गर्द आहे वाट माझी तू जरासा थांब ना
दाटले रे मूक भय हे, सोबतीला थांब ना
साचली गर्दी दुकानांची चहू बाजूस या
सापडे एखाद घरटे, पाहूनी तू थांब ना
एवढाही वेळ नाही सांग का रे तुजकडे ?
घेउनी आयुष्य माझे, आज थोडा थांब ना
सांजवेळा होत आली, वाकल्या या सावल्या
भास्कराची साथ निवली, मात्र तू रे थांब ना
पाहिले सारेच व्यापारी जगी हे राहिले
सापडे "माणूस" जेथे, त्या ठिकाणी थांब ना
गंजल्या खाणा खुणा, या भूतकाळाच्या जरी
कोपरा सांगेल सारी, ती कहाणी थांब ना
- प्राजु
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4391
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
गंजल्या
आवडली!
मस्त...
ए
सांजवेळा
छान आहे पण गझल मात्र नाही.
धन्यवाद बदल केला आहे.
In reply to छान आहे पण गझल मात्र नाही. by पॅपिलॉन
छान,
बरोबर आहे.... मस्त आहे कविता
In reply to छान, by ज्ञानेश...
गझल
प्रियकर प्रेयसीचा कुठेही संबंध नाहीये
In reply to गझल by मीनल
माझी समज
मीनल शी