचा मेघ माझ्या दारी झरताना जागेपणी पापण्यांत स्वप्न येतसे आकारा माझ्या जन्माचे सार्थक तुझे ओसंडून देणे, माझी चातकाची तृषा तुझ्या अमृताच्या धारा
Taxonomy upgrade extras

अश्वत्थ

लेखक दत्ता काळे यांनी बुधवार, 24/06/2009 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
तिच्या कोरड्या डोळ्यात आता नुरला विश्वास शांत घरातली भासे खिन्न ओसरी उदास झाले कवाड पोरके नाही अंगणाची साथ चुडा भरल्या हातात बूजगावण्याचा हात अश्वत्थाच्या झाडावर किती पक्ष्यांची घरटी पारावर हिंडणारी बघ साळुंकी एकटी खोली भरून दाटला खुळा अंधाराचा जीव बाहेरचा कव डसा शोधी जमिनीचा ठाव वारा झपाटून आला होई क्षणात बेभान स ळ स ळू न उठते पिंपळाचे पान पान

पहिला पाउस

लेखक जागु यांनी मंगळवार, 23/06/2009 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला पाउस बालमनाचा कागदी होडया वल्हवण्याचा बेडका मागे धावण्याचा डबक्यामध्ये डुंबण्याचा आईच्या कोरड्या पदराचा ओला स्पर्श ममतेचा. पहिला पाउस तरुण मनाचा मस्ती - मौजेच्या झर्‍याचा स्वप्नाच्या कोवळ्या पालवीचा प्रेम धाराना अंगावर झेलण्याचा प्रितीमध्ये न्हाउन निघण्याचा पहिला पाउस वृद्ध मनाचा ब्लॅकेटमध्ये लपेटण्याचा कांदा भजी अन गरम चहाचा वाकड्या दांड्याच्या घत्रीचा आठवणींच्या पागोळ्यांचा
Taxonomy upgrade extras

-: माझे कौलारू घर :-

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 22/06/2009 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
-: माझे कौलारू घर :-

खाली आहे हिरवळ हिरवी
दोन बाजूंनी डोंगर कडे
उंच बघावे आभाळ निळे
सोनेरी सुर्यकिरण त्यातून पडे ||
Taxonomy upgrade extras